गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर; ‘या’ कारणामुळे काही दिवसांतच गव्हाच्या किमती गगनाला भिडणार…

0

युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार असल्याचे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या युद्धाचा सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता देखील अनेकांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांच्या किमती देखील वाढणार असल्याचं बोलले जात आहे. एकीकडे ही दुःखदायक बातमी असली तरी, दुसरीकडे मात्र या युद्धामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना काही दिवसांतच सोन्याचे दिवस येणार असल्याचं, आता स्पष्ट झालं आहे.

रब्बी हंगामातील गहू हे भारतातील सगळ्यात महत्त्वाचं पीक मानलं जातं. भारतामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या तीन राज्यांमध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन केलं जातं. अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातून तब्बल 53 लाख टन इतकी विक्रमी निर्यात इतर देशात केली जात असल्याचं समोर आलं आहे. भारताचा गहू चांगल्या दर्जाचा असून, इतर देशांच्या तुलनेत वाजवी दरात देखील मिळत असल्याने, भारतातील गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं दिसून येतं.

गहू हे रब्बी हंगामातील भारतासाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पीक आहे. देशातला शेतकरी, गहू  हमीभावाने खरेदी करण्यात यावा यासाठी दिल्लीच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना पाहायला मिळतो, खासकरून हरियाणा, पंजाब, आणि उत्तर प्रदेशच्यामधील शेतकऱ्यांचा यात समावेश असतो. मात्र आता शेतकऱ्यांना किमान दोन वर्षं तरी हमी भावासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचं, आता रशिया यूक्रेन युद्धामुळे स्पष्ट झाले आहे.

              या देशांना निर्यात होतो गहू

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भारतीय गव्हाच्या निर्यातीच्या किंमती ह्या साधारण १९ हजार ८०० रुपये होती. भारत हा आपल्या शेजारील राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात गहू निर्यात करत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील इतर देशांच्या तुलनेत कमीच येतो. भारत सगळ्यात जास्त बांगलादेशात आपला गहू निर्यात करतो. त्यानंतर श्रीलंका इंडोनेशिया, फिलिपाईन्स, नेपाळ, त्याचबरोबर काही पश्चिम आशियातील देशांना देखील भारत आपला गहू निर्यात करतो. मात्र भारता व्यतिरिक्त आणखी काही देश देखील इतर राष्ट्रांना गहू निर्यात करत असतात.

       भारताव्यतिरिक्त हे देशही करतात निर्यात

गव्हाच्या बाबतीत बांगलादेश हा आपला सगळ्यात मोठा निर्यात देश आहे. बांगलादेश नंतर नेपाळ हा देश आपल्याकडून विक्रमी गहू खरेदी करतो. फक्त हे दोनच देश नाही, तर इतर महत्त्वाच्या देशात देखील भारत मोठ्या प्रमाणात आपला गहू निर्यात करतो. मात्र भारताव्यतिरिक्त, युक्रेन आणि सोवियत हे दोन देश देखील मोठ्या प्रमाणात इतर राष्ट्रांना आपला गहू निर्यात करतात. मात्र या दोन्हीं देशांच्या गव्हाचा उत्पादित खर्च जवळपास २७ हजार आहे. मात्र तरीदेखील हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणात आपला गहू निर्यात करतात.

         युद्धामुळे यूक्रेनच्या गव्हाची निर्यात ठप्प

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे दोन्हीं देशांचे जीवनमान विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. खास करून यूक्रेनमध्ये फार भीषण अवस्था असल्याचं दिसून येतं. युक्रेनमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलेलं आहे. आणि म्हणून या देशांमध्ये जीवनमान विस्कळीत झाल्याने, आता या देशाचे आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. अनेक देशांना युक्रेन गहू पूरवत होता, मात्र आता त्यांना गहू पुरवता येणार नाही. आणि सहाजिकच याचा फटका आता इतर देशांना बसणार आहे.

         ..म्हणून येणार सोन्याचे दिवस

भारतात मोठ्या प्रमाणात गहू उत्पादक शेतकरी आढळतो. पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा शेतकरी गव्हावर अवलंबून असल्याचं दिसून येतं. म्हणून हमीभावासाठी तो नेहमी आंदोलन करताना दिसून येतो. मात्र आता असं चित्र पाहायला मिळणार नाही. युक्रेन ज्या राष्ट्रांना आपला गहू निर्यात करत होता, त्यांना आता युद्धामुळे गहू निर्यात करता येणार नाही. आणि परिणाम म्हणून, गव्हाला निश्चितच मागणी वाढणार आहे. मागणी वाढल्याने साहजीकच ‘गव्हाच्या किमती देखील गगनाला भिडणार आहेत. मात्र, या संधीचा फायदा केंद्र सरकारला धोरण आखून लवकरात लवकर उठवावा लागणार आहे.

हे देखील वाचा‘या’ धोरणांमुळे भारताची बेभरवशाचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख; शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसं लुटतंय, वाचा सविस्तर

कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान वाचून..

Xiaomi च्या ‘या’ दोन फोनमुळे सगळ्याच स्मार्टफोनचा उठलाय बाजार; भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून हा फोन तुम्हाला घ्यावाच लागेल..

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’

लोकशाहीचा खून! पराभव समोर दिसल्याने योगींची खेळी? संपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक; वाचा संपूर्ण प्रकरण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.