‘या’ कारणामुळे अभिभाषण न करताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सभागृहातून पळाले; इतिहासात पहिल्यांदाच…
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 च्या पहिल्याच दिवशी आज सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर गदारोळ पाहिला मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सभागृहात आल्यानंतर, सत्ताधारी आणि विरोधकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांकडूनच जोरदार घोषणा द्यायला सुरुवात झाल्याने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण ‘न’ करताच सभागृहातून निघून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप, केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारला केलं जाणारं टार्गेट, त्याचबरोबर, नुकतेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे, हे अधिवेशन चांगलंच गाजणार असल्याचे, अगोदरच स्पष्ट झालं होतं. मात्र सभागृहातून राज्यपालांनी पळ काढतील असं कोणालाही वाटलं नसल्याने, राज्यपालांच्या या कृत्याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाने राज्यातले राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. राज्यभरातून राज्यपालांच्या विधानाचा निषेध देखील करण्यात आला. मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज सभागृहातही उमटल्याचे पाहायला मिळाले. राज्यपाल सभागृहात येताच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या घोषणा द्यायला सुरुवात झाली.
सत्ताधाऱ्यांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात झाल्यानंतर राज्यपालांचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे विरोधक देखील नवाब मलिक यांच्या घोषणा देऊ लागले. या दोघांच्या गदारोळात भगत सिंह कोश्यारी यांनी मात्र अभिभाषण न करताच संयुक्त सभागृहातून पळ काढला. भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या या कृत्यावर आता पुन्हा जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रगीत देखील न होता राज्यपाल सभागृहातून निघून गेले हे महाराष्ट्राच्या इतिहास पहिल्यांदाच घडल्याचं पाहायला मिळालं, असल्याची टीका आता विरोधक करत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची आता त्यांना किंमत चुकवावी लागली, असल्याचं पाहायला मिळाले आहे. मात्र अभिभाषण न करताच त्यांनी सभागृहातून पळ काढल्याने आता पुन्हा त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एवढंच नाही तर आपल्याला हे अधिवेशन जढ जाणार असल्याचे लक्षात आल्यानेच भाजपने आणि त्यांनी निघून जायचं, हे अगोदरच ठरवलं होत, असा देखील आरोप विरोधकांनी केला आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे पार पडलेल्या, समर्थ साहित्य संमेलनात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते, “समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल” त्यानंतर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या लग्नाबाबत देखील त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांच्या विधानाचा निषेध देखील करण्यात आला होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम