Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

0

Viral video: सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं. सोशल मीडियाच्या या जमान्यात कुठेही घडलेली कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरतात. काही व्हिडिओ माणसाला इन्स्पायर करून जातात, तर काही व्हिडिओ काळजाचा ठोका देखील चुकवतात. अशाच एका छोट्या मुलाचा (little child) देशी जुगाड करून मासे (Fish) पकडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, व्हिडिओमुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला असून, या मुलाचं महिंद्रा यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. या छोट्याशा व्हिडीओने आज दाखवून दिलं, दृढनिश्चय + साधेपणा + संयम हे सगळे गुण अंगीकारल्यानंतर माणसाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, अशा आशयाचे ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केल्यानंतर, हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

जर तुमच्याकडे इच्छाशक्ती संयम, प्रयत्न करण्याची क्षमता असेल, तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हा संदेश एका छोट्याशा मुलाने दाखवून दिला. अनेकांची कष्ट करण्याची तयारी असते, त्यासाठी प्रयत्न देखील करतात. मात्र संयम हा अनेकांमध्ये नसल्याकारणाने यश मिळत नसल्याचं आपण पाहतो. मात्र आपल्या वजनापेक्षा ही जास्त वजन असणारे दोन मासे या मुलाने ज्या पद्धतीने पकडले, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुलगा ज्या पद्धतीने मासे पकडतो, आणि मासा उचलत नसतानाही तो पिशवीत सरकावत भरतो, हे दृश्य अफलातून आहे.

काय घडलं नक्की

प्रसिद्ध उद्योजक आनंद महेंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एका मुलाचा मासे पकडतानाचा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला. या व्हिडीओत एक लहान मुलगा आपला देशी जुगाड करून, मासे पकडत आहे. एक वायरची साधी पिशवी घेऊन हा मुलगा मासे पकडण्यासाठी एका तलावाच्या काठाला आपला असणारा देशी जुगाड घेऊन येतो. या व्हिडीओत आपण पाहू शकतो, लहान मुल स्वतःच्या खांद्यावर एक छोटीशी लाकडी चौकट घेऊन येत आहे. त्याचे हे जुगाड तो तलावाच्या काठी एका हातोड्याने चौकट ठोकताना पाहायला मिळत आहे.

चौकट ठोकल्यानंतर हा मुलगा आपल्या वायरच्या पिशवीमधून गव्हाच्या पिठाची कणीक बाहेर काढतो. या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करतो. मासे पकडण्यासाठी जो हूक वापरण्यात येतो, त्या हूकाला ही कणीक हा मुलगा लावताना पाहायला मिळत आहे. हे सर्व काम करत असताना हा मुलगा अतिशय शांत डोक्याने संयमाने हे सर्व काम करत असताना पाहायला मिळत असल्याने, यावर अनेक जण फिदा झाले.

गव्हाची कणीक हुकाला लावल्यानंतर हा मुलगा दोरीच्या सहाय्याने ऍडजेस्ट केलेला हुक लांबवर पाण्यात फेकून देतो. लांब पाण्यात फेकलेला दोर त्याने ठोकलेला चौकटीला अटॅच असल्याचे पाहायला मिळते. मासे अटकण्यासाठी त्याने टाकलेल्या सापळ्यात मासे अडकतात, आणि त्यांची शिकार होते. मासे अडकल्यानंतर त्याने दोर चौकटीला बांधला असल्याने चौकटीचा दोर सुटू लागतो, मग त्याच्या लक्षात येतं मासे अडकले आहेत. आणि मग हा मुलगा दोर जोरजोरात ओढण्याचा प्रयत्न करतो, मात्र हा खूप छोटा असल्याने दोर त्याला व्यवस्थित ओढता येत नाही. आणि मग या चौकटीला असणारा हँडल तो आपल्या हाताने फिरवतो, आणि मग मासे काठावर येत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

या छोट्या मुलाने देशी जुगाड करून, मासे पकडले. मात्र पकडलेले मासे प्रचंड मोठे असल्याने, त्याला दोन्हीं हाताने उचलत देखील नसल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मग हा मुलगा आपण आणलेल्या पिशवीत हे दोन्हीं मासे न उचलता सरकावत पिशवीत भरत असल्याचे, व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी या मुलाचं कौतुक करताना कमेंट्स केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

या मुलाने केलेले प्रयत्न, दाखवलेला संयम, आणि त्याच्या अंगी असणारा साधेपणा, याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. माणसाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न, कष्ट हे तर करावंच लागतं. मात्र त्यासाठी संयम आणि साधेपणा देखील खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडिओखाली केल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतः आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओ संदर्भात बोलताना म्हटले आहे, दृढनिश्चय + साधेपणा + संयम= यश अशा प्रकारची स्तुती त्यांनी या मुलाची केली असून, हा व्हिडिओ प्रचंड प्रेरणादायी असल्याचंही म्हटले आहे.

हे देखील वाचा खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

शेती: शेतात जाईला रस्ता नाही? चिंता करू नका, असा करा घरबसल्या अर्ज तहसिलदार येईल बांधावर..

Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय!हीआहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर असंकरा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला अन्म्हीच पहा व्हायरल व्हिडिओ..

Viral video: काळजाचा ठोका चुकवणारी मुंगसाची आणि सापाची हीलढत एकदा पहाच..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने…; गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.