Viral video: दोन वर्षाच्या लहान मुलीचं आणि माकडाचं मोबाईलवरून जबरदस्त भांडण; व्हिडिओ पाहून, तुम्हीही व्हाल लोटपोट..

0

Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. खासकरून प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अनेकांना ते आवडतात देखील. काही व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. तर काही मन हेलावून टाकणारे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता असाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरू धरू हसाल. एका छोट्या दोन वर्षाच्या मुलीचं (baby girl) आणि माकडाचं (monkey) मोबाईलवरून चांगलचं भांडण झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

आपण पाहतो, लहान मुलं नेहमी माकडांना घाबरत असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक छोटी दोन वर्षाची मुलगी मोबाईलवर खेळत असताना माकड तिच्याजवळ येऊन बसतं. तरीदेखील छोटी मुलगी माकडाला अजिबात घाबरत नसल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप समोर आले नाही, मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

काय घडलं नक्की

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मुलगी एका कॉटवर मोबाईल खेळताना बसलेली पाहायला मिळत आहे. एक छोटी मुलगी मोबाईल खेळत असताना, अचानक कुठून तरी एक माकड तिच्यापाशी आलं. आणि क्षणात तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेत, माकड देखील हा मोबाईल पाहू लागलं. माकडाने आपल्या हातून मोबाईल हिसकावून घेतल्याने, लहान मुलीला काय करावे कळत नाही. मात्र ती देखील न घाबरता माकडाच्या हातून मोबाईल हिसकावून घेते. छोट्या मुलीने देखील आपल्या हातून मोबाईल काढून घेतल्याने, माकड चांगलेच संतापल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

माकडानेही हिसकावला फोन

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोघांचे खूपच मजेशीर भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मुलीच्या हातून माकडाने मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मुलीने देखील माकडाच्या हातात मोबाईल हिसकावला. यानंतर माकडाला प्रचंड राग आला, आणि त्याने मुलीच्या हातून मोबाईल हिसकावून घेत आपल्या छातीला घट्ट आवळून धरला. मुलीच्या हातून मोबाईल घेऊन,आपल्या छाती सोबत घट्ट पकडला असल्याने, आता मुलीला देखील मोबाईल घेता येणे शक्य नव्हते. मात्र यावर ती कडकडे ज्या पद्धतीने पाहत आहे हे त्यांना चांगलंच आवडलं आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ प्रचंड मजेशीर असल्याचं पाहायला मिळत असून, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर खूपच मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सनी कमेंट करताना म्हटले आहे ,कीती निरागस आहेत की दोन्हींही बालकं. तर दुसर्‍या एका युजर्सने म्हटले, एखादा मोठा व्यक्ती असता तर, हे माकड त्याच्याजवळही आलं नसतं. माकडाला देखील माहिती होतं, ही मुलगी आपल्या सोबत उत्तम प्रकारे खेळू शकते.

हे देखील वाचा Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

Viral video: प्रभासच्या स्टाईलने आजोबा सोंडीवर गेले चढायला  तम्हीच पहा व्हायरल व्हिडिओ..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.