Xiaomi च्या ‘या’ दोन फोनमुळे सगळ्याच स्मार्टफोनचा उठलाय बाजार; भन्नाट फिचर्स आणि किंमत जाणून हा फोन तुम्हाला घ्यावाच लागेल…

0

नवनवीनवीन स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आढळते. डिजिटलच्या या युगात स्मार्टफोनचे महत्त्व अधिक वाढल्याने, वापरकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अनेकदा कोणता स्मार्टफोन वापरावा हे समजत नाही. एखाद्याला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तो अनेक दिवस विचार करतो, ऑफर बरोबरच स्मार्टफोनला काय फिचर्स आहेत, याविषयी देखील तो विचार करूनच स्मार्टफोन खरेदी करतो. आता जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

         नवीन फोन घेण्याचा विचार करत आहात?

ज्या लोकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, किंवा जुना स्मार्टफोन वापरून कंटाळला आहे. आणि म्हणून, आता नवीन स्मार्टफोन खरेदीच्या तयारीत आहात, तर आम्ही अशा एका स्मार्टफोन विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये भन्नाट फिचर्स  देखील मिळतील.

अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या Xiaomi कंपनीने आपली Redmi प्रो सीरीज लाँच  केली असून, आता ही सिरीज काल पासून भारतात देखील लॉन्च झाली आहे. Redmi ने Note 11 सिरीजचा काल पासून, भारतात आपला विस्तार करायला सुरुवात केली आहे. Redmi ने आता आपले दोन नवीन फोन बाजारेठांमध्ये उपलब्ध केले असून, यात Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro + 5G चा समावेश आहे. हे दोन्हीं फोन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये आणि भन्नाट फीचर्ससह खरेदी करू शकता.

           जाणून घेऊया किंमत आणि फीचर्स

तुम्ही जर  Redmi Note 11 Pro खरेदी केला, तर यामध्ये तुम्हाला MediaTek Helio G96 चिपसेट मिळणार आहे. त्याचबरोबर Redmi Note 11 Pro + 5G फोनमध्ये तुम्हाला ‘सुपर-फास्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा 695 प्रोसेसर’ मिळणार आहे. जो खूपच भन्नाट चिपसेटसह उत्तम रॅममध्ये आहे.  या फीचर्ससह तुम्हाला या फोनमध्ये मोठी बॅटरी देखील मिळणार आहे. जर तुम्ही स्मार्ट फोन खरेदी करताना कॅमेराचा विचार करत असाल तर, तुम्ही दुसरीकडे कुठेच पाहण्याची आवश्यकता नाही. या फोनमध्ये तुम्हाला उत्तम कॅमेरा सेटप मिळणार आहे.

आपण स्मार्ट फोन खरेदी करताना कॅमेरा तसेच प्रोसेसर आणि स्टोरेजचा नेहमीच विचार करतो. मात्र हा फोन खरेदी करताना तुम्हाला वरील सर्वच फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला अतिरिक्त स्टोरेज देखील वाढवण्यात येणार आहे. याहूनही ग्राहकांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं काय असेल, तर ते म्हणजे फोनची किंमत. मात्र यात देखील हा फोन तुमच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोनची किंमत फक्त वीस हजार रुपये  आहे.
सुपर कॅमेरा

Redmi Note 11 Pro या फोनच्या तुलनेत Redmi Note 11 Pro+ 5G मध्ये तुम्हाला आणखी उत्तम कॅमेरा मिळणार आहे.  Redmi Note 11 Pro मध्ये 108MP प्रायमरी कॅमेराबरोबर क्वाड-रीअर कॅमेरा सेटअपसह मिळणार आहे. जो कॅमेरा विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार उत्तम प्रतीचा कॅमेरा आहे. जो रिझोल्यूशन इमेज सेन्सरसह मिळतो. Redmi Note 11 Pro फोनमध्ये तुम्हाला 108MP प्रो-ग्रेड मेन कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर  Redmi Note 11 Pro+ 5G मध्ये 108MP मुख्य सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे.

                       जबरदस्त डिस्प्ले

प्रत्येकजण स्मार्ट फोन खरेदी करताना डिस्प्लेचा विचार करूनच फोन खरेदी करत असतो. या दोन्हीं फोनमध्ये तुम्हाला डिस्प्ले विषयी तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. Redmi Note 11 Pro आणि Pro Plus हे दोन्हीं फोन व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहेत. आणि त्यामुळे याचा डिस्प्ले 6.67 इंच FHD + AMOLED डॉट डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात तुम्हाला अतिरिक्त रंग मिळणार आहे.

