IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ..

0

IPL 2022 Live streaming: 26 तारखेपासून क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचा थरारक पाहता येणार आहे. जवळपास सर्वच वयोगटातल्या लोकांना क्रिकेटचे वेड लागले असल्याचे दिसते. जगात सर्वात मोठी क्रिकेट लिग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. भारतीय चाहत्यांनी देखील ही स्पर्धा कमालीची लोकप्रियता केली असून, भारतीयांसाठी हा एक मोठा सणही मानला जातो.  कोरोनामुळे प्रत्येकालाच आपल्या संघाला मैदानावर खेळताना प्रत्यक्षात पाहता येणं शक्य नाही. यासंदर्भात खूप कडक नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना ही स्पर्धा मोबाईल आणि टीव्हीवरच पाहावी लागणार आहे.

जर तुम्ही डिस्ने + हॉटस्टारवर ( Disney+hotstar) आयपीएल (IPL) पाहणार असाल, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण डिस्ने + हॉटस्टारचा रिचार्ज न करता देखील तुम्हाला आयपीएलची ही स्पर्धा पाहता येणार आहे. जर तुम्ही डिस्ने + हॉटस्टारवरचा रिचार्ज केला नसेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाचे आहे. आयपीएल 2022 च्या हंगामात दोन नवीन संघ असल्याने, ही स्पर्धा रोमांचक होण्याची शक्यता आहे. या हंगामासाठी मेगा अॉक्शन झाल्यामुळे, प्रत्येक संघाची रचना बदलेली आहे. त्यामुळे या हंगामात सर्वच संघ एकमेकांच्या तोडीचे असल्याचं पाहायला मिळत आहे.

आयपीएलच्या या हंगामाची सुरुवात 26 मार्च पासून सुरू होत असून, या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनऊ सुपर जॉईंट आणि गुजरात टायटन हे दोन नवीन संघ सहभागी झाल्याने, प्रेक्षकांमध्ये या स्पर्धेची उत्सूकता आणखीनच वाढली आहे.  26 मार्च ते 29 मे पर्यंत या स्पर्धेचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मात्र या स्पर्धेचा थरार पेक्षकांना प्रत्यक्षात मैदानावर जाऊन आपल्या संघाला पाहता येणार नाही. म्हणून अनेकांना या स्पर्धेचा थरार मोबाईलवर, टीव्हीवरचा अनुभवा लागणार आहे. मात्र ही स्पर्धा तुम्हाला विनामूल्य देखील पाहता येऊ शकते. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयपीएलचे लाईव्ह प्रक्षेपण डिस्ने + हॉटस्टारवर केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारद्वारे तुमच्या फोनवर या आयपीएलचे सामने कधीही कुठेही पाहता येणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचा रिचार्ज मारावा लागतो. परंतु आम्ही तुमच्यासाठी रिचार्ज न करतानाही  डिस्ने + हॉटस्टारवर आयपीएल स्पर्धा कशी पाहता येईल, याची माहिती देत आहोत.  तर तुम्हाला विनामूल्य डिस्ने + हॉटस्टारवर आयपीएल पाण्यासाठी काही प्लान निवडायचे आहेत. जाणून घेऊया, हे प्लॅन कसे आहेत. तुम्ही कुठल्याही टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल तरी, देखील तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारवर विनामूल्य आयपीएल पाहता येणार आहे.

                  काय आहेत Airtel चे प्लॅन

जर तुम्ही एअरटेल या टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल, तरीदेखील तुम्हाला विनामूल्य आयपीएल पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला ५९९ रुपयांचा रिचार्ज करायचा आहे. लक्षात घ्या हा रिचार्ज डाटा रिचार्ज असणार आहे. या रिचार्ज मध्येच तुम्हाला   डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.  या डाटा प्लॅन ची वैधता  २८ दिवस  असणार आहे. यात तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. तसेच अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.  या प्लॅन सोबत तुम्हाला  डिस्ने + हॉटस्टारचा ८३८ रुपयांचा विनामूल्य प्लान मिळणार आहे. या प्लानची ​​वैधता ५६ दिवसांची असणार आहे.

                     असा आहे Jio चे प्लॅन

पूर्वी जीओ युजर्सना जिओ टेलिकॉम कंपनी मोफत हॉटस्टारचा लाभ देत होती. मात्र डिस्ने यांनी हॉटस्टारशी भागीदारी केल्यापासून ही सुविधा बंद करण्यात आली.  मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी जीओने आपल्या ग्राहकांसाठी  मोफत डिस्ने + हॉटस्टार देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही जिओ युजर्स असाल तर तुम्हाला, डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला, जिओचा ६०१ रुपयांचा प्लान खरेदी करावा लागणार आहे. या प्लॅनची मर्यादा २८ दिवस असणार आहे. या  प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला ३ जीबी डेटाही मिळणार आहे.

                  Vodafone Idea चे प्लॅन

अनेक टेलिकॉम कंपन्याप्रमाणे वोडाफोन आणि आयडिया यांनी देखील क्रिकेट चाहत्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ही योजना सुरु केली आहे.  व्होडाफोन आयडियाबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला ६०१ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तुम्ही हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळतं. या प्लॅन सोबत तुम्हाला अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील मिळते. या प्लॅनची मर्यादा तुम्हाला  २८ दिवसांची मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रति दिवस तीन जीबी प्रमाणे डाटा मिळणार आहे.

हे देखील वाचा धक्कादायक! ममतांच्या सांगण्यावरूनच भाजपच्या कार्यकर्त्यांसहीत दहा घरे जाळल्याचे उघड; अग्निशामक कर्मचाऱ्यांना विझवू दिली नाही आग…

हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर..

मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा...

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.