वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल; पिकांची कशी राखाल निगा, जाणून घ्या सविस्तर…

0

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील वातावरणाच्या बदलामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी वातावरणात झालेल्या सतत बदलामुळेआणि आ अचानक कोसळणाऱ्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसामुळे नाहीसं झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. हीच परिस्थिती यावर्षी देखील पहायला मिळत असून, वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.

संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतं, कधी त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही, तर कधी हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे नाहीसं होतं. गेल्यावर्षी देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. सतत वातावरणात बदल आणि पिकं ऐन भरात आली असताना, पडलेलं धुकं सोबतच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला.

गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील देशातला शेतकरी या हंगामात वातावरणात आलेल्या बदलामुळे हवालदिल होताना पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडत असून, अनेक औषधाची फवारणी केली तरी देखील, पिकांवरचा रोग काही जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. या वातावरणात झालेल्या बदलामुळे आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर देखील मोठं संकट आलं असून, मिरचीला थ्रिप्स या रोगाने ग्रासले आहे.

यामुळे मिरचीवर पडला रोग

तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रमाणेच आता महाराष्ट्रातील मिरची या पिकावर ‘ब्लॅक थ्रीप्स’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील मिरची उत्पादक शेतकरी मिरचीवर पडलेल्या ‘थ्रिप्स’ या किडीमुळे हैराण झाले आहेत. या आक्रमणामुळे मिरचीवर मोठया प्रमाणावर बुरशी पडली आहे. परिणामी उत्पादित लाल मिरचीवर काळे डाग पडायला सुरवात झाली आहे. साहजिक याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मिरचीचे दर ढासळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र असं काही होणार नसल्याचं कृषी तज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या लाल मिरचीला जास्त मागणी असून, पुरवठा हा कमी होत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे मिरची उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत लाल मिरचीचे दर आणखीनच महागण्याची शक्यता यासंदर्भातल्या तज्ञांनी वर्तवली आहे. जरी मिरचीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला तरी, मिरची दर काही कमी होणार नसून, ते आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळतील. मिरचीचे दर जरी वाढले तरी, देखील शेतकऱ्याला याचा फायदा होताना दिसणार नाही. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे‌. शिवाय उत्पादन खर्च देखील वाढल्याने मिरचीला जास्त दर मिळाला तरीदेखील शेतकऱ्याचे हे नुकसान भरून निघणार नाही.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. या अवकाळी पावसामुळे आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकं पूर्वपदावर येण्यासाठी शेतकरी देखील विविध औषधांची फवारणी करत आहे. तरी देखील पिकं काही पूर्वीसारखी होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात बोलताना शेतकरी म्हणतात, मिरची वरील कीट आणि बुरशीमुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शिवाय उत्पादन खर्च देखील वाढला आहे. उत्पादन खर्च करून देखील मिरची पाहिजे तशी येत नाही. आणि मिरची मोठी होत नाही. त्यामुळे या रोगाचा परिणाम आज आमच्या उत्पन्नावर झाला आहे.

पिकांची अशी घ्या काळजी

बाजारातून बी खरेदी करून पेरणी करण्यापासून ते पीक काढून बाजारात विकण्यापर्यंत शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्याचं, आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कधी पिकाला हमीभाव मिळत नाही, तर कधी उत्पन्न चांगलज निघाले, तर अवकाळी पाऊस अचानक कोसळतो. वातावरणात बदल होतात, आणि पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. मात्र नैसर्गिक आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही. जर नैसर्गिक आपत्तीपासून काही प्रमाणात शेतकऱ्यांना आपल्या पिकाला वाचवायचं असेल, तर त्यासाठी शेतीची योग्य वेळी उत्तमरित्या मशागत होणे, गरजेचे आहे.

रोग पडल्यानंतर पिकाची कितीही निगा राखली तरी, पिक काही पूर्वपदावर येणार नाही हे सत्य आहे. मात्र पिकावर जर रोग पडू द्यायचा नसेल, तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीची योग्य मशागत करून शेतीच्या मातीची असणारी ताकद वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्याला लेंडीखत, शेणखत, सेंद्रिय खताकडे भर देणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पिकाला रोगापासून अधिक प्रादुर्भाव होण्यापासून वाचवू शकता.

हे देखील वाचा  डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ...

*’हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

नवरी पळाली मंडपातूनच पुढे काय झालं वाचा सविस्तर…

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.