अखिलेश यांना पोस्टल बॅलेटने मतदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना योगींचा दणका; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर..

0

Uttar Pradesh elections 2022: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Uttar Pradesh CM Yogi adityanath) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. अनेकांनी उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपसाठी आव्हानातमक असल्याचे म्हंटले, मात्र सगळ्यांच्या अंदाज चुकवत, भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत तब्बल 273 जागा जिंकल्या. मात्र समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी मात्र या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

निकालापूर्वी एक दिवस अगोदर सपाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम (evm) भरून घेऊन जाणारा, ट्रक पकडल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. प्रचंड गदारोळ झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्टीकरण देताना ईव्हीएम मशीन प्रशिक्षणासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. मात्र एक दिवस अगोदर प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन कशा काय जाऊ शकतात, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्याबरोबरच संबंधित प्रशासनाने आम्ही यासंदर्भात प्रोटोकॉल पाळला नाही असे देखील म्हटलं.

10 मार्चला जेव्हा निकालाचे पहिले कल हाती येऊ लागले, तेव्हा भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करेल असं चित्र पाहायला मिळालं. सुरूवातीपासूनच आघाडीवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने तब्बल 273 जागा जिंकत पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये एक हाती सत्ता मिळवली. भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीत विजय झाला असला तरी, दुसरीकडे अखिलेश यादव यांनी मात्र या विधानसभा निवडणुकीत आपण जिंकलो असल्याचा दावा केला आहे.

चार दिवसापूर्वी अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत या संदर्भातील आकडेवारी देखील जाहीर केली. आपल्या ट्विटरवरून एक ट्विट करताना म्हटले आहे, पोस्टल बॅलेटमध्ये सपा-आघाडीला 51.5% मते मिळाली आहेत, असा सर्वे समोर आला आहे. आणि त्यानुसार, 304 जागांवर सपा-आघाडीचा विजय होत आहे. आणि हेच निवडणुकीचे सत्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने हा विजय सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मिळवला आहे असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर, पोस्टल बॅलेटने झालेले मतदान आणि लागलेला निकाल या आकडेवारी खूप तफावत आहे. पोस्टल बॅलेटने मतदान करणाऱ्यांच्या आकडेवारीचा विचार केला तर, यानुसार आम्हाला तीनशे चार जागांवर विजय मिळतोय. असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच त्यांनी आम्हाला पोस्टल बॅलेटने मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार देखील मानले आहेत. सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे अखिलेश यादव यांनी आभर मानल्यामुळे आता नवीनच वाद समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक वर्गाने, समाजवादी आणि आघाडीला मतदान केल्याचा स्पष्ट होत आहे. ज्यांनी पोस्टल बॅलेट नुसार मतदान केलं आहे, अशा मतदारांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट नाकारल्याचे दिसते. आता यामुळेच या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला नाकारल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

पाच वर्षात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राज्यात आपला मनमानी कारभार केला आहे. कायद्याने इन-काउंटर करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. तरीदेखील मोठ्या अभिमानाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आम्ही एवढे इन काउंटर केले असं सांगतात. ही कारवाई विरोधकांच्या संबंधितांवरच होत असते. असा देखील आरोप गेल्या पाच वर्षांपासून होत असून, त्यांना तो सोसावा लागला आहे. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नाकारल्यामुळे, आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीमधून काढून टाकणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचारेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ...

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली....

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.