नवरा असतानाही बाहेर चाळं करणाऱ्या बायकांना हायकोर्टाने फटकारलं; काय म्हणालं हायकोर्ट

0

लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा क्षण असतो. प्रत्येकानेच लग्नाच्या अगोदर पासूनच आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार कसा असावा याची कल्पना केलेली असते. वैयक्तिक स्वातंत्र्याबरोबरच, सुखाचा संसार थाटण्यासाठी दोन्हीं जोडप्यांमध्ये विश्वास आणि एकमेकांप्रती प्रेम असणं फार गरजेचे असते. नाहीतर आयुष्याची राखरांगोळी व्हायला फारसा वेळ लागत नाही.

अलिकडच्या. काळात वैवाहिक जीवनामध्ये महिलांकडून पुरुषाचा छळ होण्याच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आपला मनमानी कारभार करताना दिसून येतात. आणि याचा खूप मोठा मानसिक त्रास पुरुषांना सहन करावा लागतो. कायद्याने देखील महिलांना झुकते माप दिल्याने, नाही म्हटलं तरी, पुरुषांचा महिलांच्या तुलनेत अधीक छळ होताना दिसून येतो. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे.

एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर करताना केरळ हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. आपला नवरा सोडून इतर पुरुषांसोबत फोनवर बोलणं म्हणजे, वैवाहिक क्रूरताच असल्याचं केरळ हायकोर्टाने म्हंटलं आहे. नवऱ्याने वारंवार इशारा करून देखील, पत्नी त्याकडे दुर्लक्ष करून जर एखाद्या दुसऱ्या पुरुष व्यक्तीला गुपचुप फोन करत असेल तर, ही वैवाहिक क्रूरताच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायाधीश ‘कौसर एडप्पागथ’ यांनी हा महत्वपूर्ण निकाल देताना असंही म्हटलं आहे, जोवर आपले वैवाहिक जीवन पूर्वीप्रमाणे होत नाही, तोपर्यंत फक्त तडजोड करणं, सहन करायचं, म्हणजे क्रूरतेचं समर्थन होऊ शकत नाही. आपल्या नवऱ्याने वारंवार समज देऊन देखील, पत्नी त्याची अवहेलना करत, इतर पुरुषाला गुपचू कॉल करणं आणि तेही रात्री उशिरा, हे योग्य नाही. ही वैवाहिक क्रूरताच आहे. असंही केरळ हायकोर्टाने म्हटलं आहे.

केरळ हायकोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी पीडित पतीने, व्यभिचार आणि क्रूरतेता आधार घेत, फॅमिली कोर्टाचा दरवाजा ठोठवत घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु त्याची ही याचिका फेटाळण्यात आली होती. फॅमिली कोर्टात याचिका दाखल करताना पिडित पतीने, लग्नाच्या सुरुवातीपासूनच माझ्या पत्नीने आपल्या जिवनात अंधार आणला आहे. माझ्या पत्नीने खूप सारी अनैतिक कृत्ये केली आहेत. असं पिडीत पती फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटला होता. एवढंच नाही तर, माझ्या पत्नीचे लग्नआधी दुसऱ्या पुरुषांसोबत अनैतिक संबंध देखील असल्याचं म्हटलं होतं. मात्र फॅमिली कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.

फॅमिली कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे फॅमिली कोर्टाच्या निकालाला, पीडित पतीने आव्हान देत, केरळ हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. पत्नीकडून आपली बाजू मांडताना, अॅड. एम.बी. संदीप यांनी पतीने केलेल्या दाव्याचे खंडन करत म्हटलं, माझा अशिल एखाद्या वेळेस इतर व्यक्तीला फोन करत होता. परंतु कोर्ट म्हणाले, ती इतर पुरूषाला फोन करत होती, यावरून त्यांचे, अनैतिक अथवा चुकीचे संबंध होते असं नाही. परंतु नवऱ्याने वारंवार इशारा करून देखील, त्याची अवहेलना करणं चुकीचं आहे. पत्नी अन्य पुरुषाला सतत गुपचुप कॉल करणं, आणि तेही उशीरा रात्री हे बरोबर नाही. आणि ही वैवाहिक क्रूरताच आहे. असंही केरळ हायकोर्टाने निकाल देताना म्हटलं आहे.

हेही वाचा सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचा धुमाकूळ; डोक्यावर जठा,हातात त्रिशूल! काय आहे प्रकरण

ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; …अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद

‘या’ कारणामुळे अण्णा हजारेंना केजरीवालने मारण्याचा कट रचला होता; कोणी वाचवलं अण्णांना…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.