तुरा येऊन ऊस म्हातारा झाला,तरी कोणी नाही नेला; संतप्त शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

0

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे, पाहायला मिळत आहे. गळीत हंगाम सुरु होऊन जवळपास चार महिने होत आले, तरीही अनेक शेतकऱ्यांचा उस हा शेतामध्येच असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला तुरे आले असतानाही, उस तोडण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे, चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचे गाळप होत असल्याचे समोर आले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांचा ऊस अजूनही ऊस तोडणी कामगार मिळत नसल्याने शेतातच पडून असल्याचे चित्र आहे. कारखाना सुरू होऊन जवळपास चार महिने व्हायला आले, तरी देखील शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा असून, त्याला आता तुरेही आले आहेत. उसाला तूरे आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप मोठी घट झाली आहे.

उसाची लागवड केल्यापासून किमान बारा महिन्यात शेतकऱ्यांच्या उसाची ऊस तोडणी होणे गरजेच आहे. बारा महिन्यांत ऊस तोडून गेला तर, त्या ऊसाला वजनही चांगला मिळतं. आणि साखरेसाठी देखील तो ऊस उपयुक्त ठरतो. ऊसाला चांगलं वजन आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील चार पैसे मिळतात. मात्र साखर कारखाना प्रशासनाचे या संदर्भातले नियोजन खूपच ढिसाळ असल्याने पाहायला मिळत आहे. अणि म्हणून मग याचा मोठा फटका आम्हाला सहन करावा लागत, असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उसाला तुरे येऊन देखील अजूनही ऊस तोडणी होत नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. हा शेतकरी उसाला तुरा आल्याने संतप्त झाला असला तरी, त्याने आपला रोष व्यक्त करण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली आहे. ऋषी माने पाटील या नावाने इंस्टाग्राम आयडी असणाऱ्या एका शेतकऱ्याची उसाच्या तूऱ्या संदर्भातली कविता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

तुरा येऊन उस म्हतारा झाला, तरी कारखानदारानं नाही नेला! चितबॉय, कारखानादार एवढंच काय टोळीच्या मुकादमही भाव खाऊन गेला, तरी उस कोणी नाही नेला! शेवटी याच्या त्याच्या पाया पडून, कसातरी ऊस गेला! मात्र सहा महिने झाले, हप्ता नाही आला! चला उसाची शेती करू या, गोड उसाचे कडू अनुभव पदरात पाडून घेऊ या..! अशा प्रकारचे बोल असणारी, ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही कविता नक्की कोणी म्हटली आहे? यासंदर्भात काही माहिती मिळाली नाही. मात्र ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही कविता वास्तवाशी निगडित असल्याने, या कवितेवर अनेकांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.