ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; …’अन्यथा’ पीएम किसान हप्ता होईल बंद

0

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आणि २०१८ पासून याची सुरुवात करण्यात आली. 4 महिन्यांच्या अंतराने वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये यायला सुरुवात झाली. पहिला हप्ता एप्रिलमध्ये दुसरा ऑगस्टमध्ये, तर तिसरा डिसेंबरमध्ये असं या योजनेचं स्वरूप आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, या वेळेसचा दहावा ‘हप्ता’ मुद्दाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, एक जानेवारी २०२२ ला वितरित करण्यात आला.  असा आरोप विरोधकांनाकडून करण्यात आला. दहावा हप्ता जमा करण्यापूर्वी शेतकऱ्यांना e-kyc करणं गरजेच असल्याचं बोललं जाऊ लागलं होतंं, मात्र केंद्र सरकारनं दहाव्या हप्त्यासाठी कोणतीही अट लावली नाही. आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

परंतु आता इथूनपुढे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, मात्र “ई-केवायसी” अनिवार्य असल्याचं ‘सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश’ यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण बंधनकारक असणार आहे. सीएससीवर “ई-केवायसी” करण्यासाठी शेतकऱ्यांना एका खात्यासाठी 15 रुपये आकारले जाणार, असल्याची माहिती केंद्र सरकारकडून सांगण्यात आली आहे.

                       eKYC कशी कराल?

सर्वप्रथम आपण केवायसी हा काय प्रकार आहे? हे पाहूयात. eKYC म्हणजेच “Electronic Know your Client” असा याचा लाँग फ्रॉम आहे. यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते. आता आपण eKYC कशी करायची? हे पाहुयात. तर PM किसान योजनेसाठी eKYC करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या वेबसाइटवर “pmkisan.gov.in” जायचं आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर, पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन होईल.

वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला खालील सूचना पाहायला मिळेल. याचा अर्थ पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक असल्याचं तुमच्याही लक्षात येईल.

“eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. Pls. click eKYC option in Farmer Corner for Aadhar based OTP authentication and for Biometric authentication contact nearest CSC centres”

आता वर दिलेल्या सूचनेत दोन प्रकारे तुम्ही तुमचा “ई-केवायसी” पूर्ण करू शकता. यातली पहिली पद्धत आपण पाहू. तुमचा फोन नंबर जर आधार कार्डाशी लिंक असेल तर, तुम्ही “Farmer Corne” या पर्यायावर क्लिक करून Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. पण, जर तुम्हाला Biometric authentication करावं लागत असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरलााच भेट द्यावी लागणार आहे.

आपण यातला पहिला पर्याय जो आधार कार्ड वापरून ekyc करायचं आहे ते पाहूयात. सर्वप्रथम तुम्ही “Farmers Corner” मधील eKYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज ओपन झालेलं असेल. हे पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे, अक्षरं, आहे अशीच टाकायची आहेत.

आधार क्रमांक, आकडे, अक्षरे टाकल्यानंतर समोर तुम्हाला Search वर क्लिक करायचं आहे. Search वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यात प्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहेे, तोच नंबर इथं टाकायचा आहे.

ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. ते तुम्ही इथल्या OTP या रकान्यात टाकायचा आहे. यानंतर पुढे तुम्हाला “Submit for Auth” असा एक रखाना दिसेल, तुम्हाला याच रकान्यावर क्लिक करायचं आहे. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला “EKYC is Sucessfully Submitted” असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हिताची ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.