डोक्यावर जटा,हातात त्रिशूळ,अंगावर भगवं वस्त्र;अमृता फडणवीसांचा धुमाकूळ; हे आहे कारण..

0

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असतात. माजी मुखयमंत्र्यांच्या पत्नी असल्यातरी त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस यांना गाण्याचा प्रचंड छंद आहे. आणि त्यांनी त्याची जोपासना देखील केली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. आणि त्या गाण्यांची कमालीची चर्चाही झाली.

अमृता फडणवीस यांनी आणखी एक गाणं आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याची माहिती दिली आहे. या गाण्याचे पोस्टर सध्या कमालीचे चर्चेत आहे. काही वेळातच अमृता फडणवीसांचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे गाणं प्रेक्षकांना २४ फेब्रुवारीला ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे.

अमृता फडणवीस यांनी या गाण्यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. “जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले येकांदरित” असं या गाण्याचं बोल असल्याचं बोललं जात आहे. “जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले” हे वाक्य अमृता फडवविस यांनी पोस्ट केलं आहे.  या फोटोला कॅप्शन देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, भक्ती ही दुर्मिळ आणि नेहमीच एक आकर्षक आध्यात्मिक यात्रा आहे.

‘टाइम्स मुझिक हब’वर (TimesMusicHub), माझ्या आयुष्यातील सर्वात दैवी संगीतमय अनुभव २४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. असं त्या म्हणाल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना त्यांनी हा सुखद धक्का   दिला आहे. आता त्यांचं हे नवं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी देखील अमृता फडणवीस यानी अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांच्या गाण्याला लाईकपेक्षा डीसलाईकच जास्त मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

अमृता फडणवीस हे आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमी नवीन गाणी घेऊन येत असतात. मात्र त्यांच्या आवाजावरून त्यांना अनेक वेळा ट्रोलचा सामना करावा लागतो.  त्यांच्या गाण्याला लाईक्सपेक्षा सोशल मीडियावर डिसलाईकच अधिक मिळतं असल्याची चर्चा जोरदार रंगताना अनेक वेळा पाहिला मिळालं आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी ‘टी-सिरीज’ बरोबर देखील काम केलं आहे. यावेळेस मात्र अमृता फडणवीस यांनी “टाइम्स मुझिक हब” बरोबर काम केलं असून, या गाण्याला शैलेश धनी यांनी मझिक दिले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.