Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा धुमाकूळ; Swift WagonR सह ‘या’ बड्या गाड्यांवर पन्नास हजारापर्यंत सूट! वाचा सविस्तर..

0

आयुष्यात आपली एक उत्कृष्ट ‘फोर-व्हीलर’ गाडी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण दिवस-रात्र मेहनत देखील घेत असतो. मात्र एकीकडे हे सोपं असलं तरी, हे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या स्वप्नातली गाडी ही स्वस्त मिळायला हवी, अशी देखील इच्छा असते. ग्राहकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक ऑटो मोबाईल कंपन्या नवनवीन ऑफर्स देखील आणत असतात.

आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अॅटो मोबाईल कंपन्या, प्रत्येक महिन्याला नवीन काहीतरी ऑफर घेऊन येत असतात. आता अशाच एका नामांकित मारुती सुझुकी या ऑटोमोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या महिन्यात काही ठराविक गाड्यांवर सूट देणार असल्याची घोषणा केली आहे. आता प्रत्येकांला मारुती सुझुकी या ऑटोमोबाईल कंपनीने किती हजारांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या गाड्यांवर असा प्रश्न पडला असेल? बरोबर ना, चला तर मग जाणून घेऊया.

मारुती सुझुकी या ऑटोमोबाईल कंपनीने सीएनजी मोडेलवर कोणतीही सूट ठेवली नाही. हे थोडंसं ग्राहकांसाठी दुःख देणारं आहे. मात्र ईतर रोख, कॉर्पोरेट, त्याचबरोबर या अॉफर्समध्ये एक्सचेंजचा देखील समावेश असणार आहे. या अॉफर्समध्ये मारुती सुझुकी च्या WagonR गाडीचा देखील समावेश आहे. परंतु यातली गंमत म्हणजे, ग्राहकांना जुन्या मॉडेलवरच ही ऑफर असणार आहे. नवीन अपडेट वर्जनवर कोणतीही सूट मिळणार नाही. हेही थोडंसं दुःख देणारंच आहे.

मारुती सुझुकीने WagonR १.२ लिटर व्हेरियंटवरती तब्बल ४१ हजार रुपयांची मोकळीक दिली आहे. त्याचबरोबर १.० लिटर व्हेरियंटसाठी तब्बल ३२ हजारांची सूट देण्यात आली आहे. फक्त WagonR याच गाडीवर नाही तर मारुती सुझुकीने, आपल्या ALTO गाडीवर देखील ऑफर दिली आहे. मात्र इथे देखील एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे, नव्या ALTO वर नाही, तर जुन्या गाडीवर ठेवण्यात आली आहे.

मारूती सुझुकीच्या जुन्या ALTO गाडीवर म्हणजेच 796CC इंजिन असणाऱ्या आणि 5speed manual गिअरबॉक्स असनाऱ्या गाडीवर सुट देण्यात आली आहे. मारुती सुझुकीने यापूर्वी हे मॉडेल पेट्रोल तसेच CNG प्रकारात आणले आहे. मारुती सुझुकी आता त्यांच्या याच वाहनावर तब्बल ३१ हजार मोकळीक सोडणार आहे.

त्याचबरोबर मारुती सुझुकी STD मॉडेलवर 11 हजारांची सूट देत आहे. त्याचबरोबर ५ तसेच ७ सीट मॉडेलच्या EECO गाडीवर देखील २९ हजारापर्यंत सुत देण्यात आली आहे. सर्वांची आवडती swift मॅन्युअल मोडेलवर देखील २८ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. Dzire compact sedan मॅन्युअल गाडीवर २८ हजारांची सुट देण्यात आली आहे. त्याचबरोबर A मॉडेलवर देखील १८ हजार रुपयांची ऑफर ठेवण्यात आली आहे. मारुती सुझुकी या महिन्यात आपली नवीन Brezza गाडी लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या गाडीवर तब्बल पंचवीस हजार रुपयांची सूट दिली जाणार असल्याचं बोललं जातंय.

हे देखील वाचा Breaking news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्कई’ यांची लष्करी कारवाईत हत्या; सोशल मीडियावर..

क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होण्यासाठी ‘जय शहा’ने रचला कट; गांगुली देणार राजीनामा? वाचा सविस्तर…

या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.