फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’ ‘

0

केंद्र सरकारने 2018 मध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये तीन टप्प्यात पाठवण्यातचा निर्णय घेतला. सुरुवातीला अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येत होता. मात्र नंतर या गोजनेत बदल करण्यात आला, आणि आता सरसकट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.

शेतकऱ्याचा संघर्ष आणि शेतीच्या मशागतीसाठी आर्थिक मदत म्हणून, केंद्र सरकारने ही योजना लागू केली. या योजनेत अनेक बोगस शेतकरी देखील लाभ घेत, असल्याचं समोर आल्यानंतर, सरकारने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला. जर शेतकऱ्यांना या योजनेचा अकरावा हप्ता हवा असल्यास आता प्रत्येकाला ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारने ही योजना 2018 पासून सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत दहा हप्ते जमा झाले आहेत. म्हणजेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत वीस हजार रुपये मिळाले आहेत. आणि आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र आता अकराव्या हप्त्यात दोन हजार नाही, तर तब्बल चार हजार रुपये मिळणार असल्याचे देखील बोललं जातंय.

  फक्त याच शेतकऱ्यांना मिळतील चार हजार 

या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रसरकारने पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आणि आता अकरावा हप्ता देखील लवकरच म्हणजे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना अकरावा हप्ता दोन हजार ऐवजी तब्बल चार हजार रुपये मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणजे ही ऑफर किंवा संधी केवळ अशाच शेतकऱ्यांना मिळणार आहे, ज्यांनी या योजनेसाठी अद्याप अर्ज केलेला नाही. मात्र ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

तब्बल चार हजार येणार खात्यावर

अजून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीएम कृषी सन्मान योजनेसाठी अर्ज केला नाही, परंतु ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. आणि त्यांनी अर्जासंबधीच्या संपूर्ण नियम आणि अटी पूर्ण केल्या आहेत, अशाच शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणारा ११ वा हप्ता ४ हजाराचा मिळणार आहे. अजूनही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नसली तर, अकरावा हप्ता मिळवण्यासाठी ३१ मार्च २०२२ च्या अगोदरच नोंदणी करणं गरजेचं आहे. चार हजार का मिळणार आहेत? तर दहावा आणि अकरावा असे दोन्हीं हप्ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

e-KYC) करणं बंधनकारक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक नव्हतं. मात्र केंद्र सरकारने या नियमात मोठा बदल केला असून, आता सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. तरच शेतकऱ्यांना अकरावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संपूर्ण माहिती केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केली आहे.

येथे क्लिक करा आणि जाणून घ्या ई-केवायसी कशी करायची..

हे देखील वाचा Flipkart’चा धमाका! Samsung redmi सह अनेक ‘स्मार्टफोन’वर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..

लोकशाहीचा खून! पराभव समोर दिसल्याने योगींची खेळी? संपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक; वाचा सविस्तर..

लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही! ‘फिल्मी कहाणी’ वाचा सविस्तर..

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण...

‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर.

.केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.