Viral video: माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची अनोखी मैत्री पाहून तुम्हीही व्हाल अवाक्..; व्हिडिओ एकदा पहाच..

0

Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. प्राण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. प्राण्यांची जीवनशैली कशी असते? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकामध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. निसर्गाच्या या साखळीत प्राणी एकमेकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात, हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक प्राणी एकमेकांचे शत्रू असतात. या प्राण्यांमध्ये मैत्री फार क्वचित पाहायला मिळते. अशाच एका माकडाच्या (monkey)  पिल्लाचा आणि काही पक्षांच्या (birds) मैत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर नेहमी प्राण्यासंदर्भातले अनेक भयानक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मगर हरणाची शिकार करताना व्हिडीओ वायरल होतो, तर कधी हरणाची शिकार वाघ करताना, देखील आपण अनेक वेळा पाहतो. काळजाचा थरकाप उडवणारे, अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर जबरदस्त मैत्रीचे प्रदर्शन करणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून, या व्हिडिओला लाखों लाईक्स देखील मिळाले आहेत.

मैत्री ही कोणासोबत कधीही होऊ शकते, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तुम्ही सोशल मीडियावर मैत्री संदर्भातले अनेक इंस्पिरेशन्स व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील. अनेक प्राण्यांची मैत्री माणसांसोबत असल्याचं आपण अनेकदा पाहतो. मात्र वेगवेगळ्या प्राण्यांची मैत्री फार क्वचित पाहायला मिळते. माकडाची आणि पक्ष्यांची कधी मैत्री झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? मैत्री सगळ्यात सुंदर नातं असतं. हे तुम्ही माकडाचा आणि पक्षांचा व्हायरल झालेला, व्हिडिओ पाहून मान्य तर करालच, पण यापेक्षा सुंदर आणि एकमेकांप्रती प्रेम दाखवणारा व्हिडिओ आतापर्यंत कधी पाहिलाही नसेल, हेही मान्य कराल.

      काय घडलं नक्की?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, माकडाच्या पिल्लाचे आणि पक्षांचे किती भावनिक नाते आहे, हे हा व्हिडिओ पाहून लक्षात येईल. माणसाप्रमाणे इतर प्राण्यांना देखील भावना असतात. या संदर्भात बोलताना अनेकजण म्हणतात, माणसांपेक्षा प्राणी अधिक जीव लावतात, शिवाय त्यांना माणसांपेक्षा भावना देखील जास्त असतात. एवढंच नाही, तर हे एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करतात. असाच एक प्रेमळ माकडाच्या पिल्लांचा आणि पक्षांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत माकडाच्या पिल्लाची आणि पक्षांची खूपच घनिष्ट मैत्री असल्याचे पाहायला मिळत आहे. एका खुल्या मैानावर माकड आणि पक्षी खूपच प्रेमाने एकमेकांसोबत खेळत असल्याचे, पाहायला मिळत आहे. कधी माकड या पक्षांना गोंजारताना पाहायला मिळत आहे. तर कधी पक्षी आपल्या मित्राला चोचीने प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. माकडाच्या पिल्लाचं आणि पक्षांचे एकमेकांवर असणारे प्रेम पाहून, अनेकजण अवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ खूपच सुंदर असून, हा व्हिडिओ अनेकांना अनेकवेळा पाहण्याचा मोह आवरत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, व्हिडिओत माकडाचे पिल्लू आपल्या मित्रांना स्वतःच्या अंगावर झोपवत असल्याचे, पाहायला मिळत आहे. हे दृष्य फारच सुंदर आणि प्रेमळ असल्याचं पाहायला मिळतं. माकडाच्या पिल्लाच्या अंगावर अनेक पक्षी ज्याप्रमाणे झोपले आहेत, हे दृश्य अनेकांना मोहात टाकणारं आहे. अनेक पक्षीदेखील विश्वासाने माकडाच्या पिल्लाच्या अंगावर झोपले असून, चोचीने या माकडावर प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. AmazingNature00 नावाच्या हँडलवरून हा सुंदर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या, गोंडस प्राण्यांचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून, अनेक जण या व्हिडिओच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजर्सने यावर कमेंट करताना म्हटलं आहे, किती गोंडस,सुंदर आणि एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करणारा हा व्हिडिओ आहे. मी माझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर व्हिडिओ पाहिलाय.

 हे देखील वाचा Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

Voting card: मतदान यादीत नाव लावायचंय? असा करा घरबसल्या पाच मिनिटांत अर्ज; मतदान ओळखपत्रही मिळेल घरपोच..

Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजगर जिवंत हरणाला गिळत असताना घडलं असं काही..

Viral video: डब्यात तोंड अडकलेल्या सापाची झालेली केविलवाणी अवस्था तुम्हालाही पाहवणार नाही; एकदा पहाच व्हिडिओ..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.