Redmi smartphone: Redmi चा नवीन धमाका! ‘हा’ जबरदस्त फोन केवळ आठ हजारांत; 

0

Redmi smartphone: रेडमी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन स्मार्टफोन बाजारपेठामध्ये उपलब्ध करत असते. कमी किमतीत आकर्षक फोन आणि अनेक भन्नाट फिचर्समुळे अल्पावधीतच रेडमी या ब्रँडने ग्राहकांच्या मनावर राज्य करण्यात यश मिळवलं. अनेक मोबाइल कंपन्यांना रेडमीमुळे आपल्या प्रॉडक्टवरच्या किंमती देखील कमी कराव्या लागल्या. रेडमीला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्या, ग्राहकांसाठी कमी किंमतीत अधिक फीचर्स घेऊन आकर्षक फोन सादर करत आहेत, मात्र रेडमी या सगळ्यांमध्ये पुढे असल्याचं पाहायला मिळतं.

Redmi या स्मार्टफोन कंपनीने आता पुन्हा एकदा आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Redmi 10A असं या स्मार्टफोनचे नाव असून, हा स्मार्टफोन Redmi 9A चे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. रेडमी ने लॉन्च केलेला हा फोन कमालीचा आकर्षक असून, याची किंमत केवळ आठ हजार रुपये असल्याने, हा फोन बाजारपेठांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचं बोललं जात आहे. या फोनच्या फिचर्स, कॅमेरा, बॅटरी, प्रोफेसर, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

Redmi च्या ‘Redmi 10A’ या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी२५ प्रोसेसर ग्राहकांना मिळणार आहे. जो आवरेज मानला जातो. सोबतच फोनचा कॅमेरा देखील ठीक-ठाक आहे. या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा असणार आहे. या स्मार्टफोनचे स्टोरेज तुम्हाला १२८ जीबीपर्यंत मिळणार आहे. आता या फोनच्या किंमती आणि फीचर्स विषयी जाणून घेऊया.

Redmi 10A ची किंमत

Redmi ने हा फोन फक्त चीनमध्ये लॉन्च केला आहे. भारतात तो कधी येईल? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र एप्रिलच्या मध्यावर हा फोन बाजारपेठेत उपलब्ध केला जाणार असल्याचं, बोललं जातंय. ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या या स्मार्ट फोनची किंमत८,३०० रुपये असणार आहे. तसेच चार जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत साडेनऊ हजार असणार आहे. तसेच या फोनची टॉप मॉडेल म्हणजेच 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज असणारा फोन ग्राहकांना साडे दहा हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. या फोनचे फिचर्स आवरेज असले, तरी हा फोन जबरदस्त आकर्षक बनवण्यात आला असून, हा एकूण चार कलरमध्ये येणार आहे. हा फोन Shadow Black, Smoke Blue यसेच Moonlight Silver या कलरमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 10A या स्मार्टफोन ड्यूल नॅनो सिम कार्ड सपोर्टसह मिळणार आहे. Redmi 10A हा स्मार्टफोन अँड्राइड MIUI १२.५ चालतो. तसेच या फोनचा डिस्प्ले ६.५३ इंच एचडी+ असून, याचे ब्राइटनेस ४०० निट्स ठेवण्यात आले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे याचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाइल नॉचसह ग्राहकांना मिळणार आहे. या फोनच्या प्रोसेसरचा विचार केला तर, ऑक्टा-कोर MediaTek Helio G२५ देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या फोनच्या स्टोरेजला तुम्ही मेमरिकार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवू देखील शकता. याच्या कनेक्टिव्हिटीसाठी या फोनला ४G LTE, Wi-Fi, Bluetooth v५.0, GPS/ A-GPS, Micro-USB, तसेच ३.५mm हेडफोन जॅक देखील दिला आहे. या फोनच्या बॅटरी विषयी विचार करायचा झाला तर, याचा चार्जर १० वॉटचा दिला गेला आहे. तसेच याची बॅटरी ५००० एमएएचची असल्याने बॅटरी बॅकअप उत्तम असणार आहे.

हे देखील वाचाखत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीच

Xiaomi: चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल..

Xiaomi: चा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ..

भन्नाट कॅमेरा आणि फीचर्स असणारे Vivo चे हे 5 स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येतात; जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.