अण्णा आंदोलन: ‘या’ कारणामुळे अण्णा हजारेंना ‘केजरीवाल’ने मारण्याचा कट रचला होता; कोणी वाचवलं अण्णांना..

0

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ नावाखाली 2011 ला झालेल्या ‘अण्णा आंदोलना’ने देशाला नवी दिशा मिळाली. तत्कालीन मनमोहनसिंग सरकारची प्रतिमा मलीन झाली. एवढेच नाही तर 2014 च्या निवडणुकीत याचा खूप मोठा फटका काँग्रेसला सहन करावा लागला, आणि कॉंग्रेसचा मोठा पराभवही झाला. मात्र तेरा दिवस चाललेल्या त्या आंदोलनात अनेक नाट्यमय घटना देखील घडल्याचं आता हळूहळू उघड होऊ लागलं आहे.

‘जनलोकपाल बिल’ संसदेत पारित व्हावेवे, यासाठी ‘अण्णा आंदोलन’ अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली रामलीला मैदानावर सुरू होतं. संपूर्ण देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे त्यावेळी पाहायला मिळालं होतं. एकीकडे या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता, मात्र यात असाही एक पत्रकार होता, जो हे सगळं आपापल्या फायद्यासाठी चालू आहे, हे सांगत होता.

एवढंच नाही तर, अण्णा आंदोलन सुरू होण्यापूर्वीच या आंदोलनाची ‘स्क्रिप्ट्’ अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांनी लिहिली होती. आणि या लोकांना असा एक चेहरा हवा होता, जो गांधीसारखा दिसेल, पण गांधीसारखी समज त्याला नसेल. असा खुलासा प्रसिध्द लेखक राजू परुळेकर यांनी त्यावेळीही केला होता. ज्या वेळी संपूर्ण देश अण्णा आंदोलनात एकवटला होता, त्यावेळी देखील राजू परुळेकर यांनी अण्णा आंदोलन हे एक नाटक असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. आणि त्यांना एक विलेन म्हणून संबोधण्यात आले होते.

रामलीला मैदानावर १३ दिवस अण्णा आंदोलन चाललं. अण्णा हजारेंनी उपोषण सोडल्यानंतर काही दिवसांनी किरण बेदींच्या घरी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, यांना अण्णा हजारे १०० कोटी माझे असल्याचे म्हणाले. मात्र अन्नाचे हे वाक्य या लोकांनी बरोबर रेकॉर्ड करून घेतलं. आणि अन्नाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता अण्णा आपलं उभ आयुष्य मी मंदिरात काढले आहे, असं म्हणत असल्याने ते लोकांना काही सांगू शकले नाहीत. असंही त्यावेळी राजू परुळेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं.

आता पुन्हा एकदा राजू परुळेकर यांनी या प्रकरणाला उजाळा दिला असून, काही धक्कादायक खुलासे केले आहेत. काल आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी जवळपास दीड तासाचा संवाद साधला. यात त्यांनी इंडीया अगेस्ट करप्शन हे किती फेक होतं, यावर चर्चा केली. या आंदोलनाची ‘स्क्रिप्ट् अरविंद केजरीवाल यानी लिहिली होती. त्यासाठी त्यांना अण्णा हजारेंसारखा चेहरा मिळाला. आणि ते आपल्या ध्येयापर्यंत पोहचले. असा धक्कादायक खुलासा राजू परुळेकर यांनी केला आहे.

१३ दिवसानंतर अण्णा हजारे यांनी आपले उपोषण सोडले. त्यानंतर त्यांची तब्बेत ठीक नाही, म्हणून त्रेहान नावाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र त्यांच्या लक्षात आलं, आपण इथे राहिलो तर, आपले काही खरे नाही. आणि म्हणून ते मेधा पाटकर यांच्या मदतीने महाराष्ट्रात आले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमने ‘अण्णा हजारे’ यांना या आंदोलनात शहीद करण्याचा प्लानिंग आखलं होतं. असा धक्कादायक खुलासा राजू परुळेकर यांनी केला आहे.

अण्णा हजारेंना या आंदोलनात शहिद करण्याचा कट अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी या दोघांनी रचला होता. आणि याचा फायदा उठवून अरविंद देशाचे पंतप्रधान तर किरण बेदी उपपंतप्रधानपदी विराजमान होणार होत्या. असाही धक्कादायक खुलासा राजू परुळेकर यांनी केला आहे. राजू परुळेकर यांच्या या दव्याने एकच खळबळ उडाली असून, आता याचा परिणाम पंजाब विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचं, बोललं जात आहे. फक्त राजू परुळेकरच नाही तर, एकेकाळी अरविंद केजरीवाल यांचे सहकारी राहीलेल्या, कुमार विश्वास यांनी देखील अरविंद केजरीवालवर हाच आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.