लज्जास्पद! ‘आशा वर्कर’ यांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये पुरुषाचे लिंग; “या सरकारने लिंग’पिसाटांचा मांडलाय..,”

0

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या योजनेत महत्त्वाची भूमिका आरोग्य विभागाने बजावली आहे. कुटुंब नियोजन करण्यासाठी आरोग्य विभागाने आशा वर्कर्सना देखील जबाबदारी दिली आहे. कुटुंब नियोजन करण्यासाठी त्यांना एक किट देण्यात आले आहे. मात्र आता या कुटुंब नियोजन किटची जोरदार चर्चा होत असून, विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

कुटुंब नियोजन करण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये पुरुषाचं रबरी लिंग असल्याने, या सरकारवर जोरदार टीका होत आहे ,तर अनेकांकडून कौतुक देखील होताना पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील सरकारने घेतलेल्या, निर्णयाचे कौतुक केले आहे. मात्र दुसरीकडे चित्रा वाघ आणि माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

यासंदर्भात बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, “लोकसंख्या ही राज्याची एक मोठी समस्या आहे. यावर लोकांना जागृत करणे आवश्यक आहेच. आणि म्हणूनच आशा वर्कर्सना समुपदेशनासाठी आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाचे हे कीट दिलं आहे. यात रबरी लिंग असल्याने अनेकांनाआश्चर्य वाटत आहे. मात्र यात आश्चर्यचकित होण्यासारखे काहीही नाही. हे लिंग प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलं आहे. या रबरी लिंगाचं प्रात्यक्षिक दाखवणं, आणि त्याची अंमलबजावणी करणं देखील महत्वाचे आहे. ग्रामीण भागात या उपक्रमाचे प्रबोधन करणे फार गरजेचे असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

संकुचित मानसिकता न ठेवता खासकरून ग्रामीण भागात आशा वर्कर्सनीही कुटुंब नियोजनासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये ज्या वस्तू दिल्या आहेत, त्या सर्व घेऊन पुढे गेले पाहिजे. हे पुरुषाचे रबरी लिंग घेऊन मी महिलांसमोर कसे जाऊ, ही मानसिकता संकुचित आहे. हा विचार बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने आपल्या कीटमध्ये रबरी लिंग देण्यामुळे वाद निर्माण झाला असला, तरी यात कोणतीही चूक नसल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

आशा वर्कर नाराज

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातल्या आशा वर्कर कमालीच्या नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. को रो ना काळात प्रचंड मेहनत करून, जीव मुठीत धरून आशा वर्कर यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. मात्र आता याच आशा वर्कर यांच्यावर राज्य सरकारने खूपच विचित्र पेच निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सना राज्य सरकारने दिलेल्या या किटचे वाटप करण्यात आले असून, या किटचे सगळे प्रात्यक्षिक घरोघरी जाऊन दाखवण्यास सांगितले, असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आशा वर्कर समोर मोठा पेच निर्माण झाला असून, त्या कमालीच्या नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यावर अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलं नाही.

लिंग’पिसाटांचा मांडलाय…

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार ह ल्ला चढवला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करताना म्हटले आहे, “या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा! आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५ रुपये देण्याऐवजी हे काहीतरी नवीनच, कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी अजूनही त्यांचे पैसे दिले नाहीत. आणि हे नवीन काहीतरी भलतंच काढलं आहे. थोडी लाज ठेवा. मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका” असं ट्विट करत, चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे देखील वाचारेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार…..

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल...

या’ कारणासाठी फडणवीसांनी रचला कट; फडणवीसांच्या सांगण्यावरूनच MIM ने ठाकरे सरकारला ऑफर दिल्याचं उघड..

रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ..

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.