कसं जगायचं शेतकऱ्यांनी? नवीन वर्षातही शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल; शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान वाचून..

0

संकट हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपवल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. 2021मध्ये वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे, आणि अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे, शेतकरी हवालदिल झाला. मात्र अजूनही शेतकऱ्याच्या पाठीमागचं संकट काही संपायचं नाव घेत नाही. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा एकदा गारपिट झाली असून, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेले तीन दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्याबरोबर हलक्या पावसानी हजेरी लावली. हा वादळी वारा आणि अवकाळी पाऊस येण्याचे कारण म्हणजे, उत्तरेकडून आलेल्या वार्‍यांचा बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वार्‍यांशी धडक झाली. आणि याचे परिणाम म्हणून, धुळे जळगाव, नंदुरबार नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, गारपिट आणि अवकाळी पाऊस झाला. या संकटामुळे आता या जिल्हयातील कांदा, केळी, द्राक्ष या नाजूक पिकांवर देखील परिणाम झाला असून, शेतकऱ्यांवर आता मोठं वादळ निर्माण झालं आहे.

उत्तरेकडून आलेलं वार बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वार्‍यांशी धडकल्याने, वातावरणात झालेल्या बदलामुळे, आता शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी देखील अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या सतत बदलामुळे, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठे नुकसान झालं. खासकरून कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः झोपल्याचं पहिला मिळालं. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा कांदा फुगला नसल्याने, त्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. आणि आता पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्याने, कांदा, केळी, द्राक्ष या पिकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोग पडायला सुरुवात झाली.

गेल्यावर्षी सप्टेंबर दरम्यान गुलाबी वादळामुळे, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं नुकसान झालं. या काळात सतत वातावरणात बदल आणि अचानक कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशा हवालदिल झाला. शेतकऱ्याचा रब्बी हंगाम पावसाने धुवून गेल्याने, शेतकऱ्यांचा सर्वच आर्थिक बजेट कोलमडल्याचे पाहिला मिळाले. अगोदरच कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्याचं सगळंच बजेट कोलमडलं होतं. आता वर्ष सरलं तरी, पुन्हा एकदा शेतकर्‍यावरच्या संकटाची मालिका सुरुच राहीली आहे. या काळात पिकाबरोबरच, शेतीचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सतत होणाऱ्या पावसामुळे जमीन खरवडल्याचं पाहायला मिळाले. कांदा, मका, भुईमूग, सोयाबीन, डाळिंब भाजीपाला अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नवीन वर्षात आपल्याला संकटाचा सामना करावा लागणार नसल्याची आशा बाळगून, शेतकरी नव्या जोमाने तयारीला लागला. मात्र संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फळबागांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फळबागा अंतिम टप्प्यात आल्या असतानाच, शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटामुळे रब्बी हंगामावरही आता परिणाम होत आहे. परवा संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, याठिकाणी आंबा, कांदा, मिरची, द्राक्ष, टोमॅटो पिकांचे या अवकाळी पावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

द्राक्ष बागा आणि कांदा संकटात 

अवकाळी पाऊसाने, आणि वादळी वाऱ्याने तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे सांगली आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा, कांदा चांगलाच संकटात सापडला आहे. या वातावरामुळे कांदा तसेच द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात रोग पडला आहे. द्राक्षांवर डाऊनी, मणीगळ, तसेच भुरा या रोगाचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशा वातावरणात कितीही निगा राखली कितीही औषध फवारणी केली तरीही, बागा काही पूर्वीसारख्या होणार नाहीत.

अशीच परिस्थिती कांद्याची देखील झाली आहे. या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. या वातावरणामुळे कांद्यावर करपा मोठ्या प्रमाणात पडला आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रचंड महागड्या औषधाची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. आता याचा परिणाम साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. एकूणच या वर्षी देखील संकट शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा. फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’

लोकशाहीचा खून! पराभव समोर दिसल्याने योगींची खेळी? संपाच्या कार्यकर्त्यांनी पकडला ईव्हीएम मशीन घेऊन जाणारा ट्रक; वाचा संपूर्ण प्रकरण

लहर आली की शेतकरीही कहर करू शकतो; पट्ट्याने तीन महिने अफूच्या शेतीचा ठावठिकाणा लागू दिला नाही! ‘फिल्मी कहाणी’ वाचा सविस्तर..

रशिया-युक्रेन युद्धामुळे काही दिवसांतच सूर्यफूल तेलाच्या किंमती भिडणार गगनाला; ‘हे’ आहे त्याचे ठोस कारण. ..

फक्त याच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा अकरावा हप्ता चार हजाराचा मिळणार; ‘तुम्हाला’ही घेता येणार लाभ, करा ‘हे’..

‘Flipkart’चा धमाका! Samsung redmi सह अनेक ‘स्मार्टफोन’वर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल...

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.