मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा

0

लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक जण आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार हा कसा असावा, याविषयी इमॅजिन करत असतो. पूर्वी नवरा नवरी एकमेकांना लग्न झाल्यानंतरच पाहिचे, असं बोललं जातं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता लग्न जमल्यानंतर अनेक जण एकमेकांना भेटतात देखील. सतत फोनवर देखील बोलत असल्याचं, आपण पाहिलं असेल. लग्न जमल्यानंतर दोघेही लग्नानंतर आपलं आयुष्य कसं असेल, याविषयी बोलत असतात, इमॅजिन करत असतात. त्यामुळे लग्नापूर्वीच दोघांमध्ये अटॅचमेंट वाढलेली असते. मात्र अशात जर लग्न दोन दिवसांवर आलं असताना, नवरी पळून गेली तर काय होईल? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरबा जिल्ह्यातील भालू सटका नक्तखार या गावात संजय यादव हा तरुण आपलं आयुष्य गुण्यागोविंदाने जगात होता. या तरुणाचे लग्न कटघोरा या गावातील एका तरुणीशी जमलं होतं. आपलं लग्न जमलं असल्याने हा तरुण प्रचंड खुश होता. मात्र त्याला आपल्या होणाऱ्या पत्नीचे बाहेर अफेर सुरू आहे, याविषयी जराही अंदाज नव्हता. आपल्या होणाऱ्या बायको सोबत संजय हा अनेक स्वप्न रंगवत होता. लग्नानंतर आपलं आयुष्य कसे असेल पाहिजे, याचा त्याने सगळा विचार केला होता. मात्र त्याला आपल्या सोबत असेही काही घडेल, याचा साधा विचारही डोक्यात आला नव्हता.

इतरांप्रमाणे संजय देखील आपले लग्न होणार म्हणून, खूप आनंदात होता. आपल्या मित्रांसोबत त्याने लग्नाची सगळी तयारी देखील केली होती. आपलं लग्न हे धूमधडाक्यात व्हावे, असा त्याचा मानस होता. मित्र देखील संजयचे लग्न होणार म्हणून खूप खुश होते. मात्र मध्येच पाल चुकचुकली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. सगळं व्यवस्थित सुरू असताच, संजयच्या होणाऱ्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत लग्नाच्या दोन दिवस अगोदर धूम ठोकली.

ठरल्याप्रमाणे 19 मार्चला साखरपुडा होणार होता. आणि 22 मार्चला संजयचे लग्न होणार होतं. मात्र 19 मार्च हा दिवस उजाडला आणि हाच दिवस त्याच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला. या दिवशी म्हणजे 19 मार्चला संजयचा साखरपुडा होणार होता. साखरपुड्याला जाण्याची सगळी तयारी झाली होती. कुटुंब आणि आपल्या मित्रासोबत साखरपुडा करण्यासाठी संजय सासरी निघाला. मात्र तेवढयात त्याला एक धक्का देणारी बातमी समजली. आणि त्याला आपल्या आयुष्यातलं सगळं संपलं असं वाटू लागलं. लग्नानंतर आपलं आयुष्य कसे असेल, याचं वर्णन त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत केलं होतं. तीच पत्नी साखरपुड्या दिवशी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं त्याला समजताच तो तुटून गेला.

दोन दिवसांवर लग्न आले असतानाही अचानक असं कसं काय घडलं, याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. लग्नाची सगळी तयारी झाली असताना, अचानक आपली होणारी पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. आता लोक काय म्हणतील,मित्रांना काय सांगायचं याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. आणि त्याच्या मनात वाईट विचारही यायला सुरुवात झाली. या घटनेमुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याने टोकाचं पाऊल उचलले. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला, फक्त विचारच नाही, तर त्याने त्या दिशेने पाऊल देखील टाकलं‌. आणि एकच गोंधळ उडाला.

या घटनेमुळे तो प्रचंड दुखी झाला, आता आपला जगून काहीही उपयोग नाही, हा विचार त्याच्या मनात आल्याने, त्याने वडिलांच्या एक्स्पायर झालेल्या शुगरच्या तब्बल 17 गोळ्या खाऊन टाकल्या. कुटुंबातील सदस्यांना संजयने गोळ्या खाल्ल्याचं समजताच, संजयला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुदैवाने संजय शुद्धीवर आला आणि डॉक्टरांनी देखील आता घाबरण्याचे काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.

आता या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी पीडित तरुणाचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे. या सर्व प्रकारातनंतर मुलीच्या घरच्यांचे मात्र यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही. पळून गेलेल्या मुलासोबत आपल्या मुलीचं खूप दिवसांपासून अफेर असल्याचं मुलीच्या घरच्यांना देखील माहिती असल्याची, माहिती आता समोर आली आहे.

हे देखील वाचा उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर..

लज्जास्पद! ‘आशा वर्कर’ यांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये पुरुषाचे लिंग; या सरकारने लिंग’पिसाटांचा मांडलाय....

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार….

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ..

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल.

.Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.