Samsung Galaxy M33 5G: सॅमसंगने आत्तापर्यंतचा सर्वोत्तम फोन केला लॉन्च; किंमत,फिचर्स, कॅमेरा जाणून तुम्हालाही बसेल धक्का…

0

Samsung Galaxy M33 5G: डिजिटलच्या या युगात अनेकांना नवनवीन स्मार्टफोनचं (smartphone) वेड लागलेलं पाहायला मिळतं. अनेक जण बाजारपेठांत नवीन स्मार्टफोन आले की खरेदी करण्याचा विचार करतात. जगभरात स्मार्टफोनच्या अनेक ब्रँड्स असल्यामुळे ग्राहकांना नक्की कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा, हे समजत नाही. अनेक ग्राहक सॅमसंग मोबाईल कंपनींच्या प्रोडक्टला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. सॅमसंग स्मार्टफोन कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोन घेऊन येत असते. आणि यामुळेच आता सॅमसंगने आपला Samsung Galaxy M33 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे.

कमी किंमत, आकर्षक फोन, आणि अनेक भन्नाट पिक्चर्स सोबतच जबरदस्त कॅमेरा अशा स्मार्टफोनच्या शोधात ग्राहक नेहमी असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ही गोष्ट ओळखून सॅमसंगने देखील आता आपल्या ग्राहकांसाठी Samsung Galaxy M33 5G हा फोन बाजारपेठांमध्ये उपलब्ध केला आहे. सॅमसंगने लॉंच केलेल्या Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे, हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट आणि 16 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह मिळणार आहे. आणि म्हणून या फोनची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असून, ग्राहकांकडून हा फोन खरेदीसाठी कमालीचा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोन विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

बॅटरी

Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 6000 mAh देण्यात आली आहे सोबतच 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील ग्राहकांना मिळणार आहे. धावपळीच्या युगात अनेकांना चार्जिंग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कंपनीने हा फोन झटपट चार्जिंग होईल, याकडे अधिक भर दिला आहे. सोबतच याची दमदार बॅटरी दिल्याने, या फोनचा बॅटरी बॅकअप देखील कमालीचा असणार आहे.

प्रोसेसर, रॅम स्टोरेज

Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनला 5nm 2.4 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच मल्टीटास्किंगसाठी देखील वापरला गेला असल्याने, ग्राहकांना हा फोन वापरताना कमालीचा फिल येणार आहे. हा हँडसेट रॅम प्लस पर्यायासह लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M33 5G हा स्मार्टफोन 6 GB/8 GB रॅम सह 128 GB इंटरनल स्टोरेज सह उपल्ब्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 16 जीबी पर्यंत तुम्ही अधिक स्टोरेज पर्यंत देखील वाढवू शकता.

कॅमेरा

स्मार्टफोन खरेदी करताना अनेक जण सर्वप्रथम कॅमेरा विचारात घेऊनच स्मार्टफोन खरेदी करत असतात. इंस्टाग्राम रिल्सच्या जमान्यात कॅमेर्‍याचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे पाहायला मिळते. आणि म्हणून अलिकडच्या काळात कुठलाही स्मार्टफोन घेताना, ग्राहक कॅमेराचा सर्वप्रथम विचार करताना अधिकतेने जाणवत असल्याचं दिसतं. आणि म्हणून सॅमसंगने Samsung Galaxy M33 5G या स्मार्ट फोनचा कॅमेरा जबरदस्त प्रदान केला आहे. Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनचा कॅमेरा 50 MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 5 MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर प्रदान करण्यात आला आहे. सोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगकरीता 8MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर, डिस्प्ले, कनेक्टिव्हिटी

Samsung Galaxy M33 5G हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित असून One UI 4.1 वर चालतो. जो सर्वोत्तम मानला जातो. या फोनचा डिस्प्ले चा विचार करायचा झाला तर डिस्प्ले देखील जबरदस्त देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले देण्यात आला आहे. अधिक संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास ५ चा वापर देखील केला आहे. या फोनची कनेक्टिव्हिटी देखील उत्तम आहे. या फोनमध्ये GPS, 5G, ब्लूटूथ आणि वाय-फाय यांसारखे फीचर्स दिले आहेत. फोनच्या साईटला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

किंमत

आकर्षक फोन अनेक भन्नाट फीचर्स उत्तम कॅमेरा याबरोबरच ग्राहकांचे भिंतीवर देखील अधिक लक्ष असतं आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन सॅमसंगने Samsung Galaxy M33 5G या स्मार्ट फोनची किंमत कमीच ठेवली आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची भारतीय किंमत 18,999 रुपये असणार आहे. तर 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 20,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

उपलब्धता

Samsung Galaxy M33 5G या स्मार्टफोनच्या उपलब्धतेविषयी बोलायचं झाल्यास, ग्राहकांना हा फोन आठ एप्रिलपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोअर व्यतिरिक्त Amazon वर देखील खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांनी जर ICICI डेबिट कार्डवरून या फोन खरेदीचे पेमेंट केलं, तर तब्बल दोन हजार रुपये सूट देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन अनेकांच्या पसंतीस उतरत असून, Samsung Galaxy M33 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी, अनेक ग्राहक ८ एप्रिलची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीला कमी किंमतीत अनेक भन्नाट फीचर्स आणि सर्वोत्तम ब्रँडचा फोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही हा स्मार्टफोन परचेस करू शकता.

हे देखील वाचा Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! हा जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत..

Smartphone: या दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! यापैकी तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ..

Xiaomi: चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

मोजणी: असा करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.