Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

0

Ration Card Update: रेशनकार्ड हे सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. रेशन कार्ड शिवाय कुठल्याही योजनेचा लाभ घेणे जवळपास अशक्य आहे. रेशन कार्डमुळे देशातल्या गरीब जनतेला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. आणि म्हणून रेशन कार्डला सर्वसामान्यांच्या नजरेतून खूप महत्त्व आहे. आपले रेशन कार्ड हे प्रत्येक जण व्यवस्थितरीत्या जपून ठेवत असतो. रेशन कार्डमध्ये काही त्रुटी असल्या, तर सामान्यांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता काही त्रुटी दुरुस्त करायच्या असतील किंवा रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदवायचे असेल, तर घर बसल्या करता येणे शक्य झाले आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

जर तुमच्या कुटुंबात एखादं मूल जन्माला आलं असेल, आणि त्याचं नाव तुमच्या शिधापत्रिकेत समाविष्ट करायचं असेल, तर आता हे घर बसल्या करणं अशक्य आहे. तसेच तुमच्या घरात लग्न होऊन एखादी महिला तुमच्या घरची सदस्य झाली असेल, आणि तिचं देखील नाव तुमच्या शिधापत्रिकेत समाविष्ट करायचा असेल, तरीही तुम्ही कुठेही न जाता नाव नोंदणी करू शकता. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत. शासनाच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. रेशन कार्ड अपडेट हा त्यातलाच एक प्रकार आहे.

अनेकांना रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार हेलपाटे घालावे लागत होते. मात्र तरीदेखील तुमच्या रेशन कार्डमधली चूक दुरुस्त झालेली नसेलच. मात्र आता तुमची अजिबात पिळवणूक होणार नाही, रेशन कार्डची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या शिधापत्रिकेत नवीन नाव आणि शिधापत्रिकेची दुरुस्ती देखील करू शकता.

अशी करा नवीन सदस्यांची नोंदणी

जर लग्नानंतर एखादा व्यक्ती तुमच्या कुटुंबात आला असेल, आणि तिचे नाव तुमच्या शिधापत्रिकेत सामाविष्ट करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. साहजिकच सर्वप्रथम तुमच्या घरी महिलाच आली असेल, तर तिच्या आधरकार्डवर पहिले पतीचे नाव येणे आवश्यक आहे. आणि जर मुलाचे नाव शिधापत्रिका समाविष्ट करायचे असेल तर, मुलाच्या आधारकार्डवर वडिलांचे नाव असणे आवश्यक आहे. तुम्हाला सर्वप्रथम ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे शक्य होणार आहे.

लागणारी कागदपत्रे

जर तुमच्या घरात मूल जन्माला आलं असेल, तर तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेत त्याचं नाव समाविष्ट करण्यासाठी काही कागदपत्रे लागतात. सर्वप्रथम त्या मुलाचं आधार कार्ड तयार करणं आवश्यक आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला त्याच्या जन्माचा दाखला आवश्यक असणार आहे. त्याच्या जन्माचे प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला त्याचे आधार कार्ड काढता येणार आहे. तुम्ही त्याचे आधार कार्ड काढल्यानंतर, शिधापत्रिकेवर त्याचं नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता

       असं करा समाविष्ट

वर दिलेली माहिती तुम्ही फॉलो केली असेल, तर तुम्हाला आता तुमच्या शिधापत्रिकेत नवीन नाव अपडेट करता येणार आहे. अजूनही जर तुमच्या विभागात नाव समाविष्ट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आले नसेल, तर तुम्ही केलेला अर्ज वरील कागदपत्रांसह कार्यालयात जमा करू शकता. जर तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेत ऑनलाइन नाव सामाविष्ट करायचं असेल तर, सर्वप्रथम तुम्हाला अन्न पुरवठा विभागाच्या mahafood.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावून तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेत नवीन सदस्यांची नाव नोंदणी करू शकता.

हे देखील वाचा रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल; पिकांची कशी राखाल निगा, जाणून घ्या सविस्तर….

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी…

iral video: म्हतारं आज उद्यावर आलंय, पण मस्ती काही गेली नाही; नशीब वयाचा विचार करून बैलाने सोडून दिले, नाहीतर..,” पहा व्हायरल व्हिडिओ..

सेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर….

या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू….

माणूसकी संपली रे! एका नेत्यांसाठी दहा जणांना जिवंत जाळून मारले; कर्मचाऱ्यांनाही विझवू दिली नाही आग..

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी…

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.