‘या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर..

0

रशिया आणि यूक्रेन युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र त्यात सगळ्यात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसणार असल्याचा देखील म्हटलं आहे. आणि आता ते प्रत्यक्षात दिसून देखील येत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धापूर्वीच खतांचे दर कमालीचे वाढले असल्याच्या तक्रारी शेतकरी करत असतानाच आता या युद्धामुळे या दरात आणखी वाढ होऊन, खातांच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी खूप भयानक काळ असणार आहे. खताच्या किंमती आत्ताच दुप्पट झाल्या आहेत. किंमती दुप्पट होऊन देखील येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना खत वेळेत उपलब्ध होईल की नाही याविषयी खूप मोठा प्रश्न असून, खाताचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याचं यासंदर्भातल्या तज्ञांकडून सांगण्यात आलंय. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमती दुप्पट झाले आहेत. शेतकऱ्यांना जर खरीपामध्ये खतांची कमतरता भासू द्यायची नसेल तर सरकारला आतापासूनच खताची आयात सुरू करावी लागणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

भारत या देशांवर अवलंबून

भारत हा कृषिप्रधान देश असला तरी त्यासाठी लागणारे खत निर्मितीत भारत खूप कमी पडला आहे. भारताला आपल्या शेतकऱ्यांना खतपुरवठा करण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहवं लागतं. संयुक्त खताकरिता भारत, बेलारूस, युक्रेनवर,रशिया या देशांवर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. खताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर रशिया हा पोषण खतांची निर्मिती करण्यासाठी ओळखला जातो. या खताची निर्मिती करणाऱ्या पहिल्या चार देशांमध्ये रशियाचा देखील नंबर लागतो. भारत देशात पोटॅशला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र भारत पोटॅश रशिया बरोबरच इतर देशातून आयात करतो. रशिया पोटॅश निर्मितीत जगात पहिल्या तीनमध्ये येतो. तर नायट्रोजन आणि फॉस्फेट या खतांच्या निर्मितीमध्ये रशियाचा चौथ्या क्रमांक आहे.

रशिया पेक्षाही पोटॅशचे जास्त उत्पादन बेलारुसमध्ये होते. संपूर्ण जगात पोटॅशच्या निर्मितीत बेलारूसचा दुसरा क्रमांक लागतो. अशीच परिस्थिती युक्रेनची देखील आहे. भारत भारत ज्या राज्यातून खतांची आयात करतं, त्यापैकी एकूण २५ टक्के आयात ही रशिया युक्रेन आणि बेलारूस या देशांमधून करतं. आपल्या देशात प्रत्येक वर्षी ७० ते ७२ लाख टन Di-ammonium Phosphate या खताची आयात केली जाते. त्याचबरोबर पोटॅशचा विचार करायचा झाला तर, भारत जवळपास ५० ते ५५ लाख टन दरवर्षी आयात करत असते. आणि ही आयात प्रामुख्याने युक्रेन, बेलारुसमधून केली जाते. तर रशियामधून Di-ammonium Phosphate, Muriate of Potash, nitrogen (N), phosphorus (P) and potassium (K आणि युरिया ही खते तीनही देशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात.

अशी होते आयात आणि पुरवठा 

रशिया युक्रेन बेलारुस या तीनही देशांमधून भारत साधारण फेब्रुवारीच्या अखेरीला खते आणि कच्चा माल मागवतं. ही प्रक्रिया झाल्यानंतर खरीप पिकांसाठी खते आणि कच्चा माल मार्चमध्ये या तीनही देशांतून निघत असतो. मार्चमध्ये हा माल निघाल्यानंतर, आपल्या देशात पोहोचायला साधारण एक महिना कालावधी लागतो. हामाल आपल्या देशात पोचल्यानंतर, या मालावर सगळी प्रक्रिया होऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता जवळपास दोन ते तीन महिने कालावधी लागतो. परंतु या युद्धामुळे हे सगळे व्यवहार सध्या ठप्प झालेले आहेत. आणि म्हणून साहजिकच याचा मोठा फटका भारतातील शेतकऱ्यांना बसला आहे.

जगावरही झाला परिणाम

भारत पोटॅशची आयात ही रशियामार्गे बेलारुसमधून करत असतो. मात्र आता बेलारुस, रशियावर आर्थिक निर्बंध लावले आहेत. आणि म्हणून सगळीच निर्यात सप्प झाली आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे जीवनमान विस्कळीत झाले असल्याने, आणि युध्द सुरू असल्याने युक्रेनमधून येणारी निर्यात देखील थांबली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत पोटॅश सोबतच संयुक्त खतांचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे जागतिक बाजारात दराच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे.

हे देखील वाचा. Maharashtra Budget २०२२अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार..

.गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; या कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किमती गगनाला भिडणार…

‘या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्त….

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान वाचून..

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.