लोकशाहीचा खून! पराभव समोर दिसल्याने योगींची खेळी? ‘सपा’च्या कार्यकर्त्यांनी पकडला ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक; वाचा संपूर्ण प्रकरण

0

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या दहा तारखेला लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या, उत्तर प्रदेश विधानसभेवर कोणाची सत्ता येणार? याविषयी कमालीची उत्सुकता लागून राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तत्पूर्वीच रात्री वाराणसीमधून धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ईव्हीएम भरून जाणारा ट्रक सपाच्या कार्यकर्त्याने पकडल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सातव्या तप्यातले मतदान सोमवारी 7 मार्चका पार पडले. मतदान पार पडल्यानंतर काल रात्री वाराणसीमधील पहारिया मंडईमध्ये ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा, एक ट्रक समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याने, देशभरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधीत प्रशासनचा ईव्हीएम मशीन बदलण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप सपाच्या कार्यकर्त्यांनी केला. या धक्कादायक प्रकारानंतर अखिलेश यादव यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत अनेक धक्कादायक आरोप केले.

भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशधून आपल्या पराभव समोर दिसत असल्याने, अशा प्रकारे लोकशाहीचा खून करण्यात येत असल्याचं, त्यांनी म्हंटले. लोकशाहीची ही शेवटची निवडणूक आहे. या पुढे भारतीय जनता पार्टी विरोधात लढायचं असेल तर, लोकांना क्रांतीच करावी लागेल. असंही अखिलेश यादव म्हणाले. मात्र, दुसरीकडे या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा आधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जिल्हा आधिकारी कौशल राज शर्मा म्हणाले, सपाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी घेऊन जात असल्याचा केलेला आरोप खोटा आहे.

वाराणसीमधील पहारिया मंडीत ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक हा ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी जात असल्याचा आरोप सपा कार्यकर्त्यांनी केला होता, मात्र यात काही तथ्य नाही. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. मंडीतून एका कंपोस्ट गोदामामधून ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यासाठी एका कॉलेजवर नेहण्यात येत होते. बुधवारी मतमोजणी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणासाठी ही ईव्हीएम मशीन नेहमी वापरली जात आहेत. आणि हाच ट्रक सपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला. आणि ही निवडणुकीत वापरलेलेच ईव्हीएम मशीन असल्याच्या अफवा पसरवल्या, अशी माहिती निवेदन जारी करत, जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी म्हंटले आहे.

जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी या संदर्भात साविस्तर माहिती देताना म्हंटले, निवडणुकीत जे ईव्हीएम मशीन वापरलेल्या आहेत, त्या सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (CRPF) यांच्या देखरेकीखाली असलेल्या स्ट्राँग रूममध्ये सीलबंद आहेत. हा रूम आणि परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. त्याच बरोबर संबंधित सर्वच राजकीय पक्षांची लोक याठिकाणी लक्ष देऊन आहेत. असंही जिल्हाअधिकारी शर्मा म्हणाले.

या मतदार संघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार किशन दीक्षित यांनी घडलेल्या, या प्रकरणाबबत संपूर्ण तपशील मागितला. या ईव्हीएम मशिन कुठे घेऊन जात होता? असे अनेक प्रस्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. हे प्रकरण चांगलेच तापत असल्याने, वाराणसीच्या जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी पोलीस आयुक्त ए सतीश गणेशन यांच्याकडे या बाबद माहिती दिली. सपाचे उमेदवार ‘किसन दीक्षित’ आणि ‘आयुक्त’ ए सतीश गणेशन या दोघांच्या समोर या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली.

आयुक्तांनी चूक मान्य केली.

वाराणसीमधील पहारिया मंडीत ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा, ट्रक सपाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर झालेल्या राड्यावर आता विभागीय आयुक्तांनी आपली चूक झाल्याचं मान्य केलं आहे. प्रशिक्षण देण्यासाठी घेऊन जात असलेल्या ईव्हीएम मशीन संधर्भात प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचं, त्यांनी कबुल केलं आहे. या प्रकारावर बोलताना ते म्हणाले, जर उमेदवारांना खात्री नसेल तर, ते मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनची रुममध्ये जाऊन खात्री करू शकतात.

हे देखील वाचाा

पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल

 हापूसच्या नावाखाली आता ग्राहकांची फसवणूक होणार नाही; ‘ही’आहे नवी योजना…

‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.