नवाब मलिक बेधडकपणे सामना करत असले तरी, त्यांचा अनिल देशमुख होणार हे निश्चित; ‘अशी’ असणार ‘ईडी’ची पुढची दिशा..

0

केंद्रीय यंत्रणा राष्ट्रवादी नेत्यांच्या हात धुवून मागे लागल्याचे चित्र गेल्या एक दीड वर्षापासून महाराष्ट्र पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ,(chagan bhujbal) अनिल देशमुख, ( anil Deshmukh) आणि आता नवाब मलिक ( nawab Malik) यांना झालेली अटक हे याचे उत्तम उदाहरण आहे. नवाब मलिक मोठ्या हिंमतीने आणि बेधडकपणे कारवाईला सामोरे जात असले तरी, त्यांचाही अनिल देशमुख होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी सुरू असून, विशेष सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना आठ दिवसांची कोठडी देखील सुनावली आहे. ईडी कडून नवाब मलिक यांना चौदा दिवसांची कोठडी कोर्टाला मागण्यात आली होती. मात्र कोर्टाकडून आठ दिवसांची कोठडी नवाब मलिकांना सुनावण्यात आली.

एकीकडे नवाब मलिक यांना अटक झाली असली तरी, नवाब मलिक मात्र बेधडकपणे कारवाईला सामोरे जात आहेत. जरी नवाब मलिक बेधडकपणे सामोरं जात असले तरी, देखील त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. नवाब मलिक ईडीच्या कोठडीत फक्त आठ दिवस राहणार आहेत, असं अनेकांना वाटत आहे. मात्र आठ दिवसानंतर नवाब मलिक बाहेर येतील, हे कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. ईडी आठ दिवस नवाब मालिकांच्या विरोधातले पुरावे गोळा करणार आहे.

आठ दिवस नवाब मलिक यांची कसून चौकशी होणार असून नवाब मलिक यांच्या विरोधात पुरावे शोधण्याचा प्रयत्न होणार आहे. एवढंच नाही तर, ईडी नवाब मलिक यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्रांची देखील तपासणी करणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या लोकांची चौकशी करून नवाब मलीक यांच्या विरोधात ईडी आठ दिवसांत पुरावे गोळा करणार आहे. आणि गोळा झालेल्या पुराव्याच्या आधारे इडी पुन्हा नवाब मलील यांना कोर्टासमोर हजर करून, आम्हाला आणखी काही दिवस कोठडी हवी असल्याचा युक्तिवाद करणार असल्याची माहिती आहे.

एकूणच या प्रकरणात नवाब नवाब मलिक जरी खंबीरपणे आणि बेधडक सामोरे जात असेल तरी, त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. नवाब मलिक आठ दिवसांत बाहेर येतील ही भोळी आशा राष्ट्रवादीच्या (ncp) कार्यकर्त्यांना आहे. मात्र नवाब मलिक यांचा अनिल देशमुख होणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या असून, याची दाट शक्यता देखील आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले असून, या संधर्भात काही ठोस पाऊले उचलणार असल्याचं कळतंय

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जाणूनबुजून टार्गेट केले जात असल्याचे, पाहायला मिळत आहे. जी लोकं भाजपवर आणि केंद्राच्या नेत्यांवर टीका करतील, त्यांच्यावर अशाच प्रकारे दबावतंत्र टाकलं जाईल, असं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.