कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..

0

प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीची अवस्था खूपच वाईट होत चालली असल्याचे पाहायला मिळते. उत्पन्न जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी शेतकरी अलीकडच्या काळात मोठ्या परमांत रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येतो. मात्र यामुळे शेतीच मोठ्या प्रमाणत निकासंम होत चालले आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही.

सध्या आपण  जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणत खाली गेल्याचे दिसत आहे.  हे प्रमाण जवळपास ०.४ टक्केच्याही खाली गेले आहे.  त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचं आहे. अलीकडच्याकाळात शेतकरी यावर भर देखील देताना पाहायला मिळतो. यात शेळ्यांचे लेंडी खत शेन खत या रासायनिक खतांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणत करताना दिसून येतो.

मात्र या सगळ्यात कोंबद्याच्या खतांचा जास्त परिणाम होत असल्याचं समोर आले आहे.  सेंद्रिय कोंबडी खत हा एक उत्तम पर्याय असून, हे खत वापरल्याने  मातीची , व जैविक,भौतिक आणि रासायनिक क्षमता देखील सुधारत असल्याचे समोर आले आहे. झटपट रिझल्ट आणि शेतीच्या मातीवर कोणताही वाईट परिणाम होत नसल्याने शेतकरी या खताला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.

कोंबडीच्या विष्टेपासून बनवण्यात येणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर हा जास्त करून बागायती शेत्राला जास्त होतो. आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला मिळतो. या खताचा विचार केला तर क
कोंबडीला दिले जाणारे खाद्य कोणत्या प्रकारचे आहे यावे खतची कॉलिटी अवलंबून असते. आजच्या बातमीत आपण कोंबडीच्या खताचे काय काय फायदे आहेत? कोंबडीचे खत कसे तयार होते? त्याचा वापर कसा करावा या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

कोंबडीच्या विष्टेपासून बनवण्यात आलेल्या खताच्या वापरामुळे मातीची जलधारणा वापर वाढते. माती भुसभुशीत होते. कोंबडीच्या खतामध्ये प्रामुख्याने इतर खतांच्या तुलनेत बरीचशी अन्नद्रव्ये असतात. आपण पाहतो बाजारात बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते विक्रीसाठी आहेत. मात्र त्यामध्ये कोंबडीचे खत हा एक चांगला पर्याय आहे.

कोंबडीच्या खतामध्ये इतर खतांच्या तुलनेत बरीचशी अन्नद्रव्ये असल्याने, मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता देखील सुधारण्यास मदत होते. शिवाय रासायनिक खतांच्या तुलनेत, कोंबड्यांचे सेंद्रिय खताचा खर्च देखील कमी असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चाची देखील बचत होते.

हेही वाचा.  

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.