चित्ता आणि सिंहाची झाली कुत्र्यासारखी अवस्था; व्हायरल झालेले दोन्हीं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले..

0

वनप्राणी एकमेकांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत असतात, ही साखळी आपण लहानपणीच विज्ञानात शिकलोय. वाघ, चित्ता, सिंह हे प्राणी किती चपळ आणि ताकतवान आहेत, हे आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ताकदी बरोबरच चपळता आणि धूर्तपणामुळे देखील हे प्राणी आपली शिकार करण्यात यशस्वी होत असतात. या तिघांच्याही हल्ल्यात सहसा कुठला प्राणी सुटेल असे फार क्वचित पाहायला मिळते. मात्र कोणी कितीही ताकतवान असला, तरी कधी कधी त्यांनाही आपला जीव वाचवण्यासाठी अनेकांची मदत घ्यावी लागते. असाच प्रकार सिंहाच्या आणि चित्याच्या बाबतीत घडला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत, जंगलाचा राजा म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या सिंहाची अवस्था कुत्र्यापेक्षा वाईट झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सिंहाला एका झाडावार चढावे लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. समोरून म्हशीचा घोळका आल्याने, सिंहाला काय करावं, सुचत नसल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. समोरून येणारा म्हशीचा घोळका आता आपल्यावरच हल्ला करेल, या भीतीने हा सिंह शेजारीच असणार्‍या एका झाडावर चढण्याचा प्रयत्न करु लागला, मात्र सिंहाला झाडावर चढता येत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

परंतु आपला जीव वाचवण्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य वाटत नाही, त्याचप्रमाणे सिंह देखील कसाबसा झाडावर चढून, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना, या व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, समोरून म्हशींचा घोळका येत असल्याने, सिंह प्रचंड घाबरला, आणि आपला जीव वाचण्यासाठी तो झाडावर चढण्याचा प्रयत्न करु लागला. त्याची झालेली ही केविलवाणी अवस्था पाहून, नेटकरी चांगलीच मजा घेताना दिसत आहेत. त्यांनी कमेंट करताना कधीकधी शिकारी देखील आपली शिकार विसरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो, अशा कमेंट केल्या आहेत.

ज्याप्रमाणे सिंहाची व्यवस्था झाली, तशीच काहीशी परिस्थिती चित्त्यासोबत देखील घडल्याचं पाहायला मिळतं. सिंहाच्या तुलनेत वाघ हा अधिक चपळ आणि धुर्त समजला जातो, वाघ आपली शिकार करताना कधीही खालीहात परत येत नाही, असं आपण अनेकदा वाचलं, ऐकलं असेल. खासकरून हरणाची शिकार करताना चित्ता हरणाला ताणून ताणून बेजार करतो, परंतु शिकार करतोच करतो. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ हरणाला तो स्पर्श करून देखील हरणाची शिकार करण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे वाचून तुम्हाला विश्वास बसत नाही ना, पण हे सत्य आहे.

चित्त्याला समोर पाहिले तर, हरणाला काय करावं सुचत नाही, आणि हरीण आपला जीव मुठीत धरून प्रचंड वेगाने धावत सुटते. व्हिडिओत चित्ता आपल्या अगदी समोर असून देखील, हरीण किंचितही घाबरत नसून गवत खाण्यात मग्न आहे. हे पाहून चित्ता देखील आश्चर्यचकित होताना दिसत आहे. चित्ता हरणावर झडप टाकायची, असा विचार करून हरणावर जडप टाकतो देखील, मात्र हरिण आणि त्याच्यामध्ये जाळी असल्याने चित्ता जाळीवर धडकन आपटतो. हे सगळं होऊन देखील हरीन किंचितही घाबरत नाही. चित्ता हरणाला जिभेने स्पर्श देखील करतो, मात्र याच्या पलीकडे तो काहीही करू शकत नसल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

यावर क्लिक करून पहा सिंहाची कशी फजीती झाली.. व्हायरल झालेल्या 

सोशल मीडियावर या व्हिडिओला कमालीचे व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ भारतीय वन सेवेतील अधिकारी असणारे, सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर वरून शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला त्यांनी “विंडो शॉपिंग बाय चित्ता” असं कॅपशन देखील दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओला अनेकांनी अनेक भन्नाट कॅप्शन दिले आहेत. एका युजरनेम म्हटले आहे, चित्ता खूप चपळ आणि धूर्त समजला जातो, मात्र तो बिन्डोक देखील आहे, हे मला आज माहिती झालं. हरीण आणि माझ्यामध्ये एवढी मोठी जाळी आहे, हे त्याला दिसलं नाही, यावरून तो किती बेअक्कल आहे, हे समजतं अशा देखील कमेंट पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर हे दोन्हीं व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले असून, पाहणारे या दोन्हीं व्हिडिओची मजा घेताना पाहायला मिळत आहेत. हे दोन्हीं व्हिडिओ पाहिल्यानंतर माणसाचे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणालाही कमी समजणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असंही काही युजर बोलत आहेत. तर काहीजण म्हणतात, समोरचा कितीही ताकदवान असला तरी, आपण एकत्र असलो तर, समोरचाच आपला जिव मुठीत धरून पळत सुटेल.

हे देखील वाचा शपथविधीपूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

अजित पवारांनी केला गेम! अर्थसंकल्पात तब्बल 57 टक्के निधी राष्ट्रवादीच्या खात्याला; शिवसेनेला केवळ 16 तर कॉंग्रेसला..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.