उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफर मुळे सगळेच झालेत हैराण, जाणून घ्या सविस्तर..

0

Reliance Jio: यांनी टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर, अनेक टेलिकॉम कंपन्यांचा बाजार उठला. रिलायन्स जिओने सुरुवातीला आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल एक वर्ष फुकट जिओ आणि अनलिमिटेड कॉल डाटा तिला. ग्राहकांनी देखील या संधीचा पुरेपूर फायदा उठवत, या गंगेत हात धूनून घेतला. पहिल्याच वर्षात Reliance Jio चे विक्रमी ग्राहक झाले. आणि याचा मोठा फटका इतर सगळ्याच टेलिकॉम कंपनीवर झाल्याचे पहायला मिळाले.

यांनी टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, वापरणारे ग्राहक देखील जिओ रीलाइन्सकडे वळण्याचं पाहायला मिळालं. मात्र एका वर्षानंतर रिलायन्स जिओने आपले कर करायला सुरुवात केली. अनेकांना डाटा वापरण्याची सवय लागल्याने, प्रतिदिन दीड जीबी डाटा हा ग्राहकांना घ्यावाच लागत असल्याचे चित्र दिसून आले. सुरवातीला हे प्लान खूप कमी वाटत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून Reliance Jio ने देखील आपले प्लान वाढवल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र या जियोने आपल्या प्लॅनमध्ये बदल केला असून, ग्राहकांना याचा फायदा उठवता येणार आहे.

Reliance Jio: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांकरिता नेहमीच नवनवीन प्‍लॅन ऑफर करत असतात. ज्याचा तुम्ही अधिक डेटाबरोबरच अनलिमिटेड कॉलिंगचा देखील लाभ घेऊ शकता. तसे पाहायला गेले तर, हे प्‍लॅन तुम्हाला काही प्रमाणात महाग जाऊ शकतात, मात्र आम्ही तुम्हाला आज जिओच्या अशा काही ‘प्लॅन’विषयी माहिती देणार आहोत. जो या सर्व प्लॅनचा तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये आनंद घेऊ शकता. यात तुम्हाला अधिक प्रमाणात डाटा आणि अमर्यादित कॉलिंग बरोबरच एसएमएस देखील मिळणार आहेत. दोनशे रुपयांच्या आतमध्ये असणारे अनेक भन्नाट प्लॅन जाणून घेऊयात.

१९९ रुपयांचा प्‍लॅन

आता रिलायन्स जिओने १९९ रुपयांच्या प्लॅन आपल्या ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. यात तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच रोज १०० एसएमएस देखील मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल देखील करता येणार आहे. या बरोबरच तुम्ही जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा देखील मोफत लाभ घेऊ शकणार आहे.

११९ रुपयांचा आणखी एक प्‍लॅन

Jio ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डाटा मिळणार आहे. मात्र याची मर्यादा २१ जीबी डेटासह १४ दिवसच असणार आहे. त्याचबरोबर ३०० एसएमएस देखील आपल्या ग्राहकांना मिळणार आहेत. सोबतच अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऑफरमध्ये तुम्हाला जिओच्या सर्व सेवा, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा देखील लाभ घेता येणार आहे.

एक जीबी डेटा प्‍लॅन

अनेकांना कामाच्या व्यापामुळे दिवसांत एक gb data पुरेसा होत असेल तर, याच्यासाठी देखील jio कडे तुमच्यासाठी विशेष ऑफर आहे. Jio प्रति दिवस तुम्हाला १ जीबी डेटा देखील उपलब्ध करून देत आहे. ही ऑफर तुम्हाला खूपच परवडणारी असून, याची मर्यादा देखील जास्त दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला jio च्या सर्वच सेवांचा लाभ घेता येणार आहे.

फक्त १७९ रुपयाचाही प्‍लॅन

अनेकांना डाटा प्लॅनची फारशी आवश्यता नसते. अशा ग्राहकांची देखील jio ने सोय केली आहे. Jio ने सादर केलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची मर्यादा ही तब्बल २४ दिवसांची आहे. आणि डाटा देखील याचा २४ gb असणार आहे. त्याचबरोबर दररोज १०० एसएमएस देखील मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जिओ टीव्ही, आणि जिओ सिनेमा, जिओ सुरक्षा तसेच जिओ क्लाउड सुविधा देखील दिली जाते. एवढेच नाही तर अमर्यादित कॉलिंग देखील दिली जाते.

अवघ्या १४९ रुपयांचा प्‍लॅन

अनेकजण पैशाचा खूप विचार करत असतात. अनेकांना एकदम पैसे खर्च करताना जीवावर येत असल्याचे आपण पाहतो. आणि म्हणून तुमच्यासाठी jio कंपनीने ही ऑफर आणली आहे. Jio hi कंपनी आपल्या ग्राहकांचा नेहमी विचार करून आपला बिझनेस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्लॅनमध्ये jio आपल्या ग्राहकांसाठी २० दिवसांसाठी पर डे १ जीबी डाटा उपलब्ध करून देत आहे. तसेच तुम्हाला रोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो. सोबतच तुम्हाला जिओ टीव्ही, आणि जिओ सिनेमाचा देखील लाभ घेता येणार आहे.

आणखी एक प्‍लॅन

अनेकांना दररोज दीड gb डाटा पुरत नसेल तर, हा प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जर तुमच्या डाटा प्लॅनमधून तुमचा दिवसाचा डाटा संपला असेल आणि, दररोज हेच होणार असेल तर, तुमच्यासाठी हा प्लॅन उत्तम ठरणार आहे. या पलांमध्ये तुम्हाला १२१ रुपयांमध्ये १२ जीबी डेटा तसेच ६१ रुपयांमध्ये ६ जीबी, २५ रुपयांमध्ये २ अशा पद्धतीने jio चे प्लान तुम्हाला मिळणार आहेत. या प्लॅनची मर्यादा तुमच्या मूळ प्लॅन इतकीच आणणार आहे.

हे देखील वाचा.  लज्जास्पद! ‘आशा वर्कर’ यांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये पुरुषाचे लिंग; या सरकारने लिंग’पिसाटांचा मांडलाय…

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार.com/news/6316/.

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल..

Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.