प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या ‘कृत्या’ने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

0

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला फसवल्याच्या घटना आपण अनेक वेळा पाहतो, यात काही नवीन नाही. मात्र मुंबईच्या तुर्भे भागात प्रेमीयुगुलांमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीने लग्नाची मागणी केल्यामुळे, प्रियकराने तिचा गळा आवळून हत्या केल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. ही घटना 23 फेब्रुवारीला घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली, असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रियकराने आपल्या प्रेयसीला लॉजवर बोलावून घेतलं होतं. दोघेही लॉजवर मुक्काम करण्यासाठी आल्याची माहिती मिळते. दोघांमध्ये लग्नाच्या मागणीवरून कडाक्याचं भांडण झालं. प्रेयसीने लग्नाची मागणी केल्यानंतर, तरुणाचा संताप अनावर झाला. आणि यातून या तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दोघांचे भांडण सुरू असताना रूम मधून बाहेर आवाज येत असल्याने, हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना फोन केला.

 

फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता, तरुणी बेशुद्ध अवस्थेत होती. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या दोघांनी मुंबईतील तुर्भे भागातील ‘साई प्रणव’ लॉजवर २३ फेब्रुवारीला एक रुम बुक केली होती.

 

पोलिसांच्या चौकशीत या तरूणाने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मीच गळा आवळून हत्या केल्याचं पोलीसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, एपीएमसई पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही गेल्या पाच वर्षापासून एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तरुणी, आपण लग्न करूयात असं वारंवार म्हणत होती. अखेर यालाच वैतागून त्याने तिची हत्या केल्याची माहिती आहे.

हेही वाचा-.   नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

अलिकडच्या काळात डाळिंबागा नष्ट का होतायत? त्यावर मात कशी करायची? चिंता मिटली! केंद्रीय पथकाने सांगितले उपाय

कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख अनुदान..

 ‘या’ कारणांमुळे बहीण हसीना पारकर आणि नवाब मलिक यांच्या बैठका व्हायच्या; ईडीनेच केला धक्कादायक खुलासा..

ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे..,”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.