Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

0

Viral video: प्राण्या संदर्भातले अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहिला मिळतात. या व्हिडिओंना नेकटऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. प्राण्यांचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले असतील, काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात, तर काही जगण्याची नवी उमेद देखील देऊन जात असतात. मात्र सोशल मीडियावर असेही काही व्हिडिओ असतात, ज्यांच विश्लेषण करताच येऊ शकत नाही. असाच एक जग्वारने (Jaguar) थेट झाडावरून उडी मारुन पाण्यात मगरीची शिकार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मगर अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखली जाते. अनेक वेळा आपण पाहिले असेल, मगर देखील वाघाबरोबरच अनेक प्राण्यांची शिकार करत असते. मगरीच्या तोंडात एखादा प्राणी सापडला तर तो संपलाच म्हणून समजा, मात्र कधीकधी मगरीची देखील शिकार होते. आपण यापूर्वी वाघाने किंवा जग्वारने मगरीची शिकार केल्याचं पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रचंड भयंकर असल्याचं पाहायला मिळत आहे. जग्वार आपल्या गुहेतून बाहेर येताना अचानक त्याला पाण्यामध्ये मगर दिसते. आणि मग मगरीची शिकार करण्यासाठी तो किती चतुराईने तिच्यावर हल्ला करतो, हे तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओ पाहू शकता.

बालेकिल्ल्यात जाऊन केली शिकार

जसे की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक प्राण्याची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. प्रत्येक प्राणी आपापल्या जागेत किंग असतो, हे प्रत्येक जण मान्य करेल. त्याचप्रमाणे मगर पाण्यातील किंग प्राणी म्हणून ओळखली जाते. पाण्यात तिचा मुकाबला कोणीही करू शकत नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. नदीकाठी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर मगर कशी हल्ला करते, हे आपण अनेक वेळा पाहिलंही असेल. कितीही मोठा प्राणी असला तरी, प्रचंड घाबरूनच पाणी पीत असल्याचे आपण अनेकदा पाहतो.

पाण्याचा भाग मगरीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मगर पाण्यात असताना तिच्या नादी लागण्याचे धाडस भलेभले प्राणी करत नाहीत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत जग्वार ने चक्क झाडावरून पाण्यात उडी घेत मगरीची अफलातून शिकार केल्याचं पाहायला मिळत आहे. या जग्वारने केलेली शिकार पाहून अनेक जणांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. अनेक जण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

    नक्की काय घडलं?

EXODOR नावाच्या युट्युब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, मगर शांत पोहत आहे. पाण्यात आपण किंग असल्याने पाण्यात येऊन आपली शिकार कोणी करेल, याचा विचारही मगरीच्या मनात आला नसेल, आणि कदाचित म्हणून ती पोहण्याचा आनंद घेत असताना, पाहायला मिळत आहे. मगर पोहत असताना अचानक एका जग्वारची नजर या मगरीवर पडते.

जग्वार आपल्या गुहेतून आळस देत बाहेर येताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तेवढ्यात लांब दूर वरूनच त्याला मगर पोहत असताना दिसते. मगरीची शिकार करायची या उद्देशाने तो आता आपली पाऊले मगरीच्या दिशेने टाकताना पाहायला मिळत आहे. एका कट्ट्यावर तो मस्त ऐसपैस बसला आहे. अचानक तो अनेक फूट लांब उडी घेत मगरीवर हल्ला करतो, आणि मगरीला सावरण्याची संधीही देत नाही. आपल्या जबड्यात मगरीला घट्ट पकडून पाण्याबाहेर काढून, आपल्या गुहेत घेऊन जाताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी

हा व्हिडिओ EXODOR नावाच्या युट्युब चॅनलवरूश शेअस करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन कोटीहून अधिक लोकांनी लाईक केले असून, अनेकांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडिओला लाईक करून कमेंट करताना एक युजर्स म्हणाला, तुम्हाला अनेकदा वाटतं हा तुमचा एरिया आहे, पण लक्षात ठेवा तुमच्या घरात घुसून मारणारी लोकं देखील या जगात आहेत. तर दुसऱ्या एका यूजर्सने असं म्हटलं आहे, स्वतःमध्ये सामर्थ्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या हद्दीमध्ये जाऊनही आपलं साम्राज्य निर्माण करू शकता.

हे देखील वाचा Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला अन् ..तुम्हीच पहा व्हायरल व्हिडिओ..

शेती: शेतात जाईला रस्ता नाही? चिंता करू नका, असा करा घरबसल्या अर्ज तहसिलदार येईल बांधावर..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशी ला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.