रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार…

0

शासनाने अनेक उपाययोजना करून देखील, अजूनही बऱ्याच प्रमाणात रेशन दुकानातील धान्यांचा काळा बाजार सुरूच असल्याचे पाहायला मिळते. गोरगरिबांच्या हक्काचं राशन त्यांना मिळत नसल्याने, शासनाने बायोमेट्रिक ही प्रणाली सुरू केली. मात्र ही प्रणाली सुरू करून देखील अनेक राशन दुकानदार गरिबांच्या हक्काचं राशन देत नसल्याचे समोर आले आहे. आपण आपल्या गावातून राशन घेतो, मात्र राशन घेत असताना दुकानदार आपल्याला पावती देत नाही. हा प्रकार आता अनेक गावात समोर येऊ लागला आहे.

सर्व्हर डाऊन झाल्याचे कारण सांगून, दुकानदार कोणालाही पावती देत नसल्याचं, अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. एखाद्या ग्राहकांनी पावती मागितलीच, तर तो एका चिठ्ठीवर हस्तलिखित धान्य लिहून देत असल्याचे, प्रकार देखील समोर येऊ लागले. या सगळ्या प्रकरणाची दखल घेत शासन देखील लाभार्थ्यांना दर महिन्याला किती धान्य मिळाले आहे, त्याची सगळी माहिती एका वेबसाईटवर उपलब्ध करतं.

शासनाने सुरू केलेल्या या वेबसाईटवर आता ग्राहकांना दर महिन्याला आपल्याला किती रुपयांनी किती धान्य मिळाले? हे घरबसल्या पाहता येणार असल्याने, काही प्रमाणात ग्राहकांची होणारी लूट आता थांबणार असल्याचे, चित्र पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील सर्वसामान्यांना दर महिन्याला मिळालेला आपला माल कुठे चेक करायचा आणि कसा? यासंदर्भात अजूनही पुरेशी माहिती नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला दर महिन्याला किती माल मिळतो? आणि तो कसा चेक करायचा? याविषयी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत.

रेशन कार्डवरील रेकॉर्ड

तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाईन पाहण्याकररीता सर्वप्रथम mahafood.gov.in असं सर्च करणं आवश्यक आहे. mahafood.gov.in असं सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे महाराष्ट्र सरकारची अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट उघडणार आहे. ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला उजवीकडच्या कोपऱ्यात जो ऑनलाइन सेवा हा पर्याय आहे, बरोबर त्या पर्यायाखाली ऑनलाइन रास्त भाव दुकान या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे.

ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला, AePDS-सर्व जिल्हे, हा पर्याय दिसणार आहे. तुम्हाला बरोबर याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला AePDS (Aadhaar enabled Public Distribution System) अशा नावाचं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला या पेजवर जो रिपोर्ट हा पर्याय आहे, त्याच्याखाली RC Details असा एक पर्याय दिसेल, तुम्हाला बरोबर त्यावरच क्लिक करायचे आहे.

आरसी डिटेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर RC Details नावाचं आणखी एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं असेल, बरोबर ना. याठिकाणी तुम्हाला जे पर्याय दिसत आहेत, ते सर्व टाकायचे आहेत. महिना, वर्ष तसेच SRC म्हणजे, 12 अंकी रेशन कार्ड नंबर देखील टाकणं गरजेच आहे. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सब्मिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेशन कार्ड ओपन झालेला दिसेल.

रेशन कार्ड ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला ‘मेंबर डिटेल्स’ या पर्यायमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती दिलेली दिसेल. यात तुम्हाला जिल्हा, तालुका, Fair price shop (FPS) नंबर दिसणार आहे. इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मिळणारे धान्य कोणत्या योजनेअंतर्गत मिळतं, त्या योजनेचं नाव दिसेल. दारिद्रय रेषेखालील, प्राधान्य गट, अंत्योगट गट असं वर्गीकरण याठिकाणी तुम्हाला दिसत असेल. कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांचे वय, त्याचबरोबर आधार कार्डचं Authentication (प्रमाणीकरण) झालं की नाही, ते सांगितलेलं दिसेल.

यानंतर तुम्हाला Entitlement for RC या रकाण्यामध्ये कुटुंब या रेशन कार्डनुसार किती किलो धान्य मिळवण्याकरिता पात्र असणार आहे, याची माहिती दिलेली असेल. “Authentications for RC in February2022” या रकान्यासमोर या महिन्यात कुटुंबातला कुठला व्यक्ती रेशनचं धान्य घेउन गेला आहे याची माहिती दिलेली दिसेल.

आतापर्यंत आपण रेशन कोणी खरेदी केलं, हे पाहिलं. मात्र आता आपण किती धान्य खरेदी केलं याविषयी माहिती घेऊ या, तर आपण धान्य कुठल्या महिन्यात किती खरेदी केलं, याविषयी माहिती घ्यायची असल्यास तुम्हाला, Transaction Details for RC या रकान्यात जावे लागेल.

धान्याचा दर कसा पाहायचा?

तुमचं रेशन कार्ड कुठल्याही प्रकारचं असलं तरीदेखील तुम्हाला तुम्ही घेतलेला माल किती रुपयांनी मिळाला आहे, हे पाहता येणार आहे. याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेऊया.

ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला mahaepos.gov.in असं सर्च करावे लागेल. ओपन झालेल्या वेबसाईटच्या होमपेजवर उजवीकडील Policy & Price हा पर्याय दिसल्यानंतर तुम्हाला बरोबर याच पर्यायासमोर क्लिक करणं गरजेच आहे. यानंतरAAY (अंत्योदय), APL (दारिद्र्य रेषेवरील), NPH (प्राधान्यगटात नसलेली कुटुंब) PPH (प्राधान्यगटातील कुटुंब) अशा सर्व प्रकारचा दर याठिकाणी नमूद असल्याचे तुम्हाला दिसेल.

हे देखील वाचा Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन  केवळ..

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल...

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल...

या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड..

Mahindra Thar:  महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काह

नवाब मलिकांचा खेळ खल्लास! मलिकांनीच मुंबईत बॉम्बस्फोट घडवले; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक....

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.