अलिकडच्या काळात डाळिंब बागा नष्ट का होतायत? त्यावर मात कशी करायची? चिंता मिटली! केंद्रीय पथकाने सांगितले उपाय..

0

शेती म्हणजे काही जुगरापेक्षा वेगळी नाही, हे प्रत्येकजण मान्य करेल. उत्पन्न चांगले मिळावे यासाठी शेतकरी खर्चात तडजोड करत नाही. मात्र उत्पन्न ठीकठाक निघून देखील त्याच्या पदरी काळी मातीच पडते. त्याचे कारण म्हणजे निसर्ग. अलीकडच्या काळात वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झाले आहे. खासकरून फळबागांना या वातावरणाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते.

नेहमीपेक्षा यंदा शेतकऱ्यांना खूप तोटा सहन करावा लागला आहे. वातावरणात होणाऱ्या सतत आणि अचानक बदलामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खासकरून फळबाग उत्पादक शेतकरी. डाळिंब उत्पादन शेतकऱ्याला देखील या वर्षी मोठा फटका बसला असल्याचे पाहायला मिळाले आहे. सोलापूरमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. खासकरून सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात.

या दोन तालुक्यांमध्ये डाळिंबाचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. परंतु यावर्षी वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणाचा सामना या शेतकऱ्यांना करता आला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंब आली नाही. हे नक्की कशामुळे झाले? याचा केंद्रीय पथकाने या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन डाळिंब बागांचा अभ्यास केला आहे.

डाळींब ही फळबाग शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देते. ही गोष्ट जरी खरी आली तरी, डाळिंब बागांना रोग हा पाचवीला पुजलेला असतो. जेवढी निगा, औषध फवारणी डाळिंब बागेला लागते, तेवढे इतर कोणत्याही पिकाला लागत नाही, असं शेतकरीच सांगतो. डाळिंबाला खोड किडीचा प्रादुर्भाव तर असतोच, पण यावर्षी वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे शेतकर्‍यांना आपल्या बागांचे व्यवस्थापनही करता आले नाही.

सतत वातावरण बदलामुळे आणि अचानक पडलेल्या धुक्यामुळे येथील डाळिंब फळबागांचे अधिकचे नुकसान झाले असल्याचे, नवी दिल्ली येथील तज्ञांच्या केंद्रीय पथकाच्या अभ्यासात समोर आले आहे. डाळींब आणि तेल्या रोग हे जणू समीकरणच आहे. त्यावर अद्याप प्रभावी औषध निघालेच नाही. पण दुसरीकडे यावर्षी खोडकीड देखील या व डाळिंबाच्या बागेत वर्षभर सक्रिय राहिल्याचे या पथकाने म्हंटले आहे.

या वर्षी जास्त पाऊस झाल्याने, खोडकीडीचा प्रादुर्भाव बागांवर अधिक झाला. त्याचबरोबर वातारणात होणाऱ्या सतत बदलाचा सामना देखील शेतकर्‍यांना करता आला नाही. खोडकीड रोगाचे नियंत्रण आणि त्याचे नियोजन वेळेवर न झाल्याने, या रोगाची वाढ होण्यास पोषक वातावरण तयार झाले, आणि त्याचा उत्पादनावर, बागांवर खूप मोठा परिणाम झाला. असं पथकातील सहसंचालक डॉ. किरण दशेकर यांनी अभ्यास केल्यानंतर सांगितले.

अशा वातावरणात जर शेतकऱ्यांना डाळिंबावरचा रोग कमी करायचा असेल किंवा किडीचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास, शेतकर्‍यांनी एक लिटर पाण्याला इमामेक्टीन बेंजोएट २ ग्रम, तसेच प्रोपिकॉननाझोल २ ml मिसळून बागांवर फवारणी करन गरजेच आहे. बहार धरायच्या अगोदर शेतकऱ्यांनी जमिनीपासून दोन फुट फांदीवर लाल मातीचे प्रमाण अधिक घेऊन, चार किलो,इमामेक्टीन बेंजोएट २०ml, कॉपर ऑक्सिकलोराईड २५ ग्रॅम, हे सगळं एकत्र करून झाडांना लेप देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर १० टक्के बोर्डो मिश्रणाचा लेप अदलून-बदलून लावण्याचा सल्ला देखील कीटक शास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र देवरमनी यांनी दिला.

हेही वाचाउस उत्पादक शेतकऱ्यांचा गोडवा या सरकारनं पुन्हा हिरावून घेतला; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का

ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; …अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद

तुरा येऊन ऊस म्हातारा झाला,तरी कोणी नाही नेला; संतप्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

लग्नाची वरात चक्क हार्वेस्टर वरून काढली; शेतकऱ्याचा नादच खुळा, व्हिडिओ व्हायरल..

या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या...

नवाब मलिक बेधडकपणे ईडीचा सामना करत असले तरी, त्यांचा अनिल देशमुख होणार हे निश्चित; ईडीची पुढची दिशा काय असणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.