भन्नाट कॅमेरा आणि फीचर्स असणारे Vivoचे ‘हे’ 5 स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येतात; जाणून घ्या सविस्तर…

0

अलीकडच्या काळात प्रत्येकाला स्मार्टफोनचे वेड लागलं आहे. प्रत्येक जण बाजारात नवनवीन स्मार्टफोन आले, की खरेदी करताना पाहायला मिळतो. मात्र अनेकांचे बजेट कमी असल्याने, स्मार्टफोन खरेदी करताना ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि अनेक चांगले फिचर्स असणारे फोन तुम्हाला खरेदी करता येत नाहीत. मात्र आता कमी बजेट असून देखील, तुम्हाला प्रीमियर लूक आणि भन्नाट फीचर्स असणारा स्मार्ट फोन खरेदी करता येणार आहे.

तुम्हाला प्रीमियर लूक(premier look) आणि भन्नाट फीचर्स असणारा वीवो स्मार्ट फोन (Vivo smartphone) खरेदी करायचा आहे, मात्र तुमच्याकडे बजेट खूप कमी असेल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे.  कमी बजेटमध्ये प्रीमियर लूक आणि भन्नाट फीचर्स असणारे विवो कंपनीचे काही मॉडेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांचे बजेट तुम्हाला परवडणारे तर असेलच, पण  उत्कृष्ट फीचर्स आणि जबरदस्त लूक देखील तुम्हाला मिळणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, विवोचे फोन हे लूकसाठी आणि कॅमेरासाठी ओळखले जातात. या फोनकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याचा सर्वे सांगतो. आणि म्हणून, ही बाब लक्षात घेऊन, आम्ही Vivo फोनचे काही भन्नाट फीचर्स आणि प्रीमियर लूक असणारे कमी किमतीचे, फोन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

                           Vivo Y21

विवो कंपनीचा Vivo Y21 हा स्मार्ट फोन अतिशय  उत्तम फीचर असलेला आणि प्रीमियर लूक असणारा स्मार्टफोन आहे. डायमंड ग्लो कलर आणि प्रिमियम लुकमध्ये असणारा Vivo Y21 हा फोन ग्राहकांच्या  कमालीचा पसंतीस उतरला आहे. या फोनमध्ये अप्रतिम स्पेसिफिकेशन देण्यात आले असून, हा फोन तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. शिवाय हा स्मार्टफोन तुम्हाला हाय कॅमेरा क्वालिटीसह मिळणार आहे.

                         Vivo Y15 S

जर तुमचं बजेट खूपच लो असेल तर, तुम्ही हा फोन परचेस करू शकता. Vivo कंपनीच्या या फोनची किंमत फारच कमी आहे. शिवाय याचे फीचर्स देखील उत्तम आहेत.  हा फोन 3GB रॅमसह 32GB स्टोरेजसह येतो. सोबत याला इंटर्नल मेमरी देखील  दिली गेली आहे. या फोनची स्क्रिन 6.51-इंच देण्यात आली आहे. ही स्क्रीन एकूण 1600×720 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह देण्यात येते. त्याचबरोबर या फोनला , जबरदस्त प्रोसेसर आणि टच OS 11.1 Android 11 (Go Edition दिला गेला आहे, ज्यामुळे स्क्रिन सुरळीत चालण्यासाठी मदत होणार आहे.

                         Vivo Y33T

जर तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा फोनच्या शोधात असाल, तर हा फोन तुमची शोधमोहीम पूर्ण करणार आहे. कॅमेरा बरोबरच या फोनने अनेक युजर्सची मने जिंकली आहेत. या फोनला फोर स्टार देखील मिळाले आहेत. त्याबरोबरच या फोनला ऑफर्स आणि सूट मिळणार आहे. जर तुम्ही ट्रॅव्हलर असाल आणि तुम्हाला फोटो‌ काढायची आवड असेल, तर डोळे झाकून तुम्ही या फोनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. या फोनला 50MP फँटॅस्टिक ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला AI कॅमेरा मोडे मध्ये फोटो काढता येणार आहेत.

                              Y21T

जर तुम्ही आकर्षक लूक, सडपातळ आणि हलक्याफुलक्या फोनच्या शोधात असाल, तर तुम्ही या फोनमध्ये इन्वेस्ट करू शकता. हा स्मार्टफोन तुम्हाला 4GB रॅम, 128GB मेमरीसह मिळणार आहे. उत्कृष्ट कॅमेऱ्याबरोबरच या फोनचा प्रोसेसर देखील भन्नाट असणार आहे. Vivo Y21T या फोनला स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

                           Vivo Y73

जर तुमचं थोडंसं जास्त बजेट असेल, तर तुम्ही कोणत्याही फोनचा नादी न लागता हा फोन खरेदी करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट किमती बरोबरच भन्नाट फिचरने खच्चून भरलेला हा फोन तुम्हाला मिळू शकणार आहे. या फोनच्या कॅमेरा आणि प्रोसेसरचा विचार केला तर हा फोन कमालीचा बनवण्यात आला आहे. लूकचा विचार केला तर, विवो हा कधीही ग्राहकांना आपल्या लूकविषयी तक्रार करू देत नाही. Vivo Y73   या फोनची स्क्रीन अमोलेड असून, ही स्क्रीन 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन प्रदान करते.  जर तुम्ही गेम खेळत असाल, तर हा फोन तुम्ही अवश्य घेतला पाहिजे. कारण याचे स्मूथनेस कमालीचे आहे.  MediaTek Helio G95  प्रोसेसर असल्याने हा फोन खूपच मस्त वर्किंग होतो.

हे देखील वाचा Royal Enfield Classic 350: आणि Java या दोन्हीं बाइकमध्ये कोणती सर्वोत्तम आहे? जाणून घ्या दोन्हींचेही फीचर्स..

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त…

आणखी चार महिने चिकनचे दर तेजीतच! ‘या’ कारणामुळे चिकनचा उडालाय भडका; वाचा सविस्तर..

या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.