‘या’ कारणामुळे महाराष्ट्रातला कांदा दर्जेदार असूनही भाव नाही; केंद्र सरकारच्या…

0

महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmer) मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतल्याचं दिसून येतं. लासलगाव (lasalgaon) येथे मोठी बाजारपेठ असल्याने, नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन केले जाते. दरवर्षीपेक्षा यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागला आहे. सतत वातावरणात होणारे बदल, आणि अचानक होणारा अवकाळी पावस यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.

महाराष्ट्राच्या सर्वच भागात या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान केले आहे. तसं पाहायला गेलं तर रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी दुधारी तलवार असल्याचं बोललं जातं. कारण या काळात अवकाळी पावसाचे संकट शेतकर्‍याच्या डोक्यावर घर करून बसलेले असतं. शेतकऱ्याचे पिक ऐन भरात आल्यानंतर कधी अवकाळी पाऊस पडेल, आणि कधी होत्याचं नव्हतं होईल हे सांगता येत नाही. नेमकं यावेळेसही असंच झालं, आणि शेतकरी अधिक हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले.

रब्बी हंगामात शेतकर्‍यांच्या डोक्यावर अवकाळी पाऊस घर करून बसलेला असतो. त्यातच यावर्षी वातावरणात सतत बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात फार मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. यावर्षी वातावरणात सतत बदल झाला, धुकं देखील मोठ्या प्रमाणात पडले. याचा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. इतर पिकांच्या तुलनेत या वर्षी कांद्याच्या पिकात खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाली. कधी अवकाळी पाऊस, तर कधी सतत वातावरणात होणारे बदल, अचानक पडणारी धुकं, आणि यामुळे कांद्याला रोगाने पछाडलं.

सतत वातावरणाच्या बदलामुळे प्रचंड औषध फवारणी करून देखील शेतकऱ्यांचा कांदा काही मोठा होऊ शकला नाही. आणि यामुळे कांद्याच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली. एकीकडे या वर्षी शेतकऱ्यांवर निसर्ग अधिक कोपल्याचे पाहयला मिळाले, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे देखील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचं पाहायला मिळालं.

सुरुवातीला खराब वातावरणामुळे अधिक रोग पडल्याने, शेतकऱ्यांचा कांदा मोठा होऊ शकला नाही. नळ-बोंडे आले. मात्र आता वातावरण चांगले असल्याने, मागास लागण केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा आता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागला असल्याचे, चांगलं चित्र पहायला मिळत आहे. एकीकडे बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली असली तरी, दुसरीकडे मात्र कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही धोरण ठरविण्यात आले नसल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपासून किरकोळ आणि घाऊक बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीत जवळपास दीड हजार ट्रकची आवक झाली होती. एकीकडे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असूनही, दुसरीकडे मात्र केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली नसल्याने, कांद्याचे बाजार भाव दिवसेंदिवस ढासळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारच्या धोरणामुळे आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा दर्जेदार असून देखील, त्यांचा माल किरकोळ भावाने विकला जात असल्याने शेतकरी संतप्त असल्याचे चित्र अनेक बाजारपेठांमधून पाहायला मिळत आहे. सुरुवातीला निसर्ग आमच्यावर कोपला, वारंवार होणाऱ्या अचानक अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याचे प्रचंड नुकसान झालं. सतत वातावरण बदलामुळे या वर्षी कांद्याच्या उत्पादनात अधिक घट झाली. कांदा मोठा झाला, कांद्याला नळ-बोंडे आले.

एकीकडे हे चित्र असताना, आम्ही मागास लागवण केलेला कांदा तरी अवकाळी पावसात प्रचंड झालेले नुकसान भरून काढेल, असं आम्हाला वाटत होतं. मात्र आता कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने आम्ही पुन्हा संकटात असल्याचे शेतकरी म्हणताना दिसतो आहे. केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे. अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसून येत असल्याचे, चित्र महाराष्ट्रभर दिसून येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.