Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून ‘म्हशी’ला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने…; गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

0

Viral video: प्रत्येकाला आपापल्या कर्माचे फळ हे भेटत असतं. हे आज कोणालाही अधिकतेने सांगण्याची आवश्यकता नाही. कर्म चांगलं केलं की, माणसाचं चांगलं होतं, असे आपले पूर्वज म्हणताना आपण अनेक वेळा ऐकलं असेल. एखाद्याला कर्माचं फळ लगेच भेटतं, तर काहींना त्याची प्रतीक्षा करावी लागते. मग यात चांगलं कर्म असो की वाईट कर्म परिणाम हे भोगावेच लागतात. यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, एका म्हशीने ( buffalo) आपल्या मालकाला त्याच्या कर्माची चांगलीच फळं दिली असल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

आपण अनेक वेळा घोडा गाडी, बैलगाडी, अगदी रेडा गाडी देखील पाहिली असेल, मात्र कधी म्हैस गाडी पाहिली आहे का? नाही ना, मात्र एका बहाद्दराने चक्क म्हैस गाडीतून प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता मोठी म्हैस पळून पळून किती पळणार आहे. प्रत्येकालाच ठाऊक आहे. मात्र या महाशयाने म्हैस गाडा तयार करून, या गाड्यात बसून पाच ते सहा जण, रस्त्याने प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बैलगाडी, घोडागाडी शेतकरी वेगाने पळवतो, मात्र याला देखील मर्यादा असतात. बैलगाडी, घोडा गाडीच्या तुलनेत म्हैसगाडा किती पळेल, याचा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हैस कितीही ताकतवान असली तरी, पळणं ही तिची ताकद नाही, हे प्रत्येक जण मान्य करेल. म्हैस तिला शक्य होईल त्याच गतीने पळणार, हे शहाणा माणूस सहज समजून घेईल. मात्र एका पट्ट्याने म्हैस जोरात पळावी म्हणून, गाडीत बसून तिच्या पाठीवर चाबकाचे जोर-जोरात फटके मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. म्हैस देखील मालकाच्या चाबकाचे फटके सहन न झाल्याने, जोरदार धावत सुटल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

म्हैस जोरदार धावत असून, देखील गाड्यात बसलेली माणसं म्हैस अजून जोरदार पळावी यासाठी चाबकाने जोरात फटके मारताना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. जोपर्यंत गाडीत बसलेल्या व्यक्तींचा अन्याय सहन होतोय, तोपर्यंत तिने देखील सहन केलं. मात्र प्रकरण आटोक्याबाहेर गेल्यावर, या म्हशीने देखील या गड्याला चांगलाच धडा शिकवल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही जोरात हसाल देखील, आणि केविलवाण्या म्हशीविषयी प्रचंड वाईट देखील वाटेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी या प्रकरणाची दखल घेऊन, या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका रस्त्याने दोन गाडे वेगाने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या एका गाड्याला म्हैस जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरा गाडा म्हशीच्या गाड्या पुढे धावत आहे. म्हशीच्या गाड्यात सहा ते सात लोकं बसल्याचे पाहायला मिळत आहे. आणि ही मंडळी आपला गाडा पुढे जावा, यासाठी म्हशीच्या पाठीवर जोरदार फटके मारताना पाहायला मिळत आहे.

म्हैस देखील जेवढं शक्य होईल, तेवढ्या वेगाने धावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीदेखील पाठीमागे गाड्यात बसणारी लोकं, म्हशीच्या पाठीवर चाबकाने फटके मारत असल्याचे म्हैस देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. म्हशीची सहनशीलता संपली असल्याने, म्हैस देखील यांना चांगला धडा शिकवण्याच्या हेतूने, रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या कट्यावर गाड्याचं चाक जाईल, या अंदाजाने धावते, आणि क्षणात गाड्यात बसणारी सहा ते सात मंडळी चेंडूसारखी हवेत उडून रस्त्याच्या मध्यभागी जोरदार आपटतात.

या सगळ्यांना काही समजण्याच्या आतच क्षणांत म्हशीने यांना आसमान दाखवलं. सुदैवाने समोरून कुठल्या प्रकारची वाहनं येत नसल्याने, जिवीतहानी झाली नाही. नाहीतर, या बहाद्दरांचा भुगाच झाला असता, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ, @susantananda3 या ट्विटर आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. सोबतच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

काय म्हणाले नेटकरी

एका यूजर्सने हा व्हिडिओ लाईक करताना म्हटले आहे, माणसाने आयुष्यात कसं वागलं पाहिजे, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला क्षणांत फेडायची आहेत. तर दुसर्‍या एका यूजर्सने म्हटले आहे, म्हशीचे होत असलेले हाल सुरूवातीला पाहावले नाहीत. यामुळे सुरूवातीला थोडं अस्वस्थ वाटलं, मात्र या व्हिडिओचा शेवट पाहून, हा व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा पाहिला. मजा आली. तर अनेकांनी गाडीत बसणाऱ्या तरुणांविषयी संताप व्यक्त केला आहे. या तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील अनेकांनी कमेंट्स करून केली आहे.

हे देखील वाचा Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीच..

Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.