लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही! ‘फिल्मी कहाणी’ वाचा सविस्तर..

0

उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, शेतकरी आता काळानुसार आधुनिक शेतीकडे वळण्याचा पाहायला मिळतं. शेतीबरोबरच तो आता शेतीपूरक व्यवसाय देखील करत असल्याचं, आपण अनेक वेळा पाहतो. फक्त शेतीवरच अवलंबून राहिलं तर अचानक होणारे वातावरणात बदल, आणि अवकाळी पावसामुळे सगळं होत्याचं नव्हतं होतं. हे अनेकांच्या लक्षात आल्याने आता शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळला आहे. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून, शेतकरी अनेक नवनवीन प्रयोग करत असतात.

काही महिन्यांपूर्वी अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून मला गांजाची शेती करण्याची परवानगी द्या, असं म्हटलं होतं. त्याची देखील चर्चा राज्यभर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्या शेतकऱ्याला आपण केलेली मागणीही कायद्याला धरून नसल्याचं माहित होतं. मात्र जळगाव मधील चोपडा तालुक्यातल्या ‘प्रकाश पाटील’ या पट्ट्याने कशाचीही पर्वा न करता, तब्बल चार एकर अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे ‘प्रकाश पाटील’ या शेतकरी तरुणाने अफूच्या शेती करायचे धडे चक्क युट्युबवर घेतले. आणि त्याचे प्रात्यक्षिक आपल्या शेतात केले. विशेष म्हणजे, प्रकाशने तीन महिने अफू संभाळून देखील तीन महिने कोणालाही ठावठिकाणा लागू दिला नाही. कोणालाही आपण अफूची लागवड केली आहे, हे माहिती होऊ नये म्हणून, या बहाद्दाने शेतात चहूबाजूंनी मका पेरली. मात्र काढणीच्या वेळेस, स्थानिक पोलीसांना याची माहिती मिळाली. आणि अखेर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढेनी कारवाई करत अफू ताब्यात घेतला.

या कारणांमुळे अफूची शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्याला कितीही क्षेत्र असलं तरी, गरिबी ही त्याच्या पाचवीलाच पुजलेले असते. वर्षभर कठोर मेहनत करून शेतात शेतकरी भरमसाठ उत्पादन काढतो. मात्र ऐन भरात पीक आल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस कोसळतो. आणि यात शेतकऱ्यांचं सगळं होत्याचं नव्हतं होतं. हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जरी पिक भरात आलं तरी, त्याच्या मालाला चांगला भाव मिळेल, याची काही गॅरंटी नसते. आणि म्हणून मी देखील असली पीक न घेता, काही तरी वेगळं करण्याचा प्लान आखला, असं त्याने सांगितलं.

अफूच्या शेतीविषयी कोणालाही काही विचारण्यापेक्षा याची जास्त चर्चा नको म्हणून, मी युट्यूबवर या पिकाची सगळी माहिती घेतली. लागवड, काढणी पासून ते विकण्यापर्यंत मी परिपूर्ण अभ्यास केला. गरीबी पाचवीलाच पुजलेली असल्याने मी हा कठोर निर्णय घेतला. मात्र मी असं करायला नको होतं. असंही शेतकऱ्याने म्हटलं असल्याची माहिती आहे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. कठीण परिश्रम घेऊन देखील मला यश मिळाले नसल्याने, मी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले.

      युट्युब बघून घेतले, अफूच्या शेतीचे धडे

एकीकडे कुठल्याही पिकात पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हतं. तर दुसरीकडे कर्जबाजारीपणा, यामुळे पैसा कमवण्याचा इतर कोणता मार्ग सापडतो का? याविषयी मी युट्यूब पाहू लागलो. त्यात मला अफूची शेती हा उत्तम पर्याय असल्याचं समजलं. आणि अखेर मी या विषयी संपूर्ण माहिती घेतली.  अफूची लागवड कशी करायची? त्याची निगा कशी राखायची? किती दिवसात काढायला येईल? काढल्यानंतर त्याची विक्री कशी करायची? याची सगळी माहिती मी युट्यूबवर घेतली. आणि पाच एकर क्षेत्रापैकी चार एकर मी अफूची लागवड केली. आणि राहिलेला एका एकरात मी चहूबाजूंनी मका पेरली. असं या बहद्दराने सांगितले.

   अफू कापण्याच्या तयारीत असतानाच अटक

अफू कोणत्या सीजनमध्ये उत्तम येतो? तो किती महिने शेतात ठेवायचा? या विषयी त्याने युट्युबवर संपूर्ण माहिती घेतली. आणि नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चार एकर अफू पेरला. जवळपास तीन महिने काळ गेल्यानंतर, आता अफू कापण्याची प्रक्रिया सुरू करायची होती तेवढ्यात, पोलिसांना कुठून तरी खबर लागली. :अमळनेर’ या ठिकाणी त्याने काही अफू विकला होता, आणि यामुळेच पोलिसांना या संपूर्ण धक्कादायक प्रकाराचा मागोवा लागला.

हे देखील वाचा.  पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल..

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण..

 उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.