Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती

0

प्रत्येकजण आपल्या शरीराची खास करून त्वचेची काळजी घेत असतो. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रत्येकाला आपल्या त्वचेची आणि शरिराची अधीक काळजी ही घ्यावीत लागते. उन्हाळ्यामुळे उन्हात ( ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर त्वचा नेहमी काळी पडते) हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून उन्हाळ्यात त्याचे संरक्षण करण्यासाठी आणि आपण अनेक उपाययोजना करत असतो. मात्र आम्ही तुम्हाला आज सर्वात प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे. ज्यामुळे उन्हाळ्याचा आणि उन्हाचा कसलाही परिणाम तुमच्या त्वचेला होणार नाही.

आपण नेहमी पाहतो, ऋतू बदलल्यामुळे आपल्याला आपल्या खाण्यापिण्यात देखील बदल करावे लागतात. ऋतूनुसार जसा आपल्या आहारात बदल होतो, तसाच बदल आपण आपल्या सौंदर्य प्रसाधनात देखील बदल करतो. जसं की हिवाळ्यात आपण पाहतो, साबणामुळे आपलं शरीर पांढरं पडत असतं. त्यासाठी आपण बाजारात हिवाळ्याच्या स्पेशल साबणाचा वापर करतो. उन्हाळ्यात देखील आपण आपला आहार आणि सौंदर्य प्रसाधने बदलत असतो. मात्र तरी देखील उन्हाळ्यात आपल्या त्वचेवर उन्हाचा परिणाम हा होतोच.

उन्हात जर आपण बाहेर फिरायला जाणार असू, तर आपण सनस्क्रीमचा वापर करतो. मात्र त्याने फारसा परिणाम पडतोच असं नाही. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी त्वचा काळी आणि त्वचेचा कुठलाही आजार होऊ नये म्हणून, एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकांना त्वचेवर पुरळ येण्याची समस्या उद्भवत असते. त्वचेवर ही पुरळ चेहऱ्यावर सतत येणाऱ्या घामामुळे, आणि तेलकटामुळे निर्माण होत असते. त्यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोकाही अधीक वाढतो.

उन्हाळ्यात त्वचेला होणाऱ्या समस्यांपासून जर तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर, तुम्हीला तुळशीचा पॅक बनवून त्याचा नियमित वापर करावाच लागेल. जर तुम्ही हा नियमित वापर केला तर तुमच्या त्वचेवर संसर्ग होणार नाही, आणि त्वचेची समस्या जाणवणार नाही. असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे. हा तुळशीचा पॅक बनवणे आणि उपलब्ध करणं हे देखील फार अवघड नाही. आज आपण पाहतो, प्रत्येकाच्याच घरी खासकरून खेडेगावात तुळशीची झाडं आपल्या घरासमोर असतात.

तुळशीच्या पानांमध्ये कमालीचा पोषक तत्वांचा भरणा आहे. आपले पूर्वज देखील बोलताना तुम्ही ऐकले असेल, तुळशीमध्ये अनेक गुणवैशिष्ट आहेत. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये तुळशीचा समावेश केला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘हिमालया’फेस वॉश हा तुळशी पासून बनवलेला आहे. मात्र तुळशी पेक्षा तो नक्कीच च जास्त प्रभावी नाही.

तुळशीचे त्वचेचे फायदे

अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी ही गुणधर्म प्रामुख्याने तुळशीमध्येच आढळून येतात. आपण सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. हे गुणधर्म इतकी प्रभावी आहेत, की आपल्या त्वचेला कुठल्याही संसर्गापासून वाचवण्यची ताकद यांच्यामध्ये आहे. तुळशीचा पॅक हा आपल्या शरिरातील रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्याचा काम करत असतो. यावरूनच तुम्ही तुळसीच्या गुणधर्माचा तुम्ही अंदाज लावू शकता.

उन्हाळ्यात आपण पाहतो, आपल्या त्वचेवर बॅक्टेरियाच प्रमाण वाढत असतं. परंतु तुळस बॅक्टेरिया वाढू देत नाही. आणि म्हणुन, जर तुम्ही तुळशीच्या पॅकचा नियमित वापर केला तर, त्वचेवर असणाऱ्या सुरकुत्या,काळे डाग, अशा अनेक समस्यां तुमच्या आसपास देखील येणार नाहीत. अलीकडच्या काळात तुम्ही तुळशीपासून बनवलेले अनेक सौंदर्यप्रसाधने वापरतात बरोबर ना. मात्र त्यात केमिकल असल्यामुळे, तुम्हाला 100% रिझल्ट मिळत नाही. परंतु, जर तुम्ही तुळस वापरली, तर मात्र तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य मिळते, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संसर्गापासून देखील तुमची त्वचा निरोगी राहते.

हे देखील वाचा.प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा धुमाकूळ; swift WagonR सह या गाड्यांवर पन्नास हजारापर्यंत सूट! वाचा सविस्तर..

Breaking news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्कई’ यांची लष्करी कारवाईत हत्या; सोशल मीडियावर.

या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.