शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा का आंदोलन पुकारले? वाचा सविस्तर

0

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या सीमांवर जवळपास दोन वर्ष आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून राकेश टीकेत, हे नाव पुढे आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आता पुन्हा एकदा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता ‘राकेश टिकेत’ यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. हमी भाव तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यावरून, केंद्र सरकारने आपला शब्द फिरवला असल्याचं म्हणत, राकेश टिकेत यांनी पुन्हा केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात, देशभरातून लाखो शेतकरी देशांच्या सीमांवर हे तीन कृषी कायदे माघार घेण्यात यावे म्हणून, जवळपास दोन वर्ष आंदोलन करत होते. मात्र तरी देखील केंद्र सरकारला घाम फुटला नसल्याचे पाहायला मिळालं. आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट हे शेतकरी नसून, आंदोलनजीवी असल्याचं म्हणत, शेतकऱ्यांचा जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत आपला लढा सुरू ठेवला. केंद्र सरकारने हे शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून, रस्त्यात खिळे देखील ठोकल्याचे पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर, रस्ता देखील खोदल्याचं काम केंद्रसरकारने केलं. केंद्र सरकारच्या या कृत्याचा देशभरातून संताप व्यक्त केला गेला. शेतकरी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे, लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने यूटर्न घेत, हे तीन कृषी कायदे माघार घेतले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे माघार घेत असल्याची चर्चा देखील झाली. मात्र अखेर केंद्र सरकारने शेतकऱ्यांची माफी मागत आपण हे तीन कृषी कधी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे आणि या आंदोलनात मृत्यू पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत देखील करणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय हमीभावाचा कायदा देखील लागू करणार असल्याचं घोषित केलं.

मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळले नाही. शिवाय शेतकऱ्यांना दिलेला शब्द देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिरवला. हमी भाव कायद्यासंदर्भात अजूनही समिती स्थापन करण्यात आली नाही. आणि म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही पुन्हा आंदोलन करणार असल्याचं भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टीकेत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आम्ही येत्या १३ तारखेपासून ‘आश्वासन भंग’ आंदोलन करणार असल्याचं राकेश टीकेत यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे. सरकारने अजूनही हमीभाव कायद्यासाठी समिती घटीत केली नाही. याबरोबरच आम्हाला जे आश्वासन दिले होते, त्यावर अजूनही अंमलबजावणी झाली नाही. आम्ही आंदोलन मागे घेताना, आम्हाला या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिलं होतं.

त्याचबरोबर या कुटुंबाच्यातील व्यक्तींना सरकारी नोकरीत घेणार, आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार, लखिमपूर खैरीत शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने चिरडले, त्याच्यावर देखील कारवाई करणार असे आम्हाला आश्वासन दिले होते. मात्र या संदर्भात दिलेल्या आश्वासनांची अद्याप काहीही अंमलबजावणी झाली नाही. आणि म्हणून आम्ही येत्या 13 मार्च पासून ‘आश्वासन’ बंद आंदोलन सुरू करणार असल्याचं, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता ‘राकेश टीकेत’ यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा  धक्कादायक! हृदयविकारामुळे नाही, ‘या’ कारणामुळे ‘शेन वॉर्न’चा झाला मृत्यू; मृत्यूच्या अगोदर बेशुद्ध अवस्थेत…

बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम…

राज्यपालांकडून पुन्हा महाराष्ट्राचा अपमान; अभिभाषण न करताच कोश्यारी पळाले, का पळाले राज्यपाल? वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.