Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ…

0

Xiaomi 11T Pro 5G: Xiaomi ने अनेक कंपन्यांचा बाजार उठवल्याचं पाहिला मिळतं. खूप कमी काळात Xiaomi मोबाईल कंपनीने (mobile company)  ग्राहकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. Xiaomi हा ब्रँड भारतात येण्यापूर्वी अनेक मोबाईल कंपन्यांच्या किमती ह्या डोंगराएवढ्या होत्या. मात्र जेव्हापासून Xiaomi हा बॅण्ड बाजारात उतरला तेव्हापासून अनेकांना आपल्या प्रॉडक्टवरच्या किंमती कमी कराव्या लागल्या. कमी किंमतीमध्ये अनेक भन्नाट फीचर्स आणि आकर्षक फोन या कंपनीने ग्राहकाला दिल्यामुळे ग्राहकांनी देखील या कंपनीला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.

शाओमी (xiaomi) हा ब्रँड अल्पावधीतच लोकप्रिय झाला. ग्राहकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे या ब्रँडने आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन (smartphone) बाजारात आणले. कमी किंमत, आकर्षक फोन आणि भन्नाट फीचर्स यांचा ताळमेळ घालत, या कंपनीने ग्राहकांच्या मनावर राज्य केलं, आणि अजूनही करत आहेच. अनेक तरुण वर्ग शाओमी या ब्रँडकडे वळल्याचं पाहायला मिळतं. नेहमी सारखं या ब्रँडने आता पुन्हा एकदा आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणला असून, ग्राहकांना वेड लावलं आहे.

Amazon Mobile Savings Days या सेलमध्ये Xiaomi चा हा फोन आता ग्राहकांना ऑफर्समध्ये खरेदी करता येत असून, या फोनने अनेकांना वेड लावलं आहे. Xiaomi 11T Pro 5G असं या फोनचे नाव असून, हा फोन Amazon Mobile Savings Days सेलमध्ये तब्बल 10 हजारांनी स्वस्त मिळतोय. विशेष म्हणजे, जर तुमच्याकडे कूपन असेल तर, हा फोन स्मार्टफोन तुम्हाला आणखीन एक हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे‌. सोबतच हा फोन तुम्हाला no cost EMI वर देखील खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोनची खासियत

आतापर्यंत भारतामध्ये खूप कमी 5g फोन लॉन्च झाले आहेत. मात्र त्यांची किंमत देखील तेवढीच मोठी आहे. Xiaomi 11T Pro 5G या फोनवर तुम्हाला Amazon Mobile Savings Days या सेलमध्ये मोबाईलच्या मूळ किमतीपेक्षा आणखीन दहा हजारांनी स्वस्त फोन खरेदी करता येणार आहे. भारतामध्ये हा प्रीमियम 5G फोन 108MP कॅमेरा त्याचबरोबर 5000mAh बॅटरी तसेच 12GB एवढा मोठा RAM Xiaomi ने आपल्या Xiaomi 11T Pro 5G या फोनला दिला आहे. त्याबरोबरच फास्ट चार्जिंग होण्यासाठी 120W चार्जर देण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला केवळ 17 मिनिटांत फुल चार्ज होताना पाहायला मिळणार आहे.

सेलमध्ये या आहेत ऑफर्स. ..

Xiaomi ने आपला नवा ब्रँड बाजारात आणताना सगळ्या गोष्टींचा विचार करून हा स्मार्टफोन मार्केटमध्ये उतरवला आहे. 11T Pro 5G या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत पन्नास हजर रुपये आहे. मात्र Amazon Mobile Savings Days या सेलमध्ये हा फोन ग्राहकांना केवळ चाळीस हजार रुपयांना मिळणार आहे. जर तुमच्याकडे कूपन असेल, तर 1000 रुपयांचे डिस्काउंट देखील तुम्हाला या खरेदीवर मिळणार आहे. सोबतच तुम्हाला, हा फोन No Cost EMI वर देखील विकत घेता येणार आहे.

जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स

आपण कुठलाही स्मार्टफोन खरेदी करताना त्याची किंमत, त्याचा प्रोसेसर, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी बॅकअप या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घेत असतो. मात्र जर तुमचं बजेट ठीकठाक असेल, आणि तुम्ही आयुष्यातला एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर, तुम्ही या फोन व्यतिरिक्त कुठेही पाहण्याची गरज नाही. कारण या फोनमध्ये तुम्हाला क्वॉलकॉमचा जबरदस्त Snapdragon 888 प्रोसेसर मिळणार आहे. 11T Pro 5G हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 चालत असल्याने याचा स्मूथनेसही कमालीचा असणार आहे.

रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ..

या फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट त्याचबरोबर 20:9 अस्पेक्ट रेश्यो तसेच 480Hz टच रिस्पॉन्स रेट देखील मिळणार असल्याने, हा फोन आयफोनला देखील पाठीमागे सोडत आहे. तसेच डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरबरोबरच 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले मिळणार असल्याने, तुम्हाला गेम तसेच तसेच मूवी पाहण्याचा फील कमालीचं असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम, 256GB स्टोरेज देखील मिळू शकणार आहे.

    ही आहे खासियत

Xiaomi 11T Pro या फोनचा चार्जिंग स्पीड कमालीचा देण्यात आला आहे. Xiaomi च्या फोनमध्ये तब्बल 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे . सोबतच 120W एवढ्या मोठ्या वेगाने हा फोन चार्ज होतो. Xiaomi हा फोन केवळ 17 मिनिटांपर्यंत 100 टक्के चार्जिंग होण्याचा दावा केला आहे. अनेक मोबाईल बॅटरी बॅकअप चा विचार केला तर आपल्याला वारंवार चार्जिंग करून कंटाळा येतो, मात्र या फोनमध्ये असं होताना पाहायला मिळणार नाही.

आऊटस्टँडिंग कॅमेरा

शाओमीचे फोन हे आकर्षक लूक आणि उत्तम कॅमेरासाठी ओळखले जातात. तुम्ही एका आऊटस्टँडिंग कॅमेराच्या शोधात असाल, तर हा फोन तुम्ही परचेस करणं गरजेचं आहे. Xiaomi 11T Pro या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. जो सर्वोत्तम आहे. या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये तुम्हाला तब्बल 108MP चा कॅमेरा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा, सॅमसंग HM2 मुख्य सेन्सरह मिळणार आहे. 8MP, 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स त्याचबरोबर 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर असणार आहे. जो 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला देखील सपोर्ट करताना पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल...

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल..

‘या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड..

Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही…

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.