‘या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart यांचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू
धावपळीच्या जीवनात आपण नेहमी ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत असतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि यामुळेच ग्राहकांच्या सेवेसाठी ऑनलाइनच्या अनेक वेबसाइट असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ग्राहक ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ड (Flipkart) या दोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. मात्र यांच्यापेक्षा देखील स्वस्त आणि खात्रीशीर विक्री करणाऱ्या आणखीन दोन वेबसाइट आहेत, त्या तुम्हाला माहित आहेत का?
जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग (online shopping) कमी किंमतीत खरेदी करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही तुमच्यासाठी मार्केटमधील काही लोकप्रिय ई-कॉमर्स साइट्स घेऊन आलो आहोत. ज्यामधून तुम्ही शॉपिंग केल्यास तुमचे तब्बल एक हजार ते दीड हजार रुपये वाचणार आहेत. होय हे खरं आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ड पेक्षाही या ॲपवर तुम्हाला मोठी सवलत मिळणार आहे.
जर तुम्हाला कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाची वस्तू खरेदी करायची असेल, तर आता तुम्हाला त्यासाठी कुठेही जाण्याची आणि संघर्ष करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता बाजारात अशा दोन वेबसाइट्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी तुम्ही स्वस्त आणि उत्तम वस्तू अगदी कमी किमतीत खरेदी करू शकाल. अनेकांना अमेझॉन आणि फ्लिपकार्ड व्यतिरिक्त शॉपिंगची दुसरी ॲप माहित नाही. मात्र या दोन वेबसाईट पेक्षाही उत्तम वेबसाईट विषय आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या दोन वेबसाइट विषयी तुम्ही जाणून घेतल्यानंतर, याच वेबसाइट वरून तुम्ही अनेक वस्तू खरेदी कराल एवढं मात्र नक्की.
मिशो (Meesho)
मार्केटमध्ये मिशो या वेबसाइटची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे, या वेबसाइटवर असणाऱ्या वस्तूंची किमती ह्या फारच स्वस्त आहेत. मिशो या वेबसाइट प्रमाणे इतर कोणतीही वेबसाइट आपल्याला स्वस्त वस्तू देऊ शकत नाही. जो माल बाजारात ६०० ते ७०० रुपयांत विकला जातो, तोच माल तुम्हाला मिशी वेबसाइटवर १०० ते १५० रुपयांत मिळणार आहे. आणि म्हणूनच या साइटची लोकप्रियता शॉपिंग करणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे.
वेबसाईटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक शॉपिंग प्रेमी आता या वेबसाईटला पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, या साइटवर अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या कमी किमती असल्यातरी अनेक वेळा फ्री होम डिलिव्हरी देखील दिली जात आहे. आणि म्हणून ही वेबसाइट अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे अद्याप तुम्ही या साईटवर खरेदी केली नसेल तर, त्वरित करा. आणि तुमच्या आवडीच्या अनेक वस्तू निम्म्या किमतीत मिळवा.
जेम (GeM)
जेम (GeM) ही एक सरकारी बाजारपेठ आहे, (गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस) जिथून ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकतात. या वेबसाइटचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कल्पना देखील केली नसेल येवढ्या स्वस्त वस्तु तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला आम्ही सांगतोय यावर विश्वास बसणार नसेल, तर तुम्ही इथे जाऊन स्वतः बाजाराच्या किंवा इतर वेबसाइटवरच्या किंमती आणि या वेबसाइटच्या किमतीची तुलना करा. म्हणजे मग तुम्हाला स्वतः कळेल आपण येवढे दिवस किती पैसे विनाकारण वाया घालवले.
हे देखील वाचा. कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर
शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन का पुकारले? वाचा सविस्तर..
केंद्र सरकारच्या ‘या’ धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर वाढतील का? वाचा सविस्तर
राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम