Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला अन्…,” तुम्हीच पहा व्हायरल व्हिडिओ..

0

Viral video: चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अनेकजण रियल लाईफमध्येही जगण्याचा विचार करतात, मात्र ते शक्य नाही. रियल लाइफ आणि रील लाइफ यात खूप फरक आहे. आयुष्य तुम्हाला नेहमी वास्तववादी होऊनच जगावं लागतं, ते कोणालाही आज वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र अनेकांना समजून देखील एखाद्या चित्रपटात आवडलेले दृश्य आपल्या रियल लाईफमध्ये तशाच प्रकारे करण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. काही जण यशस्वी देखील होतात, तर अनेकजण मोठा पचका करून घेतात.

काही चित्रपटामधील एखादं दृश्य प्रेक्षकांच्या कायम लक्षांत राहतं. फक्त लक्षातच नाही, तर हे ते दृश्य आपण आपल्या आयुष्यात देखील करण्याचा प्रयत्न करतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. केरळमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या हत्तीच्या सोंडीवरुन पाठीवर जात असतानाचा व्हिडिओ, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.

बाहुबली हा चित्रपट (Bahubali Film) कोणी पाहिला नाही, भारतीय सिनेसृष्टीला कलाटणी देणाऱ्या एस एस राजमौली दिग्दर्शित बाहुबली आणि बाहुबली टू या चित्रपटाने अक्षरशः देशातल्याच नाही, तर जगभरातल्या प्रेक्षकांना वेड लावले. यातील अनेक पात्रं लोकांच्या आजही लक्षात आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्य अजरामर देखील झाली. त्यातलाच एक सुपरस्टार प्रभासचा (superstar Prabhas) सीन तुम्हाला आठवत असेल. प्रभास हत्तीच्या सोंडेवर ज्या प्रकारे उभा राहतो, तो सीन अनेकांच्या अजूनही स्मरणात आहे. प्रभासच्या स्टाईलने असंच हत्तीच्या (elephant) सोंडेवरुन एक आजोबा चढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एखाद्या चित्रपटातलं दृश्य आपल्याला फार आवडतं. आणि चित्रपटात दाखवलेला दृश्याप्रमाणे आपण त्याचे अनुकरण करायला जातो. मात्र यात फार मोठा पचका देखील होतो. चित्रपटातील अनेक दृश्य ही एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जातात. सोबतच अनेक दृश्य करत असताना, दृश्य करणाऱ्यांना कमालीची सेफ्टी देखील दिलेली असते. मात्र प्रेक्षक चित्रपटातला एखादा सीन आवडला, तर कुठल्याही सेफ्टीविना तो जसाच्या तसा करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या लक्षात येत नाही, सीन करण्यासाठी कलाकारांना अनेक टेक आणि प्रचंड सेफ्टी वापरण्यात आली आहे.

अनेक जण चित्रपटातला सीन आपल्या आयुष्यात हुबेहूब वठविण्यात यशस्वी देखील होतात, मात्र काही जणांच्या अंगलट देखील आल्याचे, आपण पाहिले आहे. मात्र या व्हायरल झालेला व्हिडिओत, रस्त्यावर हत्तीचा मालक, बाहुबली स्टाईलने हत्तीच्या अंगावर चढत असताना पाहायला मिळत आहे. या व्यक्तीचे नाव काय आहे? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र अनेकांकडून या व्यक्तिचे कौतुक करण्यात येत आहे. हा व्हिडीओ एका आयपीएस अधिकाऱ्यांने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ज्याप्रमाणे बाहुबली हत्तीवर चढला अगदी तसाच हा व्यक्तीदेखील हत्तीच्या सोंडीवरून हत्तीच्या पाठीवर जाऊन बसल्याचा व्हिडिओ पाहिला मिळत आहे. हा व्यक्ती सोंडीवरून चढत असताना एक वेळ बाहुबलीचाच सिन असल्याचा भास होतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक कमेंट आणि शेअर देखील केलं आहे. आयपीएस दीपांशू काबरा यांच्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि कमेंट देखील केल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हत्ती देखील, या व्यक्तीला चढण्यासाठी मदत करताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणून, या व्हिडिओवर कमेंट करताना एक युजर्स म्हणाला, तुम्ही स्वतः उठा दुसर्‍यालाही, उठवा यातच राष्ट्राचं भलं आहे. तर दुसरा एकजण म्हणाला, प्रभास म्हातारा झाल्यानंतर, असाच हत्तीवर चढताना पाहायला मिळणार.

हे देखील वाचा Viral video: काळजाचा ठोका चुकवणारी मुंगसाची आणि सापाची ही लढत एकदा पहाच..

Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.