Viral video: डब्यात तोंड अडकलेल्या सापाची झालेली केविलवाणी अवस्था तुम्हालाही पाहवणार नाही; एकदा पहाच व्हिडिओ..

0

Viral video: अलिकडच्या काळात सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ लागलं आहे. मजेशीर असो, काळजाचा थरकाप उडवणारा असो, किंवा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ असो, सोशल मीडियाच्या तावडीतून सुटेल तर नवलच. खासकरून प्रण्यासंदर्भातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात, या व्हिडिओला नेटऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका डब्यात सापाचे तोंड अडकले असून, साफ या डब्यातून आपले तोंड बाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. तेराव्या सापाचे तोंड आल्यामुळे त्याची झालेली केविलवाणी अवस्था अनेकांना पाहत नसल्याचा वैर झालेल्या एवढी वाट पाहायला मिळत असून, हा व्हिडीओ अनेकांनी शेअर देखील केला आहे.

जसं की आपल्याला माहिती आहे, सापाच्या जवळ फारसं कोणी जात नाही. साप लांबून जरी पाहिला तरी, अनेक जण धूम ठोकून पळून जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, प्राणी प्रचंड तहाणलेले असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून हे नेहमी पाहत असतोच. दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, प्राणी गारव्याचं ठिकाण शोधताना पाहायला मिळतात.

उन्हाळ्यामुळे तहानलेले प्राणी नेहमी पाणी पिण्याच्या शोधात असतात. असाच एक सोशल मीडियावर तहानलेला साप पाण्याच्या शोधात असल्यामुळे, एका मोकळ्या डब्यात तोंड घालून पाण्याचा शोध घेत असताना पाहायला मिळत आहे. आपल्याला तहान लागली असल्याने डब्यात आपण पाणी पिऊ शकतो, असा विचार या सापाच्या कदाचित मनात आता ला असावा आणि म्हणून, त्याने आपलं तोंड डब्यामध्ये घातलं. मात्र या डब्यामध्ये सापाचे तोंड अडकलं, आणि त्याची झालेली केविलवाणी अवस्था सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

काय घडलं नक्की

कडक उन्हाळ्यामुळे अनेकांना तहान ही नेहमी लागत असते. मनुष्य तहान लागल्यानंतर कुठेही पाणी पिऊ शकतो, मात्र इतर प्राण्यांची परिस्थिती वेगळी आहे. यासंदर्भातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तहान लागल्याने साप आपलं तोंड रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका डब्यामध्ये घालतो. मात्र या रिकाम्या डब्यामध्ये तो स्वताचं तोंड अडकून घेतो, आणि सापाची मोठी पंचाईत होतांना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत साप आपलं तोंड रिकाम्या डब्यातून बाहेर काढण्याचा कसोटीने प्रयत्न करत आहे. मात्र या डब्यातून आपले तोंड बाहेर काढण्यात तो सपशेल अपयशी ठरत असल्याचं, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. साप डब्यातून तोंड बाहेर निघावं, यासाठी उंच उंच उड्या घेत डबा जमीनीवर जोरदार आदळत आहे. मात्र तेदेखील साप आपलं तोंड बाहेर काढण्यात यशस्वी होत नसताना, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून, सापाची झालेली केविलवाणी अवस्था अनेकांना पाहवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सापाच्या झालेल्या अवस्थेला मनुष्यच कारणीभूत असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, मनुष्य अनेक थंड पेय पिऊन, रिकामे डब्बे कचराकुंडीत टाकण्याऐवजी रस्त्यावरच टाकून देत असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. अनेक प्राण्यांना डब्यामध्ये पाणी असेल असं वाटत असल्याने, ते डब्यात आपलं तोंड घालून पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Samsung Galaxy M33 5G: सॅमसंगने आत्तापर्यंतचा सर्वोत्तम फोन केला लॉन्च; किंमत,फिचर्स, कॅमेरा जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Viral video: स्विमिंग करताना महिलेच्या कानात चक्क खेकडा घुसला; विश्वास नाही ना बसत? मग तुम्हीच पहा व्हिडिओ..

Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.