Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल..

0

अलिकडच्या काळात सोशल मीडियाचा (social media) वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोशल मीडियावर कधी काय व्हायरस होईल, हे सांगता येत नाही. अनेक धक्कादायक घटना बरोबरच काही मजेशीर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. माणसांबरोबरच प्राण्यांचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असल्याचं आपण अनेक वेळा पाहतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

एका कच्चा रस्त्याच्या कडेला दोन बैलांमध्ये (bulls) कडाक्याची झुंज सुरू असताना, अचानक पांढऱ्या रंगाचा एक कुत्रा (dog) मध्ये जातो, आणि पुढे जे काही होतं, ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात, कधीही दुसऱ्याच्या भांडणातमध्ये पडू नये, नाहीतर त्याचे परिणाम आपल्यालाही मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. असंच या कुत्र्याच्या बाबतीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

काळा आणि पांढरा रंगाचे दोन बैल रस्त्याच्या कडेला जोरदार मारामारी करताना पाहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओ दोघांची झुंज पाहण्यासारखी असल्याचं दिसतं. दोघेही एकमेकांना हरवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. कोणीही हार मानायला तयार नसतानाच, अचानक या दोघांच्या झुंजीत कुत्रा देखील येतो. तसं पाहायला गेलं तर, या व्हिडिओत तांबडा आणि पांढरा रंगाचे दोन कुत्रे या झुंजीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तांबडा कुत्रा पाठीमागे थांबून पांढरा कुत्रा अखेर या लढतीत सामील होतो.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळत आहे, घोड्यावर बसलेला एक व्यक्ती या झुंजीची मज्जा घेत असून, शूट देखील करताना पाहायला मिळत आहे. या दोन्ही बैलांची लढत रंगतदार अवस्थेत असतानाच, पांढऱ्या कुत्र्याने या लढतीत प्रवेश केला. कुत्रा या लढतीत आल्याने पांढऱ्या रंगाच्या बैलाला प्रचंड चिड आली, आणि त्याने कुत्र्याचा कान आपल्या तोंडाने पकडून दूर फेकून दिलं. पांढऱ्या कुत्र्याची अवस्था पाहून त्याच्या सोबत असणारा तांबडा कुत्रा देखील हा प्रकार पाहून धूम ठोकून पळून गेल्याचे, व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

पांढऱ्या कुत्र्याला पांढऱ्या बैलाने आपल्या तोंडात पकडून फेकून दिले, मात्र याच संधीचा फायदा घेत, काळा बैलाने पांढऱ्या बैलाला मारल्याच पहिला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सना कमालीचा आवडला असून, या व्हिडिओला लाईक्स आणि व्हूज देखील कमालीचे मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची केलेल्या कमेंट्स फारच मजेशीर असल्याचं, पाहायला मिळतं. या व्हिडिओचा अनेकांनी आनंद घेतल्याचं दिसून येत असून, हा व्हिडिओ ir_geographic नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.

काय म्हणाले? नेटीझन्स

ir_geographic नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक कमेंट आणि शेअर देखील केलं आहे. एका यूजर्सने म्हटलं आहे, कधीही दुसऱ्याच्या भांडणात विनाकारण पडायचं नाही. नाहीतर याचे खूप मोठे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कदाचित आपली कंबर देखील मोडू शकते, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. “दोघांच्या भांडणात तिसऱ्याची वाजली पुंगी” एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने म्हंटले आहे, मी लहानपणी वाचलं आहे, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र इथे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ न होता, पुंगी वाजलेली आहे.

हे देखील वाचा Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

‘या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड..

रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ….

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली…

अखिलेश यांना पोस्टल बॅलेटने मतदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी योगींचा दणका; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

राज कुंद्रा नंतर शिल्पा शेट्टीच्या आईनेही शिल्पाचे तोंड केलं काळ; प्रकरण वाचून बसेल धक्का..

यावर क्लिक करा आणि पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.