‘Flipkart’चा धमाका: Samsung redmi सह अनेक ‘स्मार्टफोन’वर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..

0

अनेक ई-कॉमर्स (e-commerce) कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर आयोजित करत असतात. मात्र यात सर्वात जास्त ऑफर कोण देत असेल तर, ते Flipkart’. “Flipkart” आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वारंवार नवीन काहीतरी ऑफर घेऊन येत असतं. आता पुन्हा एकदा Flipkart ने आपल्या ग्राहकांसाठी 12 मार्च पासून ते १६ मार्च पर्यंत “फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल’ घेऊन आले आहे.

‘Flipkart’ या बिग सेविंग डेज सेलमध्ये आपल्या ग्राहकांसाठी electronic gadgets पासून ते  smartphone त्याचबरोबर इतर देखील आणखी बऱ्याच ऑफर घेऊन आलं आहे. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोन त्याचबरोबर इतरही काही वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर या बिग डेज सेल मधून तुम्ही तुमच्या आवडीच्या आणि तेही 80 टक्क्यांनी स्वस्त वस्तू खरेदी करू शकता. कोणत्या वस्तूवर किती तक्के सवलत मिळणार आहे ते पाहुयात.

Flipkart हा सेल आपल्या ग्राहकांसाठी १२ मार्चपासून १६ तारखेपर्यंत लाईव्ह घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आणि विशेष म्हणजे, आपल्या ‘प्लस’ असणाऱ्या सदस्यांकरता, २४ तास अगोदर Axis सुरू ठेवणार आहे. त्याचबरोबर flipkart ने आपला करार SBI शी केला असून, जे ग्राहक SBI चे क्रेडिट कार्ड वापरणार आहेत, त्यांना १० टक्क्यांची अधिक सुट मिळणार आहे. म्हणजे, या ग्राहकांना तब्बल ९० तक्के सवलत मिळणार आहे.

           कोणत्या उपकरणांवर आहे बंपर सूट

स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने ‘स्मार्टफोन’ (smartphone) प्रेमी नेहमी नवनवीन स्मार्टफोन वापरताना पाहायला मिळतात. अशा स्मार्ट फोन प्रेमींसाठी फ्लिपकार्ट भन्नाट ऑफर घेऊन आलं आहे. अनेक नामांकित स्मार्टफोन कंपनीवर फ्लिपकार्ट तब्बल 80 टक्के डिस्काउंट देणार असल्याने, मार्चमध्येच ग्राहकांची दिवाळी साजरी होणार आहे. ‘flipkart’ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या आपल्या ग्रहकांसाठी Samsung , Poco, Realme त्याचबरोबर  Apple स्मार्टफोनवर देखील फ्लिपकार्टने तब्बल ८०  टक्क्यांची सूट दिली आहे.

‘Flipkart बिग सेविंग डेज सेल’मध्ये स्मार्टफोन बरोबरच स्मार्ट घड्याळांवर देखील 80 टक्क्यांपर्यंत यांची सूट असणार आहे. एवढंच नाही तर, घड्याळ प्रेमींसाठी Flipkart ने या सेलमध्ये Samsung Redmi, Realme, Honor  या सारख्या नामांकित कंपनीच्या स्मार्ट घड्याळांचा देखील समावेश केला आहे. मात्र या उत्पादनांवर ८० टक्के नाही तर ४० टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 40 टक्के सूट देण्यात आलेल्या यादीत लॅपटॉपचा देखील समावेश असल्याने, या बिग डेज सेलची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

           स्मार्ट फोन बरोबर याही सुविधा

१२ मार्च पासून सुरू होणाऱ्या Flipkart बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल फोन खरेदी केल्यानंतर, नो कॉस्ट ईएमआय, बेस्ट एक्सचेंज डील,आणि फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेडसह मोबाईलचे संपूर्ण प्रोटेक्शन देखील या सेलमधे ग्राहकांना flipkart देणार आहे. flipkart आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल आयोजित केला असल्याची, चर्चा देखील आता जोरदार रंगली असून, हा सेल वादळी होणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

हे देखील वाचा. ‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले; कांद्याचे दर पुन्हा वाढतील का? वाचा सविस्तर

राज्य सरकारचा धमाका! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार तब्बल एक लाख बिनव्याजी कर्ज

लोकशाहीचा खून! पराभव समोर दिसल्याने योगींची खेळी? संपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक; वाचा संपूर्ण प्रकरण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.