खत: तुमच्या मोबाईलवर ‘असा’ चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

0

खताच्या दरात दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत असल्यामुळे, शेतकरी कमालीचा चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशिया (Rasiya) आणि यूक्रेन (Ukraine) युद्धाचा परिणाम इतर घटकांबरोबर शेतकऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. युक्रेन आणि रशिया मधून भारत खतांची विक्रमी आयात करत असतं. आता ही आयात युद्धामुळे खंडित झाली आहे. आणि यामुळेच खताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. एवढंच नाही, तर कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना खताचा साठा करून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

यावेळेस ही परिस्थिती असली तरी, गेल्या अनेक वर्षांपासून खतासंदर्भात शेतकऱ्यांची पिळवणूक होताना आपण पाहिली आहे.  शेतकऱ्यांना वेळेवर कधीही खत मिळत नसल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या असतील. शेतकऱ्यांना मग कुठले तरी, लोकल कंपनीच्या खतांची खरेदी करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना रिजल्ट हवा तसा मिळत नाही, आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. खत विक्री करणारे दुकानदार कधीही शेतकऱ्यांना ब्रँडेड कंपनीचे खत देत नाही. शेतकऱ्याने आग्रह करून ब्रँडेड कंपनीच्या खताची मागणी केली तर शेतकऱ्याला दुकानात खत शिल्लक नसल्याचं, सांगण्यात येतं. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकाला येतो.

दुकानात खतांचा साठा शिल्लक नाही, असं दुकानदार  म्हणतो, आणि शेतकरी लगेच त्याच्यावर विश्वासही ठेवतो. मात्र, दुकानात खतांचा साठा शिल्लक असताना, देखील तो अनेकदा खोटं बोलत असतो. खताला जास्तीचा भाव मिळाला यासाठी दुकानदार तुम्हाला खत संपलं, असं सांगतो. जसं की तुम्हाला माहित आहे, खतांची दुकाने ही शासनाच्या अनुदानावर चालतात. त्यामुळे तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या किमतींमध्ये खत मिळणे आवश्यक आहे. हा तुमचा अधिकार आहे. मात्र शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत नसल्याने, आपण यात फारसं लक्ष घालत नाही, आणि अनेकदा तडजोड करतो.

मात्र खतांच्या खरेदीत तुम्हाला अजिबात तडजोड करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला महाधन, जय किसान सारख्या महत्वाच्या कंपनीचे खत खरेदी करायचं असेल, आणि दुकानदार या खतांचा साठा शिल्लक असूनही जर नाही म्हणत असेल, तर तुम्ही या दुकानदाराचा बाजार उठवू शकता. तुम्हाला आता तुमच्या जवळच्या दुकानात खताचा साठा किती शिल्लक आहे. याची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर ५ ते ७ मिनिटांत जाणून घेऊ शकता. तुमच्या जवळच्या खताच्या तुकानात खताचा साठा किती शिल्लक आहे, हे कसं पाहायचं? हे आता आपण तुमच्या भाषेत जाणून घेऊया…

            असा पहा खतांचा उपलब्ध साठा..

खत विक्रेता दुकानदारांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने, भारत सरकारने देशातल्या आणि राज्यातील खतांच्या साठ्याची सविस्तर माहिती एका  वेबसाईटवर उपलब्ध करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे, हे सहज पाहू शकता. या वेबसाइटवर कोणत्या दुकानात किती खतांचा साठा शिल्लक आहे? यासंदर्भातली सगळी माहिती रोजच्या रोज अपडेट करणं बंधनकारक असतं.

आता तुम्हाला खतासंदर्भातली सगळी अपडेट पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल ‘क्रोम’ वरून fert.nic.in असं सर्च करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर भारत सरकारची रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Fertilizer Dashboard हा पर्याय दिसेल, तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. “Fertilizer Dashboard” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “e-Urvarak’ नावाचं आणखी  एक पेज ओपन झालेलं असेल.

ओपन झालेल्या “e-Urvarak” या पेजवर तुम्हाला  किती शेतकरी अनुदानित दराने खताची खरेदी करतायत, देशातील खत विक्रेत्यांची संख्या, आतापर्यंत खताची विक्री किती झाली आहे? यासंदर्भातली सगळी आकडेवारी तुम्हाला याठिकाणी पाहायला मिळेल. ओपन झालेल्या या पेजवर उजव्या बाजूला “किसान कॉर्नर” या नावाने जो पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “Retailer Opening Stock As On Today” या रकान्यामध्ये तुम्हाला कोणत्या दुकानात किती साठा उपलब्ध आहे? हे पाहायला मिळणार आहे.

ही माहिती पाण्यासाठी आता तुम्हाला तुमचं राज्य, तसेच जिल्हा निवडायचा आहे. हे झाल्यानंतर तुमच्याकडे ज्या दुकानाचा आयडी म्हणजेच “Retailer Id” असेल तो टाकणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्या दुकानात खतांचा साठा किती शिल्लक आहे, हे पाहायचा आहे. पण त्याचा Retailer Id तुमच्याकडे नाही‌. तर मग तुम्ही या पेजवर समोर दिसणाऱ्या “Agency Name” या पर्यायासमोर संबंधित दुकानाचं नाव निवडायचं आहे. जर तुम्हाला दुकानाचं नाव देखील माहिती नसेल, तरी देखील काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या समोर “ALL” हा पर्याय दिसतोय, तो तसाच ठेवायचा आहे. आणि “Show” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. “Show” वर क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यात कोणत्या दुकानात किती स्टॉक शिल्लक आहे, याची सगळी अपडेट दिलेली पाहायला मिळेल.

“select retailer” या पर्यायानुसार तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा खत खरेदी करत असणाऱ्या दुकानाचं नाव निवडायचं आहे. नंतर तुम्हाला “Show” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता  “Show” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर आज त्या दुकानात खतांचा किती साठा शिल्लक आहे?  हे पाहायला मिळणार आहे.

ते झाल्यानंतर तुम्ही “RETAILER ID” रकान्यात दुकानदाराचा रिटेलर आयडी टाकून क्लिक केल्यानंतर, दुकानदाराकडे कोणत्या कंपनीच्या खतांचा साठा उपलब्ध आहे? आणि तो किती आहे? त्याचा दर किती आहे? या संदर्भातली सगळी अपडेट तुमच्या समोर ओपन झालेली असेल. अशा प्रकारे तुम्ही इफ्को, महाधन, जय किसान आणि इतर कंपन्यांच्या खतांचा साठा देखील किती उपलब्ध आहे, सोबतच त्या खतांचे दर किती आहेत, हे सगळं तुम्ही बघू शकता.

हे देखील वाचा.  Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ही आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखर असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.