क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होण्यासाठी ‘जय शहा’ने रचला कट; गांगुली देणार राजीनामा? वाचा सविस्तर..

0

भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीवर (BCCI president Sourav Ganguly) आता निवड समितीने(selection committee) अनेक धक्कादायक आरोप केल्याने, क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र निवड समितीने केलेले हे सर्व आरोप बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI secretary jay Shah) यांच्या सांगण्यावरूनच, केले असल्याची चर्चा देखील आता जोर धरत असल्याने, क्रिकेट चाहत्यांसाठी ही खूपच दुःखद बातमी असल्याचं बोललं जातं आहे‌.

भारताचा माजी अग्रेसर कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा सौरभ गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआय अध्यक्ष झाल्यापासून क्रिकेट बोर्डाची ताकत वेळोवेळी दिसून आल्याचे पाहायला मिळाले. गांगुलीच्या अगोदर बीसीसीआयकडे अध्यक्षच नसल्याने विराट( Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) हे दोघेच टीम आणि बोर्ड चालवत असल्याचा आरोप देखील अनेक वेळा झाला. त्याचबरोबर बीसीसीआयपेक्षा खेळाडू मोठे झालेत, अशी चर्चा देखील त्या वेळी रंगल्याचे क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले होते.

मात्र सौरभ गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यापासून, पुन्हा बीसीसीआयचाच दबदबा असल्याचे गांगुलीने दाखवून दिलं. मात्र आता सौरभ गांगुली यांच्यावर निवड समितीने, सौरभ टीम निवडताना प्रत्येक मीटिंगमध्ये सहभागी असतो‌‌. आणि यामुळे आमच्यावर दबाव येत असल्याचा आरोप केला आहे. सौरभ गांगुलीचा टीम निवडीत हस्तक्षेप असल्याचा आरोप निवड समितीने केल्याने, आता क्रिकेट वर्तुळात नवं वादळ निर्माण झाले असून, अनेक चर्चांना उधाण आल्याचे देखील दिसून येत आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव आणि अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनायचं असल्यामुळे, गांगुलीची बदनामी सुरू असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर उमटत आहेत. जय शहा एका मुरलेल्या राजकारण्याचे पुत्र असल्याने, त्यांची राजकारणी प्रवृत्ती कधीही लपून राहणार नाही. जश शहा आता सचिव पदावर समाधानी नसून, त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद हवं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत.

सौरभ गांगुली जवळपास तीन वर्ष झालं बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवत आहेत. मात्र आता अचानक निवड समितीला गांगुलीवर आरोप का करू वाटले? सौरभ गांगुली हा कसा खेळाडू आहे, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तो संघ निवडीत कधीही हस्तक्षेप करणार नाही. एखाद्याला विनाकारण बदनाम करून, त्या पदावरून पायउतार करायचं. आणि त्या खुर्चीवर आपण स्वतः बसायचं, ही राजकारणाची खेळी जय शहा व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. असंही आता बोललं जाऊ लागलं आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असली तरी, दुसरीकडे मात्र निवड समितीने खेळाडू निवडीत बीसीसीआयच्या अध्यक्षांचा हस्तक्षेप वारंवार होत असल्याच आरोप केल्याने, सौरभ गांगुली चांगलाच अडचणीत आला आहे. अगोदर सौरभ गांगुली आणि विराट कोहली हा वाद ताजा असतानाच, आता निवड समितीने केलेल्या ह्या नव्या आरोपामुळे, गांगुलीच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. सौरभ गांगुलीने अद्याप यावर काहीही भाष्य केलं नसून, गांगुली काय भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ‘वोलोडिमिर झेलेन्स्कई’ यांची लष्करी कारवाईत हत्या; सोशल मीडियावर..

‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

कोंबडी खताचे आहेत जबरदस्त फायदे; कमी खर्चात भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर..

बर्ड फ्लू’ बरोबरच ‘या’ कारणांमुळेही ढासळले अंड्यांचे दर; जाणून घ्या कसे ठरतात अंड्यांचे दर..

धक्कादायक! हृदयविकारामुळे नाही, ‘या’ कारणामुळे ‘शेन वॉर्न’चा झाला मृत्यू; मृत्यूच्या अगोदर बेशुद्ध अवस्थेत…

बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.