                        लाजवाब रिफ्रेश

अनेकजणांना फोन वापरताना टच स्क्रिनचा प्रॉब्लेम जाणवतो. मात्र या फोनमध्ये तुम्हाला या फोनची  स्क्रीन सेकंदाला 120 वेळा रिफ्रेश होताना पाहायला मिळणार आहे.  स्क्रिन रिफ्रेश झाल्यामुळे तुमचा  डिस्प्ले गुळगुळीत त्याचबरोबर सुपर-फास्ट झाल्याचा फील येणार आहे. जर तुम्ही गेम खेळत असाल तर, कसलाही प्रॉब्लम यात पाहायला मिळणार नाही.

                     विशेष असा ब्राइटनेस

अनेक फोनमध्ये कडाक्याच्या ऊन्हामध्ये डिस्प्ले व्यवस्थित दिसत नाही, मात्र या फोनमध्ये तुम्हाला याचा सामना करावा लागणार नाही. तुम्हीला जर आपल्या मोबाईलची स्क्रीन चमकदार प्रकाशात पाहता येत नसेल तर, डोळे झाकून या फोनमध्ये तुम्ही इंवेस्ट करू शकता. या फोनमध्ये,1200 nits असल्याने तुम्ही सूर्यप्रकाशात देखील वाचू शकता. या फोनमध्ये रीडिंग मोड 3.0 एकत्रित केला आहे. ज्यामुळे सरळ सरळ हाय डेफिनेशन डिस्प्ले वापरताना देखील डोळ्यांना काहीही त्रास होणार नाही.

                   सर्वोत्तम इमेज सेन्सर तंत्रज्ञान

Redmi च्या या दोन्हीं फोनमध्ये  सर्वोत्कृष्ट इमेज सेन्सर बसवण्यात आला आहे. जो उत्तम तंत्रज्ञानासह मोबाइल फोटोग्राफीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. अल्ट्रा-हाय-रिझोल्यूशन HM2 इमेज सेन्सर त्याचबरोबर 9-इन-1 पिक्सेल बिनिंग असल्याने तुम्हाला कमी प्रकाशात देखील, भन्नाट फोटो काढणे सहज सोप्प झालं आहे.

                        जलद चार्जिंग

धावपळीच्या जीवनात तुम्हाला तुमचा फोन जलद चार्जिंग करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या फोनमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग देखील मिळणार आहे. हा फोन तुम्ही अवघ्या 15 मिनिटांत शंभर टक्के चार्जिंग करू शकता. फास्ट चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला 67W टर्बो सोनिक चार्ज 3.0 मिळणार आहे.

                तब्बल 5000mAH बॅटरी

Redmi ने  Note 11 Pro च्या दोन्हीं फोनच्या बॅटरी 5000mAH दिली आहे. जी 67W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. आणि म्हणून हा फोन केवळ 15 मिनिटात चार्जिंग होतो. अनेकजण बॅटरी बॅकअपचा सर्वात जास्त विचार करतात, मात्र तुम्हाला यात देखील हा फोन कोणतीही तक्रार करू देणार नाही.

                   नवीन कूलिंग तंत्रज्ञान

आपण पाहतो, स्मार्ट फोन थोडावेळ गेम खेळली किंवा चार्जिंगला लावला तरी, देखील लगेच गरम होतो. मात्र हा फोन तुम्हाला याची देखील तक्रार करू देणार नाही.  Redmi Note 11 Pro+ 5G या फोनवर लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान वापरल्याने उष्णतेचा याच्यावर कसलाही परिणाम होताना पाहायला मिळत नाही. हे तंत्रज्ञान उपकरणाद्वारे निर्माण झालेली उष्णता नष्ट करण्याचे काम करते. आणि यामुळे बॅटरीच्या समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत.

                         कमालीचा प्रोफेसर

Redmi Note 11 Pro Plus 5G या फोनचा प्रोफेसर हायपर-फास्ट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 देण्यात आलेला आहे. जो सर्वोत्कृष्ट आहे. ज्यामुळे 5G प्रोसेसरसह येतो. प्रोफेसर बरोबर 8GB पर्यंत RAM देखील मिळणार आहे.

                        ही आहे किंमत

अनेकजण  स्मार्ट फोन खरेदी करताना फीचर्ससह किमतीचा देखील विचार करतात. आपल्या बजेटमध्ये अनेक फीचर्स असणारा फोन खरेदी करता यावा यासाठी अनेक जण धडपडतात. मात्र यात देखील हा फोन तुमचं मन जिंकेल.  हे दोन्ही फोन तुमच्या अगदी बजेटमध्ये मिळताना पाहायला मिळते. दोन्हीं स्मार्टफोन 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला मिळतात.

हे देखील वाचा फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’

‘Flipkart’चा धमाका! Samsung redmi सह अनेक ‘स्मार्टफोन’वर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.