डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी..

एखादा माणूस जर कुठल्याही दुर्घटनेत बेशुद्ध पडला, तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्वरित सीपीआर(CPR) देण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. एवढंच नाही, तर आता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना देखील विद्यार्थ्यांना ‘first aid’ हा विषय शिकवला जातो. यात बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सीपीआर कसा द्यायचा, हे देखील शिकवले जाते. अनेक जण सीपीआर देऊन अनेकांचे जीव वाचवल्याच्या घटना आपण सोशल मीडियावर वाचल्या असतील. मात्र एखाद्या व्यक्तीने बेशुद्ध पडलेल्या प्राण्यांचे तोंड आपल्या तोंडात घेऊन त्याचा जीव कधी वाचवल्याचं ऐकलं आहे का?

यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेशुद्ध पडलेल्या माकडाच्या पिल्लाला CPR च्या साह्याने तमिळनाडूच्या एका टॅक्सी ड्राइव्हरने त्यांचे प्राण वाचवल्याची घटना घडली असून, या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. धावपळीच्या युगात रस्त्यावर साधा एक्सीडेंट झाला, तरी आपण माणसाला कधी दवाखान्यात निघून जात नाही. मात्र रस्त्याच्या कडेला एका माकडाचे पिल्लू बेशुद्धावस्थेत पडल्याचे रस्त्याने जात असणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरने पाहिले, आणि त्या माकडाला सीपीआर दिला.

सीपीआर देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा टॅक्सी ड्रायव्हर माकडाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जिवाचा किती आटापिटा करतो आहे, हे पाहून डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. माकडाच्या पिल्लाचा जीव जाऊ नये म्हणून, हा टॅक्सी ड्रायव्हर त्या पिल्लाच्या चक्क तोंडात तोंड घालून त्याला आपला श्वास देत असल्याचे दिसत आहे. कधी तो माकडाच्या तोंडात तोंड घालून श्वास देताना दिसत आहे, तर कधी त्याच्या छातीवर आपल्या हाताने दाब देत आहे. या माकडाच्या पिल्लाचा जीव जाऊ नये म्हणून, त्याची झालेली अवस्था पाहून, व्हिडीओ पाहणार्‍याच्या डोळ्यातून अश्रू येतील.

प्रचंड मेहनतीनंतर माकडाचा पिल्लाला वाचवण्यात त्या व्यक्तीला यश येते. जसं हे माकड आपले डोळे उघडते, आणि आवाज करतं, तसंच हा टॅक्सी ड्रायव्हर त्या पिल्लाला आपल्या छातीसोबत कवटाळतो. हा व्यक्ती प्रचंड भावनिक झाल्याचं दिसून येतं. आपण माकडाच्या पिल्लाचा जीव वाचवण्यात यशस्वी झाल्याचा आनंद त्यांच्या गगनात मावत नसल्याचं या व्हीडिओत पाहायला मिळतं. आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाअश्रू टपाटपा पडत असल्याचे देखील यावेळी पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून, अनेकांनी या ड्रायव्हरचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केल्याचं पाहिला मिळतं

 काय म्हणाले नेटकरी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून,अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक करताना, हे अविस्मरणीय असल्याचे म्हंटले आहे. एका युजर्सने म्हंटले आहे. हे अद्भुत आहे, धावपळीच्या जीवनात लोकांना एकमेकांकडे पाहण्याचाही वेळ मिळत नाही. सोशल मीडियामुळे अनेकजण भावना शून्य आले आहेत. लोक खूप असंवेदनशील झाल्याचे पाहायला मिळते. मात्र आज सोशल मीडियावर काहीतरी चांगल पाहायला मिळाले असून, यामुळे जगात अशा माणसांमुळे माणुसकी टिकून आहे असं वाटतं.

एक युजर्स म्हणाला, या महान व्यक्तीने माकडाच्या पिल्लाला CPR च्या मदतीने प्राण वाचवले याचे कौतुक शब्दात होऊच शकत नाही. मात्र याच्यापेक्षा पिल्लाचे प्राण वाचवल्यानंतर या माणसाला झालेला आनंद आणि त्याच्या डोळ्यातून वाहत असलेले आनंदाअश्रू हे पाहून माझ्याही डोळ्यातून पाणी आले. यावरूच आपण त्या माणसाच्या दृष्टीने या घटनेचे किती महत्व आहे हे समजू शकतो.

हे देखील वाचा IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ….

‘हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा…

उन्हाळ्यात ग्राहकांची दिवाळी; Reliance Jio च्या या सहा धमाकेदार अॉफरने सगळेच झालेत हैराण, वाचा सविस्तर…

लज्जास्पद! ‘आशा वर्कर’ यांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये पुरुषाचे लिंग; या सरकारने लिंग’पिसाटांचा मांडलाय…..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार…

Amazon sale: Xiaomi ने आता आयफोनचाही उठवला बाजार; 108MP कॅमेरा,12GB रॅमचा फोन केवळ…..

Viral Video: एका मुली समोरच ‘या’ दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.