उस उत्पादक शेतकऱ्यांचा गोडवा या सरकारनं पुन्हा घेतला हिरावून; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का

0

उसाचा रास्त व किफायतशीर भाव म्हणजेच एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने, आता ण चांगलंच राजकारण पेटलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. याबरोबरच माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सरकारने उसाची एफआरपी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, लगेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात नारे द्यायला सुरुवात केली गेली आहे. सरकारच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ऊस नियंत्रण कायद्यानुसार जर ‘एफआरपी’मध्ये काही बदल करायचा असेल, तर त्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारला यात काहीही लुडबूड करण्याचा अधिकार नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.

एफआरपीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. तरी देखील या सरकारने घेतलेला हा अत्यंत दुर्दैवी आहे. आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. शेतकऱ्याने कारखान्यांना ऊस घातल्यानंतर, चौदा दिवसांच्याया आत त्यांना एफआरपी मिळणं बंधनकारक आहे. या निर्णयावीरोधात साखर कारखान्यांनी कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावले, मात्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना घातला आहे. त्यांनी आपल्या उसाच्या वजनाची झेरॉक्स मला द्या, पैसे कसे मिळत नाही ते मी पाहतो, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकार आणि कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर, दोन टप्प्यात एफआरपी देऊनच दाखवा. पुढच्यावर्षी दोन टप्यात कारखान्यांनी एफआरपीचा हप्ता देऊनच दाखवावा. जर कारखान्यांनी एफआरपीचा पहिला हप्ता २२०० रुपये दिला तर त्यांनी आपले कारखाने चालवूनच दाखवावेत, रणसंग्राम जवळच आहे, असं आव्हान राजू शेट्टी सरकार आणि कारखान्यांना दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कमालीचा आक्रमकपणा राजू शेट्टी यांनी पत्करला असल्याचे, दिसून येत आहे.

सरकारच्या या निर्णयाविरोधात रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी देखील या निर्णयावरून राज्य शासनावर टीका केली आहे. राज्यातले हे सरकार शेतकरीद्रोही आहे. माहाविकास आघाडी सरकार विरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचं, माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे. आमच्या आंदोलनाची सुरुवात २६ फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथुन होणार आहे. असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. आमच्या बरोबर भाजपा किसान मोर्चाची मंडळी देखील असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तुरा येऊन ऊस म्हातारा झाला,तरी कोणी नाही नेला; संतप्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या..

‘वाइन’साठी जी द्राक्षे लागतात ती महाराष्ट्रात पिकतच नाहीत; उत्पन्नाच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा गंडवले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.