Royal Enfield Classic 350: आणि Java या दोन्हीं बाइकमध्ये कोणती सर्वोत्तम आहे? जाणून घ्या दोन्हींचेही फीचर्स

0

नेकांना वेगवेगळ्या टु-व्हीलरचे आकर्षण असतं. प्रत्येकाला बाजारात नवीन टु-व्हीलर आली की तिच्यावरती एक फेरफटका मारायची उत्सुकता आणि इच्छा असतेच असते. अनेकांना टू व्हिलर खरेदी करताना कोणती टू व्हिलर घ्यावी समजत नाही, यामुळे अनेक जण वेगवेगळ्या कंपनीच्या टू व्हीलरच्या फॅसिलिटीशी तुलना करूनच अनेकजण खरेदी करत असतात. जर तुम्ही रॉयल एनफिल्ड 350 (Royal Enfield Classic 350) आणि जावा (Java) या दोन्हीं बाइकचे चाहते असाल, तर आम्ही तुम्हाला या दोन क्रूझर बाईक विषयी माहिती देणार आहोत.

अलीकडच्या काळात क्रूझर बाईक वापरणाऱ्यांची संख्या वाढत असताना पाहायला मिळते. अनेकांना सफारी करण्यात खूप मजा येत असते. ही सफारी करत असताना, अनेकजण क्रूजर बाइकच निवडताना दिसून येतो. आणि आपली सवारी त्याच्यावरच पार करताना वेळोवेळी दिसून येतो. मात्र अनेकांना क्रुझर बाइकचे आकर्षण असलं तरी, बाजारात अनेक क्रूजर बाईक असल्याने कोणती बाईक खरेदी करायची, हे अनेकांना समजत नसल्याचं दिसून येतं. मात्र या लेखात आम्ही तुम्हाला रॉयल एनफिल्ड 350 आणि जावा या दोन क्रूजर बाईक पैकी कोणती बाईक उत्तम आहे, याविषयी माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ही बाईक जगात सर्वाधिक विकली जाणारी क्रूझर बाईक आहे.  सुरुवातीला कंपनीने ही क्रूझर बाइक एकाच प्रकारात ग्राहकांच्या भेटीला आणली होती, मात्र जसजसा या क्रूजर बाइकचा चाहतावर्ग तयार होत गेला, तसतसा या कंपनीने वेगवेगळी मॉडेल्स बाजारात उपलब्ध केली. आणि आज जवळपास या बाइकचे एकूण पाच प्रकार आहेत. या बाइकला ३४९.३४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. त्याबरोबरच एअर कूल्ड तंत्रज्ञानावर देखील ही बाइक आधारित आहे. या बाइकला २०.२१ पीएस पॉवर आणि २७ एनएम पीक टॉर्क इंजिन जनरेट करते.

त्याचबरोबर हे ५-स्पीड गिअरबॉक्सशी देखील जोडले गेले आहे. या  बाइकच्या ब्रेक विषयी बोलायचं झालं तर, पाठीमागच्या आणि पुढच्या अशा दोन्हीं चाकांना डिस्क ब्रेकची सिस्टीम देण्यात आली आहे. कुठलीही बाईक खरेदी करताना अनेकजण बाइक किती आवरेज देते, हा खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन खरेदी करतात. मात्र या कंपनीने आपल्या बाइकविषयी बोलताना म्हटले आहे, आमची बाइक प्रति लीटर ४१.५५ किलोमीटरचे मायलेज देते. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बाइकची किंमत ही १.८७ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) २.१८ लाखांपर्यंत आहे.

                               Java

रॉयल एनफिल्ड 350 प्रमाणेच जावा (Java) देखील अलीकडच्या काळात अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. जावा ही क्रूझर बाइक देखील दोन प्रकारात कंपनीने लॉंचिंग केली आहे. रॉयल एनफिल्ड 350च्या तुलनेने ही बाईक ताकतीने कमी असणार आहे, मात्र दिसण्यासाठी कमालीची आकर्षक बनवण्यात आली आहे. या बाइकचे २९३ सीसी इंजिन असून, हे इंजिन संपूर्णतः एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

त्याचबरोबर हे इंजिन २७.३३ पीएस पॉवर आणि २७.०२ एनएम पीक टॉर्क जनरेट  देखील करते. ज्यामुळे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडणी केलेली आहे.  ब्रेक विषयी बोलायचं झालं तर एबीएस सिस्टीम सह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक कंपनीने दिला आहे. मायलेज विषयी बोलायचं झालं तर कंपनीने प्रतिलिटर ही बाईक ३७.५ किलोमीटरचा टप्पा पार करत असल्याचं सांगितलं आहे. रॉयल एनफिल्ड 350 च्या तुलनेत ही बाइक थोडीशी स्वस्त पाहायला मिळते.  जावाची किंमत १.७८ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) ते १.८७ लाखांपर्यंत जाते.

हे देखील वाचा ‘या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर..

चित्ता आणि सिंहाची झाली कुत्र्यासारखी अवस्था; व्हायरल झालेले दोन्हीं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले.

शपथविधी पूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.