Viral video: म्हतारं आज उद्यावर आलंय, पण मस्ती काही गेली नाही; नशीब वयाचा विचार करून बैलाने सोडून दिले नाहीतर..

0

नको त्या ठिकाणी काड्या कराची माणसाला सवय झालेली आहे. विनाकारण एखाद्याची खोड काढायची, आणि त्याची मजा घ्यायची, हा अनेकांचा छंदच बनला असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळा आपल्याला अशा खोडी करून आनंद मिळेलही, मात्र कधीकधी आपला बाजार देखील उठू शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला असून, रस्त्याने जात असणाऱ्या एका म्हाताऱ्याने बैलाची खोड काढली, आणि त्याची पार वाटच लागली.

आपण अनेक वेळा पाहतो रस्त्याने जात असताना खासकरून तरुण मुलं कुत्र्याला विनाकारण दगड मारत असतात, किंवा आणखी एखादा प्राणी सापडला तर त्याला देखील दगड मारतात. आणि त्याच्या दुःखावर खुश होऊन आनंद व्यक्त करतात. मात्र हे योग्य नसून, एखाद्याला विनाकारण त्रास देणं, हे माणसाचा जातीला कदापिही शोभणारं नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून, माणसाकडे पाहिलं जातं. मात्र अलीकडच्या काळात यावर शंका यायला लागली आहे. हा व्हिडिओ पाहून देखील तुम्ही असंच म्हणाल.

एखाद्याची विनाकारण खोड काढण्यात लहान मुले पटाईत असतात, इथपर्यंत ठीक आहे. एक वेळ त्यांची बुद्धिमत्ता आपण समजू शकतो. मात्र या कॅटेगिरीत जर आज उद्यावर आलेली म्हतारी माणसं देखील भाग घेत असतील, तर काही बोलायलाच नको. असाच एका वयोवृद्ध माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी या आजोबांची खिल्ली उडवली आहे. रस्त्याने काटीवर जात असणाऱ्या आजोबांनी रस्त्याच्या कडेला आपल्या धुंदीत शांत उभा असलेल्या बैलाला विनाकारण काठी मारली, आणि त्यानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पनाही करणार नाही.

   असं कसं झालं

त्याचे झाले असे, एका रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाचा बैल आपल्या धुंदीत शांत रवंथ करत होता. बैलाच्या अपोजिट साईटला बरोबर दोन मुलं गप्पा मारत बसली होती. त्याच दरम्यान त्या रस्त्याने एक वयोवृद्ध व्यक्ती काठी टेकवत टेकवत रस्त्याने जात होते. काही गरज नसताना रस्त्याच्या कडेला शांत उभा असलेल्या बैलाला आजोबांनी काठी मारली. आजोबांनी विनाकारण आपल्याला काठी मारली, ही गोष्ट बैलाला अजिबात आवडली नाही. आणि त्याचा इगो हर्ट झाला. अन् मग काय भिमासारखी ताकत असणारा बैल गुपचुप का बसेल. त्यानेही मग आपला जलवा त्या आजोबांना दाखवलाच.

आपल्याला विनाकारण आजोबांनी काठी मारली, ही गोष्ट त्याच्या पचनी पडली नाही. आणि बैलाने मागे वळून आजोबाला शिंगावर घेऊन उचलून फेकून दिलं. आजोबांना त्यांच्या कर्माची एवढी शिक्षा पुरेशी आहे, कदाचित असं बैलाला वाटलं असेल, आणि म्हणून त्याने त्या आजोबांवर पुन्हा हल्ला न करता जीवदान देऊन टाकलं. हे सर्व व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला दोन तरुण बसले होते, ते उठून आजोबाला उठवण्यासाठी जाऊ लागले, मात्र आजोबा स्वतःहून उठून उभा राहिल्याचे देखील या व्हीडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

काय म्हणाले नेटीझन्सच्या?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ, वन अधिकारी सुसंता नंदा यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. एका यूजर्सने या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले आहे, आज उद्या आजोबांना तिकीट मिळेल, मात्र आजोबाची मस्ती अजूनही गेलेली नाही. नशीब त्या बैलाने वयाचा विचार करून आजोबांना सोडून दिले, नाहीतर आजोबांचं आजच तिकीट फिक्स झालं असतं. तर दुसर्‍या एका युजर्सने म्हटले आहे, आम्हाला आमचे पूर्वज म्हणायचे, चांगलं कर्म केलं की, पुढच्या जन्मी फळ भेटतच. मात्र आमचे पूर्वज खोटे बोलत होते, माणसाला कर्माचे फळ हे क्षणात मिळते, हे आजच्या व्हिडिओतून आम्हाला शिकायला मिळालं. अशा अनेक भन्नाट कमेंट्स या व्हिडिओला पाहून नेटीझन्सनी दिल्या आहेत.

हे देखील वाचासेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सवि..

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी…

Viral video: दोन बैलांची झुंज कुत्रा गेला सोडवायला, अन् घडलं भलतंच…; व्हिडिओ पाहून होईल..

IPL 2022: आयपीएल पाहण्यासाठी आता Disney+ Hotstar ला रिचार्ज करण्याची गरज नाही; ‘असा’ घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.